Painting exhibition Dainik Gomantak
ब्लॉग

शिवकर्णिका चित्रकला प्रदर्शन

गोव्यातील 23 प्रतिभावंत चित्रकारांनी रेखाटलेली शिवरायांची विविध रूपे

गोमन्तक डिजिटल टीम

सांस्कृतिक प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतिनशे वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून फोंडा येथील ‘हिंदवी स्वराज संघटने’ने पाटो-पणजी येथील संस्कृती भवन मधील कला दालनात भरविलेल्या प्रदर्शनाचे मंगळवारी उदघाटन झाले.

गोव्यातील 23 प्रतिभावंत चित्रकारांनी रेखाटलेली शिवरायांची विविध रूपे, शिवकालीन प्रसंगांचा प्रतिकात्मक आविष्कार पहाणे म्हणजे आंनदानुभूतीच. हे प्रदर्शन पहाताना ऊर अभिमानाने भरून येते.

सागर नाईक मुळे, वितेश नाईक, विराज नाईक, राजेश साळगावकर, सचिन नाईक, वासुदेव शेट्ये, आदी विशाल, विजय भंडारे, रामदास गडेकर, स्वप्नेश वायंगणकर,श्रीधर कामत बांबोळकर,चैताली मोरजकर, प्रविण नाईक, डॉ. शिवाजी शेट, ईशान नाईक, श्रीपाद गुरव, सिद्धार्थ गायतोंडे, सोनिया रॉड्रिगीस सबरवाल, संतोष मोरजकर, शिल्पा नाईक मोरजकर, प्रदीप नाईक, सिद्धार्थ गोसावी व निरुपा नाईक या दिग्गज गोमंतकिय चित्रकारांनी ही चित्रे रंगवली आहेत.

सागर नाईक मुळे यांनी मंदिराची पार्श्वभूमी घेऊन शिवप्रतिमा साकारली आहे. विजय भण्दारे यांनी शिवाजीने अफझलखानाचा कोथळा काढला त्या प्रसंगावर वाघनखे घातलेला रक्ताळलेला हात दाखवून प्रतिकात्मक आविष्कार घडविला आहे.

चैताली यांनी तोंडात सुरा असलेला घोडा आणि मागे किल्ला अशी कल्पक चित्रकृती साकारली आहे. डॉ. शिवाजी शेट यांनी विरश्रीयुक्त रणमैदानावरील शिव प्रतिमा छान साकारली आहे.

निरुपा नाईक यांची साकारलेली कल्पक आणि कलात्मक शिवप्रतिमा लक्षवेधी आहे. वासुदेव शेट्ये यांची कोलाजसदृश्य प्रतिमा आणि विराज नाईक आणि प्रविण नाईक यांच्या चित्रकृती प्रभावी आहेत. हे प्रदर्शन गुरुवार, 8 जून पर्यंत रसिकांसाठी खुले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT