Trekking Dainik Gomantak
ब्लॉग

Trekking: ‘ते तेवीस तास’ : विषण्ण करणारा थरार

गोमन्तक डिजिटल टीम

अंजली आमोणकर

A Trekking Experience In Buran Valley तसे तर प्रत्येक खेळात साहस लागतेच. पण केवळ साहसी खेळांमध्ये ‘ट्रेकिंग’ची आवड, जगभरात जोपासली गेली आहे. गावातल्या एखाद्या चिटुकल्याशा डोंगरापासून सुरू होत ही आवड पार हिमालयात पोहोचली आहे.

कारण या खेळाचा स्थायिभावच मुळी साहस व केवळ साहस हा आहे. त्यामुळेच त्यात धोके व जोखीम भरपूर असते. प्रशिक्षण व अनुभव या बळावर काटेकोर नियोजन करून, सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण तयारी करून अपेक्षित जोखीम स्वीकारून हा साहसी खेळ स्वीकारला जातो.

त्यामुळे इथे थरारक प्रसंग, छोटेमोठे अपघात, क्वचित प्रसंगी जिवाची बाजीही लागते. पण या सर्व अपघातांचे संकलन करून कारणमीमांसा केल्यास, पुढील गिर्यारोहकांना त्यातून धडे घ्यायला मिळतात. अशी संकलने परदेशात ङ्गार बिनचूक पद्धतीने करून ठेवतात.

भारतात मात्र कायदेशीर जबाबदारी व समाजातील प्रतिष्ठा यांना धक्का लागू नये म्हणून, अपघातांची खरी माहिती व कारणे समोर येत नाहीत. ते काम भावना देशमुख यांनी आपल्या ‘बुरान घाटीतील ते तेवीस तास’ या पुस्तकात केले आहे.

न भिता, न लाजता; पुढे दोषारोप होण्याची शक्यता गृहीत धरून; त्यातले काहीही न लपवता, न ङ्गेरङ्गार करता. पुढच्या मोहिमांना त्यातून काहीतरी शिकता यावे या करता केलेला अट्टहास वाचता क्षणी, वाचक कितीतरी वेळ मूक-बधिर व विषण्ण होऊन जातो.

भावना देशमुख या ट्रेकर. सह्याद्रीच्या रांगांमध्ये त्यांचे ट्रेकिंग सुरू झाले. ङ्गजिती करणारे प्रसंग शुभारंभालाच आले, पण सहकारी सोबत्यांनी संभाळून घेतले व मोहिमा यशस्वी होत गेल्या. हिमालयातील ट्रेकिंगच्या निमित्ताने एक अङ्गाट अद्भुत विश्वाचे दालनच खुले झाले. सहकाऱ्यांचा एक ग्रुप तयार झाला.

ऋणानुबंध व मैत्रीचे धागे पक्के झाले. मुंबईतील हा ग्रुप, दरवर्षी एक, याप्रमाणे हिमालयीन ट्रेक करतो. अनेक यशस्वी ट्रेक नंतर १३ सदस्यांच्या या गटाने, २०२१साली हिमाचल प्रदेशातील, किन्नौर भागात ‘बुरान घाटी ट्रेक’ आयोजित केला. पण प्रारंभी दिवस ठरवण्याच्या कामापासून सर्व गोष्टी चुकत गेल्या.

ऑक्टोबरमध्ये नेमका बर्ङ्ग पडायला सुरुवात होते, त्यावेळी हा ट्रेक घेतला गेला. बुरान घाटीतील बर्ङ्गाळ वादळी वाऱ्यांनी, सर्व ट्रेकची विल्हेवाट लावली, त्यात त्यांच्या भरवशाच्या गाइडने दगा दिल्यावर, सोबत असलेले गाइड व सपोर्ट टीमला तांत्रिक वा पुस्तकी ब्रेकिंग ज्ञान नव्हते. त्यांच्याकडे ना सुरक्षिततेची साधने होती ना ऑक्सिजन सिलिंडर होते.

त्यामुळे हा ट्रेक मध्यावर असताना बर्ङ्गाची प्रचंड वादळे सुरू झाली, चाल मंदावली व वेळेचे गणित कोलमडले. सलग अठरा तास उपाशीतापाशी त्या बर्ङ्गाळ जागेत कमरेइतके रुतत निघत चालल्याने, शरीरातली ऊर्जा संपत गेली.

माउंटन सिकनेस, ज्यांत ऑक्सिजनच्या कमतरतेपायी आधी मेंदू व इतर पेशींचे कार्य बंद पडणे सुरू होते, भ्रमिष्टावस्था निर्माण होते, दृष्टी गेल्यासारखी होऊन काहीच दिसेनासे होते आणि झोप अनावर होते. त्वरित व झपाट्याने उपाय केल्यास, स्वर्गाच्या दारातूनही बाधित व्यक्ती परत नॉर्मल होऊ शकते.

या सिकनेस बाधित झालेली लेखिका, नशीब बलवत्तर म्हणून केवळ मिठाचे कोमट पाणी प्यायला मिळताच नॉर्मल झाली व बचावली. पण ग्रुपचे अन्य तीन लोक मृत्युमुखी पडले, चवथ्याला लेखिकेने इतरांच्या साहाय्याने वाचवले, अशी या ट्रेकची अयशस्वी सांगता झाली. या सर्व ट्रेकचे इत्थंभूत वर्णन लेखिकेने या पुस्तकात केले आहे.

शिवाय जर-तरची भाषा न वापरता, उगीचच कोणाच्या तरी माथी दोषारोप न करता त्यांनी झालेल्या अयशस्वीतेची कारणे शोधून त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवला आहे. ‘काटेकोर नियमांचे पालन करण्याऐवजी आम्ही अवांतर गोष्टींना जास्त प्राधान्य देत बसलो.

अत्यावश्यक गोष्टी सोबत बाळगण्यासाठी एजन्सीला स्पष्ट समज देऊन त्याची पूर्तता झाली आहे किंवा नाही याबाबत आम्ही कायम बेङ्गिकीर राहिलो आहोत.

इतकी वर्ष हिमालयात ट्रेकिंग करताना संकटांशी परिचित असूनही, व कालिंदी खालच्या ट्रेकच्या वेळेला ग्रुपमधील दोन सदस्यांचे मृत्यू पचवल्यानंतर ही आम्ही निष्काळजी राहिलो आहोत हे कटू सत्य आहे’, असे विश्लेषण लेखिका स्वतःच करते.

तरीपण परतीच्या प्रवासात प्रचंड चालणे इथेतिथे जेवण व पोलीस तपासणी - शिवाय सपोर्ट टीममधल्या काही जणांना, ग्रुपच्या लोकांबरोबर हातपाय सुजून काळेनिळे पडणे, सुन्न होणे, जखमा होणे असे अनेक त्रास झालेले होते. त्यावर औषधोपचार चालू होते.

यात खरोखर जो दोषी होता ज्याने उघड्या डोळ्याने सर्वांना मृत्यूच्या खाईत नेऊन सोडले होते व अर्ध्या अंतरावर जो सर्वांना बाय बाय करून गेला तो, ट्रेक गाइड भरत चौहान मात्र सहज सुटला. कारण एकच तो विश्वासातला आदमी म्हणून त्याच्याशी कोणताही लेखी करार केला नव्हता.

सरकारी रुग्णालय, पोलीस सोपस्कार परत वर जाऊन मृतदेह शोधून खाली आणण्यापासून ते विमानाने व्यवस्था करून प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्यापर्यंतची, पोलिसांपासून ते पत्रकारांपर्यंतची सर्व वेळ धनराज नावाचा सदस्य एकहाती निभावत होत, भरावयाच्या मोठमोठ्या रकमा एका हाती उभ्या करत होता.

ज्या प्रसंगांना लेखिका प्रत्यक्ष हजर नव्हती तेव्हाचे सर्व प्रसंगही उपस्थितांची वक्तव्ये नीट जुळवून आणून लेखिकेने लिहिले आहेत. शिवाय वाचलेल्या सर्व सदस्यांनी इंग्रजी मराठीत छोटे छोटे लेख लिहून पूर्तता केली आहे.

याच लेखातून सदस्य डॉ. खोपकरांचा ‘डूज व डोन्ट’(हे करा-हे करू नका) सांगणारा लेख व इतरही लेख काळजाला चटका लावून जातात.

अविरत तेवीस तास चाललेले हे बुरान घाटीतील ट्रेकिंग वाचताना, निसर्गापुढे आपण किती कमकुवत आहोत याचे प्रत्यंतर येते व हे पुस्तक वाचून इतर ट्रेकर्सनी काही धडे घेऊन सावध व्हावे हीच सदिच्छा.

या पुस्तकामुळे अनेक गैरसमजांना तिलांजली मिळेल हे नक्की, ट्रेकिंगपेक्षाही पुस्तक लिहिण्याचे हे लेखिकेचे धाडस जास्त कसोटीचे होते हे नक्की. एका वेगळ्याच विषयावरचे उत्तम पुस्तक वाचकांच्या हाती ठेवल्याबद्दल डिंपल प्रकाशनाचे अभिनंदन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT