Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याची कातळशिल्पे जागतिक वारसा स्थळ बनण्याच्या दिशेने

गोव्यातील (Goa) या स्थळांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य आठ स्थळांचाही या यादीत समावेश झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कुशावती नदीच्या काठी आपल्या पाठीवर आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे घेऊन तिथले प्रस्तर पाण्यात पाय बुडवून पहुडलेले आहेत. या प्रस्तर शिल्पांना आता यूनेस्कोने आपल्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करून घेतल्यामुळे त्यांना भविष्यात युनेस्कोमान्य वारसा स्थळ बनण्याचा बहुमान प्राप्त होण्याची आशा बळावली आहे. गोव्यातील (Goa) या स्थळांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य आठ स्थळांचाही या यादीत समावेश झाला आहे.

यासंबंधीचा प्रस्ताव ‘परमनंट डेलिगेशन ऑफ इंडिया’ने 17 फेब्रुवारी 2022 या दिवशी सांस्कृतिक विभागाअंतर्गत युनेस्कोला सादर केला होता. युनेस्कोने प्रकाशित केलेल्या यादीनुसार या प्रस्तर शिल्पांचे जागतिक वारसा स्थळ बनण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू झाली आहे.

या संबंधात बोलताना गोवा पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक निरीक्षक वरद सबनीस यांनी सांगितले, ‘यादीमध्ये समाविष्ट होणे हे वारसा स्थळ म्हणून घोषित होण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिले पाऊल आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोवा (Goa) राज्याच्या पुरातत्त्व खात्याने संयुक्तपणे हा प्रस्ताव तयार केला होता. कोकण पट्ट्यातली कातळशिल्पे निवडून त्यांनी भारत (India) सरकारकडे हा प्रस्ताव सादर केला, जो नंतर युनेस्कोला भारत सरकारमार्फत सादर झाला. आता तो पुढील प्रक्रियेसाठी युनेस्कोच्या यादीचा भाग बनला आहे.

सबनीस यांनी बोलताना पुढे सांगितले की, पुढील प्रक्रिया सुरू होण्यासाठी निदान आणखीन एक वर्ष तरी जावे लागेल. यासंबंधीची संशोधित सामुग्री प्रथम सादर केली जाईल. त्यानंतर युनेस्कोचे मंडळ पुढील संशोधन करून आपला अंतिम निर्णय जाहीर करतील.यादीमध्ये समाविष्ट झालेली ही सारी स्थळे देशातल्या आदिमानवाच्या प्रतिभेच्या खुणा जपतात. युनेस्को पुरस्कृत वारसास्थळे बनण्यासाठी या स्थळांना लक्षणीय वैश्विक मूल्य असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त युनेस्कोच्या इतर निवड निकषांनाही ती अनुरूप असायला हवीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT