Why I Am Not a Christian Dainik Gomantak
ब्लॉग

मी ख्रिश्र्चन का नाही ?

ख्रिश्र्चन धर्माने अधोरेखित केलेले आत्म्याचे अमरत्व बर्टान्ड रसेलला अजिबात मान्य नाही. माणसाच्या मृत्यूनंतर देह व आत्मा ह्यांचा विलय होतो हे वैज्ञानिक सत्य आहे असे रसेल म्हणतो

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

एके काळी बर्ट्रान्ड रसेलच्या ''Why I am not a Christian?'' या पुस्तकाने मोठी खळबळ माजवली.

बर्ट्रान्ड रसेलच्या मतानुसार देवावर विश्र्वास, आत्म्याचे अमरत्व व जेजू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व या ख्रिश्र्चन धर्माच्या तीन प्रमुख श्रद्धा होत्या. रसेलला त्या तीनही श्रद्धा मान्य नव्हत्या.

रसेल पक्का नास्तीक व निरीश्र्वरवादी होता. मूळ कारणाच्या सिद्धांताप्रमाणे देव हे विश्र्वाचे मूळ कारण असेल तर देवाचे मूळ कारण कोणते असा तर्कशुद्ध प्रश्र्न रसेल विचारतो. मुळात एखाद्या गोष्टीला प्रारंभ असलाच पाहिजे ही चुकीची संकल्पना आहे असे रसेलला वाटते. विश्र्व अनादी असावे असा त्याचा कयास आहे.

डार्विनच्या उत्क्रांतीवादानंतर ईश्र्वराने प्राणीमात्रांची निर्मिती केली हा बायबलचा सिद्धांत खोटा ठरतो.

जगात नैतिकतेची प्रतिस्थापना करण्यासाठी देवाची संकल्पना आवश्यक आहे ही मांडणी देखील रसेलला मान्य नाही. नैतिकता स्वयंसिद्ध आहे आणि समाजधारणेसाठी आवश्यक नैतिकतेची संकल्पना तत्वज्ञ व विचारवंत यांच्या उपदेशांतून संपन्न झाली आहे.

ख्रिश्चन धर्माचे क्रौर्य पाहून बर्ट्रान्ड रसेल अस्वस्थ होतो. धर्मयुद्धे, इन्क्विझिशन, वृद्ध स्त्रियांना चेटकिणी समजून जाळणे ह्या अक्षम्य गोष्टी आहेत असे रसेलला वाटते.

धर्म हा प्रेम, ज्ञान व धैर्य ह्या मूल्यांवर आधारीत असला पाहिजे. क्रौर्य, अज्ञान व भीती हा धर्माचा पाया असू शकत नाही. भक्तांत अपराधित्वाची भावना रुजवण्याचा ख्रिश्र्चन धर्माचा प्रयत्न रसेलला मान्य नाही.

ख्रिश्र्चन चर्च विज्ञानविरोधी आहे. चर्चने राज्यसत्तेच्या कारभारात नेहमीच ढवळाढवळ केली आहे.

कामेश्र्छा ही नैसर्गिक भावना आहे. पण कामोपभोगाना ख्रिश्र्चन धर्माने केलला विरोध बर्ट्रान्ड रसेलला हास्यास्पद वाटतो.

प्रार्थनेने देव प्रसन्न होतो ही ख्रिश्र्चन धर्माची शिकवण त्याला मूर्खपणाची वाटते.

देव, धर्म, अध्यात्म ह्यांच्या शिवाय मानवी जीवन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व तत्वज्ञान यांच्या आधाराने सुखी, समाधानी होऊ शकते असा रसेलला विश्र्वास वाटतो.

ख्रिश्र्चन धर्म मुलांची विचारशक्ती खुंटीत करते. ख्रिश्र्चन धर्माला संशय, चिकित्सा व विवेक मान्य नाही.

ख्रिस्त हा बुद्ध व साॅक्रेटिसा एवढा शहाणा माणूस होता असे रसेलला वाटत नाही. ख्रिस्ताला थोर करण्यासाठी बायबलला चमत्कारांची गरज भासावी ही गोष्ट रसेलला हास्यास्पद वाटते.

ख्रिश्र्चन धर्म हा युद्धखोरीला उत्तेजन देणारा धर्म आहे असे रसेल म्हणतो. ख्रिस्ताची करूणा वैयक्तिक पातळीवरची होती. सार्वजनिक व सार्वत्रिक पातळीवर ख्रिश्र्चन धर्माने करूणेला नेहमीच डावलले आहे आणि क्रौर्याला कवटाळलेले आहे.

ख्रिश्र्चन धर्माला न्याय ह्या संकल्पनेबद्दल आदर नाही. अन्यायाची चीड नाही.

जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ख्रिश्र्चन धर्माची शिकवण अपुरी पडते.

खगोलशास्त्राप्रमाणे हे जग, हे विश्र्व एके दिवशी भस्म होणार आहे. ख्रिश्र्चन धर्माची संकुचित दृष्टी हे वैश्र्विक सत्य पाहू शकत नाही.

जागतिक स्तरावर ख्रिश्र्चन धर्माने वसाहतवादाला प्रोत्साहन दिले आहे. गुलामीचे समर्थन केले आहे.

ख्रिश्र्चन धर्माने अधोरेखित केलेले आत्म्याचे अमरत्व बर्टान्ड रसेलला अजिबात मान्य नाही. माणसाच्या मृत्यूनंतर देह व आत्मा ह्यांचा विलय होतो हे वैज्ञानिक सत्य आहे असे रसेल म्हणतो.

बर्ट्रान्ड रसेल हा बंडखोर विचारवंत होता. वाॅल्टेरनंतर एवढ्या ताकदीचा दुसरा विचारवंत झाला नाही.

बर्ट्रान्ड रसेलने तर्कनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी भिंगातून केलेली धर्माची चिकित्सा समजून घेण्यासाठी जिज्ञासू वाचकांनी ''Why I am not a Christian?'' हे बर्ट्रान्ड रसेलचे पुस्तक वाचलेच पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT