Blog Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: मूकं कारोति वाचालं...

Kavya Powar

वाल्मिकी फालेरो

फालेरो कुटुंब आणि त्यांचा बाणावलीसोबतचा दुवा याविषयी आपण गेल्या लेखात पाहिले. या लेखात याच कुटुंबाविषयी थोडे विस्ताराने जाणून घेऊ.

या फालेरो कुटुंबाचे मूळ घर आता आहे ते नव्हे. भातशेतीच्या व्यवसायात ते मूळ घर व मालमत्ता नष्ट झाली. सध्याचे घर भात साठवण्यासाठी वापरण्यात येणारे आगर होते. त्यामुळेच कदाचित, त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांपैकी हे एकमेव घर होते ज्याला मागील बाजूने यायलाजायला वाट व मुख्यद्वार होते.

भात कापणीतील कंत्राटदाराचा वाटा आणण्यासाठी शेतकऱ्यांना जवळ पडावे, म्हणून मागील दार हेच मुख्यद्वार झाले. मूळ घर गेल्यानंतर हे कुटुंब या आगरात राहायला गेले. प्रत्येक पिढीतील दोन मुलांपैकी फक्त एका मुलाने लग्न केले. म्हणूनच कुटुंबात फालेरोंना चुलत भाऊ नाहीत.

२०व्या शतकात या घरावर तीन न्यायालयीन खटले होते. शतक संपेपर्यंत घर महिलांनी व्यापलेले होते. (त्यांचे सर्वांत धाकटे मूल जेमतेम तीन महिन्यांचे असताना माझे आजोबा वारले. त्यांचा एकुलता एक भाऊ मकाओमध्ये मिशनरी पंथगुरू होता. माझे वडील भारतीय सैन्यात डॉक्टर होते आणि त्यांचा एकुलता एक भाऊ ब्रिटिश भारत सरकारमध्ये टेलिग्राफर होता. त्यांच्या घरात दोन अविवाहित बहिणी त्यांच्या आईसह आणि एक बार्रेतो झेवियर विधवा काकू राहत होत्या.)

१९२०च्या दशकात कधीतरी, माझ्या आतेने त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर मागील बाजूस छत वाढवून जळाऊ लाकडांसाठी खोली तयार केली होती. तिच्या घराच्या पश्चिमेला राहणाऱ्या गोम्स नामक शेजाऱ्याने यासाठी चक्क खटला गुदरला.

त्यावेळेस, माझ्या आतेच्या बाजूने यशस्वीपणे बचाव अ‍ॅड. सर्व्हुलो (सेरोलिन्हो) कुलासो, बिशप डी. जुझे कुलासो यांचे वडील, यांनी केला. सेरोलिन्हो हे केवळ चांगले वकीलच नव्हते तर ते माणूस म्हणूनही खूप चांगले होते. जेव्हा माझ्या आतेने त्यांची फी भरली तेव्हा त्यांनी लिफाफा उघडला, रोख रक्कम मोजली आणि प्रत्यक्षात ते जास्त असल्याचे सांगून काही पैसे परत केले. (माझ्या लहानपणीचा असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो.

बाणावली येथील वृद्ध डायस, तिच्या भाचीसोबत सोरेस रिबेलो यांच्या घरी राहत असे. तिने फेस्ताच्या एक-दोन दिवस आधी माझ्या वडिलांना डुकराचे पिल्लू विकले. माझ्या वडिलांनी तिला १० रुपये दिले. ‘दोतोर, पैशे चड दिल्या तुमी’ (दोतोर, आपण वाजवीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत.), असे म्हणत ती एक रुपया परत देऊ लागली.

एरव्ही एका साध्या नव्या पैशासाठीही घासाघीस करत, पण त्यांनी रुपया परत घेण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांनी तिला योग्य पैसे दिले आहेत. त्या बाई वाड्यावरील अनेकांसाठी देवदूत होत्या. त्या जन्मत: पायाळू असल्याने त्यांचा ‘पायगुण’ खूप चांगला होता. वाठ आलेल्या स्नायूंवर त्यांनी टाच घासली रे घासली की, लगेच आराम मिळत असे. अनेकांची दुखणी बरी करत वयाच्या ९८ वर्षांपर्यंत त्या जगल्या.)

१९५०च्या दशकात माझ्या आत्यांना नवीन शेजारी लाभले, ते म्हणजे बेळगावचे मोची. मोचींनी त्यांच्या घराची बाजू बदलली, परिणामी आमच्या बाजूला मातीची भिंत ओलसर झाली. फेस्ताच्या हंगामात आतेंनी ओलसर होणारी भिंत पडू नये म्हणून गवंडी बोलावून बांधकाम सुरू केले. मोचींनी न्यायालयाच्या आदेशाने काम बंद पाडले. माझ्या आतेंनी अ‍ॅड. आंतोनियो ब्रुटो दा कोस्ता यांना पाहणी करण्यासाठी विनंती केली.

त्यांनी जागा पाहिली आणि एकाच सुनावणीत स्थगिती आदेश काढला. १९७९मध्ये, मी स्वत:च्या जमिनीत एका सरळ रेषेत समोरचा व्हरांडा वाढवत होतो व त्याचे काम अर्ध्यावर पोहोचले होते, तेव्हा शेजारी शंके यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अर्थात त्यांच्या दाव्यात काहीच दम नसल्याने तो टिकला नाही व लगेच निकाली निघाला. काम पूर्ण झाले आणि १९९०मध्ये शंके यांनी त्यांचे घर मला विकले. फालेरो हाऊस, सध्या अस्तित्वात असल्याप्रमाणे, गोम्स घराच्या पूर्वेकडील अर्धा भाग आणि पायसांव परेरा हाउस असे मिळून बनले आहे.

ती होती सेंट अ‍ॅनची. फ्लोरेस हाउसपासून कुलासो हाउसपर्यंतच्या घरांची रांग एकेकाळी फ्रिअर्स किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी व्यापलेली होती, अशी पूर्वापार समजूत चालत आलेली होती. त्यांनीच ती मूर्ती भिंतीत लपवली असण्याची शक्यता आहे. कायतान जुझे यांनी ही मूर्ती घराच्या हॉलमध्ये ठेवली. एके दिवशी, त्यांच्या घरी व्हिसर आले होते व मुर्ती पाहून ते म्हणाले की, या मूर्तीची खरी जागा चर्चमध्ये आहे.

त्यांच्या म्हणण्यावरून मूर्ती चर्चमध्ये नेऊन ठेवण्यात आली आणि काही दिवसांतच अलुइसो चालायला आणि बोलायला लागला!

कायतान जुझे यांचा सर्वांत धाकटा मुलगा वगळता सर्वांची लग्ने झाली व त्यांनी संसार थाटले. तथापि, सर्वांना कामानिमित्त इतरत्र राहावे लागले. २०व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीपासून बांदा-असोळणा येथील फ्रान्सिस्को ऑप्तासिओ आल्मेदा यांना घर भाड्याने देण्यात आले. हे आल्मेदा सासष्टी तालुका प्रशासनात दीर्घकाळ कारकून म्हणून कार्यरत होते.

१९२३ मध्ये, आल्मेदा यांचा मुलगा, रोक सांतान यांनी कॅथलिक शैक्षणिक संस्था सुरू केली, जी आजच्या होली स्पिरिट संस्थेची पूर्ववर्ती आहे. (पाऊण शतकापूर्वी, आणखी एक रोक सांतान ग्रासिअस यांनी सेंट टियोटोनियो युनियन हायस्कूल सुरू केले होते, जे आजच्या लोयोला हायस्कूलचे पूर्ववर्ती आहे. जेव्हा मला लॉयोला बोर्डिंग आणि शाळेतून इयत्ता दहावीत असताना हाकलून लावले तेव्हा १९७२मध्ये मी होली स्पिरिट इन्स्टिट्यूटमधून एसएससी, इयत्ता अकरावी पूर्ण केली.)

त्यांच्यानंतर आणखी एक आल्मेदा भाडेकरू म्हणून राहायला आले. अंजोस आल्मेदा हेही असोळणा येथीलच होते व हॉस्पिसियो येथे पुरुष परिचारिका होते. त्यांचे भाऊ, जुझे फ्रेमिओथ आल्मेदा हे पोर्तुगीज इंडिया कस्टम्सचे प्रमुख होते - त्यांचा मुलगा, डॉ. जे. सी. आल्मेदा, आयएएस, १९६१नंतर गोव्यात मुख्य सचिव होते. अंजोस, त्यांची पत्नी फिलिपिना आणि त्यांचे तीन मुलगे आणि एक मुलगी हे माझे जवळपास तीन दशकांचे जवळचे शेजारी होते. पायसांव परेरा कुटुंबीयांनी १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस हे घर फालेरो कुटुंबाला विकले आणि आता हे घर फालेरो हाउसचाच भाग झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT