Mapusa Master plan Dainik Gomantak
ब्लॉग

Mapusa मास्टर प्लॅनच्या प्रतीक्षेत

म्हापसा (Mapusa) शहराचा विकास मास्टर प्लॅननुसारच (Master Plan) करण्यात येणार

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापसा (Mapusa) शहराचा विकास मास्टर प्लॅननुसारच (Master Plan) करण्यात येईल, असे अभिवचन निवडणुकांच्या दरम्यान स्थानिक आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी कित्येकदा देऊनही त्या आश्वासनांची पूर्ती काही होऊ शकली नाही. या मतदारसंघात सलगपणे पाच वेळा निवडून आलेले तत्कालीन आमदार फ्रांसिस डिसोझा तसेच त्यानंतर त्यांचे पुत्र आमदार ज्योशुआ डिसोझा यांना या बाबतीत यश आलेले नाही. नियोजित आराखड्यानुसारच या शहराचा विकास व्हावा यासाठी म्हापसावासीय गेल्या सुमारे वीस-पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. (The development of Mapusa city will be as per the master plan)

नियोजित प्लॅन चांगलाच आहे; परंतु, त्याची कार्यवाहीच होत नाही, हेच म्हापसावासीयांचे दुखणे बनून राहिले आहे. म्हापशाच्या आमदारांची पाठराखण करणाऱ्या सत्ताधारी भाजपपुरस्कृत गटातील नगरसेवकांनी व स्थानिक आमदारांनीही मास्टर प्लॅनच्या कार्यवाहीबाबत आवाजही काढलेला नसल्याने तो प्रस्ताव दीर्घकाळ रेंगाळत पडला आहे. सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार फ्रांसिस डिसोझा यांनी म्हापसा शहराचा विकास मास्टर प्लॅननुसारच करण्यात येईल, असे निवडणूकपूर्व जाहीरनाम्यांतून स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्‍या पुढाकाराने मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एकोणीस जणांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ मंडळीच्या समितीची (‘टास्क फोर्स’ची) स्थापनाही करण्यात आली.

‘टास्क फोर्स’ची घोषणा करतेवेळी मागील आमदारांनी काही महत्त्वाच्या विषयांपैकी त्रासदायक ठरणाऱ्या शहरातील धोकादायक पेट्रोल पंपांचे शहराबाहेर स्थलांतर करणे, सुसज्ज असे बसस्थानक, रवींद्र भवन, नियोजनबद्ध अशी पार्किंग व्यवस्था अशा प्रकारचे महत्त्वाचे विषय मास्टर प्लॅनच्या माध्यमातून सोडवण्यात येतील, असे आश्वासन म्हापसावासीयांना दिले होते. मार्च 2015 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळीसुद्धा भाजपपुरस्कृत म्हापसा विकास आघाडीच्या नेतृत्वाने तसेच तत्कालीन आमदार फ्रांसिस डिसोझा यांनी मास्टर प्लॅनच्या कार्यवाहीचे अभिवचन दिले होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले व त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आमदारपदी निवडून आले. परंतु तेसुद्धा या प्लॅनच्या कामाला चालना देऊ शकले नाहीत.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या एकोणीस जणांच्‍या तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन केली होती तीची एकसुद्धा अधिकृत बैठक घेण्यात आलेली नाही, अशी माहिती आरटीआय अर्जामुळे स्पष्ट झाली होती. त्यानंतरही त्या समितीची एकही बैठक झाली नाही, असे उघडकीस आले आहे. अशा पद्धतीने अपेक्षांबाबत म्हापसावासीयांचा पूर्णत: भ्रमनिरास झालेला आहे.

आमचा जाहीरनामा

  • ∙ विशिष्ट मुदतीत

विकासकामे मार्गी लावणे

  • ∙ दीर्घ काळ रेंगाळलेल्या प्रकल्पांना चालना देणे

  • ∙ कचरा विल्हेवाट

प्रकल्पाचा पाठपुरावा करणे

∙ म्हापसावासीयांना गणेशविसर्जन करणे सोयीचे होण्यासाठी तार नदीची साफसफाई करणे

∙ सर्व विद्यालयांसाठी संयुक्त

निवडून आलेल्या आमदाराने स्वार्थासाठी पक्षांतर करू नये. अशा पद्धतीने त्याने नीतिमूल्यांचे पालन केले तरच तो भ्रष्टाचारमुक्त राहू शकतो. म्हापशाच्या आमदाराने सर्वच बाबतींत इतर आमदारांनाही आदर्श घालून दिला पाहिजे.

- भाई मोये, मगोपचे ज्येष्ठ कार्यकर्ते

म्हापशात पुरेशा प्रमाणात विकासकामे झालेली नाहीत हे प्रकर्षाने आढळून येते. अर्थसंकल्पातील निधी नेमका कुठे जातो, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. स्वत:ची कर्तव्ये ओळखणारीच व्यक्ती आदर्श आमदार होऊ शकते.

- सिद्धी नाईक, समाजसेविका.

सर्व लोक दिवसभर नोकरी-व्यवसायात व्यग्र असल्याने आमदार सकाळी सकाळीच लोकांना उपलब्ध व्हावा. अन्य शहरांच्या विकासाच्या तुलनेत म्हापसा शहर खूपच मागे असल्याने त्या अनुषंगाने आमदाराने कार्यरत राहावे.

- आनंद भाईडकर,नगरसेवक

-सुदेश आर्लेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT