Rain  Dainik Gomantak
देश

दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी, 11 वर्षामध्ये विक्रमी पावसाची नोंद

हवामान विभागाने (weather Department)काल शनिवारी निर्देश दिली होते की, दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि इतर भागात मुसळधार सुरू राहू शकतो.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: दिल्लीत NCR प्रदेशात शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळीपर्यंत सुरूच राहिला. या वर्षीत दिल्लीत मान्सूनच्या पावसाने 11 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम (record)मोडीत काढला आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच राजधानीत पावसाची पातळी 1000 मिमी ने ओलांडली आहे. मुसळधार पावसाची परिस्थिती अशी होती की, इंदिरा गांधी विमानतळावरही (Indira Gandhi Airport)अनेक फूट पाणी भरले होते. ANI ने धावपट्टीवर अनेक फूट पाण्याच्या दरम्यान उभ्या असलेल्या विमानांची फोटो काढले आहेत. हवामान खात्याने दिल्ली आणि NCR क्षेत्रासाठी पुढील काही तासांमध्ये मुसळधार अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.

जोराचा गडगडाट आणि जोरदार वारा याच्या दरम्यान, पारा देखील 3 ते 4 अंशांनी खाली आला आहे. मधु विहारसह अनेक भागात पाणी साचल्याने लोकांसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामान विभागाने दिल्ली हवामान, नोएडा, ग्रेटर नोएडासह एनसीआरच्या बहुतांश भागात अनेक तास पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली आणि NCR मध्ये तापमानात तीव्र घट झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने (Weather)आधीच अंदाज वर्तवला होता की सप्टेंबरमध्ये यावेळी 10 टक्के अधिक पाऊस पडू शकतो. तर ऑगस्टमध्ये 24 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT