Vinod Naik Dainik Gomantak
ब्लॉग

Vinod Naik : आपल्या जादूई हातानी विविध रंगढंगाची चित्रे रेखाटणारा अवलीया चित्रकार

विनोद नाईक यांच्या साहित्याला अनेक मानाचे पुरस्कार लाभलेले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्या जादूई हातानी विविध रंगढंगाची चित्रे रेखाटणारा अवलीया चित्रकार विनोद नाईक हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. ते कवीदेखील आहेत. विनोद नाईक हे कुर्टी फोंडा येथील रहिवासी. त्यांचे मुळ गाव कुंभारजुवा. तिसवाडी येथे गावातील शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सिंधूनगर, कुर्टी येथे स्थलांतरीत झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण कवळेच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. पुढे त्यांनी पणजीच्य आर्ट कॉलेजमध्ये कलेची पदवी संपादन केली व ते कलाशिक्षक बनले. त्यांच्या चित्रकला ज्ञानाचा फायदा नि;संशयपणे मुलांना झालेला असेल. सरकारी हायस्कूल धावशिरे, उसगाव येथे सध्या ते कला-शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

Vinod Naik

कॅनव्हासवर निसर्गचित्र, व्यक्तीचित्रे, समकालीन मॉडर्न आर्ट, तसेच तऱ्हेतऱ्हेची चित्रे काढण्यात ते तरबेज आहेत. अनेकांची पोर्ट्रेट त्यांनी काढलेली आहेत. त्यांच्या निसर्ग चित्रांमधून हुबेहुब निसर्ग आपल्यासमोर प्रत्यक्ष उभा झालेला असतो. ते एक चांगले चित्रकार आहेतच पण त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट कवी आहेत. त्यांचे जवळजवळ 15 कवितासंग्रह आणि दोन कथासंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत.

राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात त्यांनी आपली कविता सादर केल्या आहेत. विनोद नाईक यांच्या साहित्याला अनेक मानाचे पुरस्कार लाभलेले आहेत. गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी, प्रागतिक विचार मंच- गोवाचे या सस्थांचे ते सदस्य आहेत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT