Locked House in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यात Locked Houseचे सर्वाधीक प्रमाण

गोव्यात 8,000 घरं अधिकृतपणे बंद आहे

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला भारतात (India) कुठेही घर घ्यायचे असेल तर तुम्ही ते कुठे घ्याल? विशेषत: तिथे राहण्यासाठी आणि उपजीविकेसाठी जागेचे बंधन नसेल. बहुतेक गोवा अशा ठिकाणांपैकी एक असू शकते, अनेकांना गोव्यात फ्लॅट घ्यायचा आहे. येथील हवामान, समुद्र किनाऱ्याजवळील (Beach) हवा, आणि जिवनपद्धती चांगली आहे. इतर शहरांप्रमाणे इथे जगण्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत. पण गोवा हे देशातील एक असे राज्य आहे जिथे देशामध्ये बंद घरांची (Locked House) टक्केवारी सर्वाधिक आहे. याचा अर्थ काय आहे आणि असे का आहे हे आपण बघूया.

देशात गोवा अव्वल

भारताच्या जनगणनेनुसार, गोव्यात अशी अनेक घरे आहेत जी "ऑक्युपाईड लॉक हाऊस" च्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. विभागानुसार, गोव्यातील 1.4 टक्के घरे या श्रेणीतील आहेत, जी देशात सर्वाधिक आहे. आणखी रोचक गोष्ट म्हणजे इतर राज्ये या बाबतीत गोव्यापेक्षा खूप मागे आहेत. लक्षद्वीप आणि मेघालय सारख्या मोठ्या राज्यांतील अशा घरांचे प्रमाण 1.1 टक्के आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान सारख्या मोठ्या राज्यांमध्ये कामाच्या शोधात लोकं आणि कुटुंब मोठ्या शहरांकडे अधिक विस्थापित होताना दिसतात, जे बंद घरांच्या टक्केवारीच्या तुलनेत खूप कमी आहे. दुसरीकडे, 0.5 टक्क्यांपेक्षा कमी कुटुंबे आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात आहेत.

गोव्यातील घरांची सख्या जास्त का?

जनगणना विभागाने गोव्यातील ही घरे का बंद आहेत याची चौकशी केली नाही. मार्गो प्रॉपर्टी एजंट हर्ष नायक, डाउन टू अर्थच्या अहवालात म्हणतात की, गोव्यातील लोकांमध्ये एक दृढ विश्वास आहे की जरी ते संपूर्ण वेळ घरात राहत नसले तरी गोव्यात त्यांचे स्वतःचे घर असावे अशी त्यांची इच्छा आहे.

गोव्यात राहण्याची इच्छा

अनेकांना निवृत्तीनंतर गोव्यात स्थायिक व्हायचे असते. यापैकी बरेच लोक वृद्ध तर नाहीत, परंतु त्यांचे वय निश्चितपणे 50 च्या वर आहे. त्यांना येथे मालमत्ता खरेदी करायची आहे आणि ती आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवायची आहे. असे बरेच लोकं आहेत ज्यांना गोवा आवडतो आणि त्यांना इथे नेहमी येत राहण्यासाठी हक्काची जागा हवी आहे, पण त्यांना स्थायिक व्हायचे नाही.

गोव्यात अशी किती घरे आहेत

या व्यतिरिक्त, गोव्यात राहणाऱ्यांची संख्या कमी नाही जे आता काम करतात आणि परदेशात राहतात, त्यांनी आपल्या मातीशी संपर्क तुटू नये, म्हणून गोव्यात आपले घर घेवून ठेवले आहे. आणि त्या घरांना त्यांनी लॉक करून ठेवले आहे. खरं तर, गोव्यात 8,000 बंद घरे आहेत, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे, या राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त घरे बंद आहेत.

एकट्या तामिळनाडूमध्ये 1 लाख 62 हजार आणि उत्तर प्रदेशात 1 लाख 27 हजार बंद घरे आहेत. पण जेव्हा गुणोत्तराचा विचार केला जातो, तेव्हा गोवा वरच्या स्थानावर आहे. हा रेट 2001 ते 2011 दरम्यान, गोवा 25 टक्के, मध्य प्रदेश 31 टक्के, राजस्थान 39 टक्के आणि बिहार 43 टक्के एवढा वाढला. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत वाढत्या घरांची संख्या पाहिली तर गोवा या सर्व राज्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे.

घरांची स्थिती कशी आहे

जनगणनेच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गोव्यात घरांची संख्या दहापट लोकसंख्या वाढीच्या तिप्पट होती. दुसरीकडे, मध्य प्रदेशची लोकसंख्या दीड पट वाढली, राजस्थानची दोन पटीने थोडी कमी तर बिहारची लोकसंख्या त्याच प्रमाणात वाढली. याशिवाय जनगणनेनुसार गोव्यातील 76 टक्के घरे चांगल्या स्थितीत आहेत. लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये ते 78 आणि 75 टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये 54 टक्के, बिहार 36 टक्के आणि ओडिशा 29 टक्के घरांची स्थिती वाईट आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता, गोव्यासह देशातील मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती जवळजवळ पूर्वीसारखीच राहणार असल्याने जास्त बदल होण्याची शक्यता आहे असे म्हणता येणार नाही. बांधकाम व्यावसायिकांना या परिस्थितीची चांगली जाणीव आहे. अशा परिस्थितीत येथे भाड्याने घर देण्याचा व्यवसायही फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली; ही आग खूप दूरवर लागेल...

Video: FA9LA ची 'ट्रेंडिंग' स्टेप अक्षयने बसवली! डान्स कोरियोग्राफरचा खुलासा; म्हणाला, लडाखची उंची, हातात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन तो...

हडफडे दुर्घटना; समिती नेमली, पाहणीही झाली! पण कारवाई होणार का? 'लईराई जत्रोत्सवा'च्या दुर्घटनेचा अहवाल आजही धूळ खात - संपादकीय

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

SCROLL FOR NEXT