God Lakshmi Narayan Dainik Gomantak
ब्लॉग

Holy Spirit Church: जेझुइस्टनी होलीस्पिरिटला चर्च समर्पित करणे विस्मयकारक

सासष्टीतील मंदिरे पडून चर्च उभारण्याचा प्रारंभ लक्ष्मीनारायण मंदिराने झाला

गोमन्तक डिजिटल टीम

होली स्पिरिट चर्चसाठी पाडण्यात आलेले देऊळ, लक्ष्मीनारायणाचे होते की, दामोदराचे होते, असा संभ्रम निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत.

दामोदर हे भगवान विष्णूचे 367 वे नाव आहे. नारायण हा भगवान विष्णूचा अवतार आहे. सश्रद्ध मनाला दोनही एकच भासतील. पण, इथेच ग्यानबाची मेख आहे.

मठग्रामचा दामोदर हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. विष्णू आणि शिव परस्पर भिन्न आहेत - एक संरक्षक आणि दुसरा संहारक आहे. गोव्यातील त्यांचे अनुयायी सामान्यतः ‘उभे’ (वैष्णव लोक कपाळावर उभे भस्म लावतात) आणि ‘आडवे’ (स्मार्त किंवा शैव कपाळावर आडवे भस्म लावतात) म्हणून ओळखले जातात.

हे दोन्ही गौड सारस्वत ब्राह्मण समुदाय ऐतिहासिकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. एकमेकांविरुद्ध खटले दाखल करणे, गव्हर्नरकडे तक्रारी करणे आणि लिस्बन क्राउनकडे याचिका दाखल करणे नेहमीचेच झाले होते.

19 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत एकमेकांच्यात रोटीबेटी व्यवहारही होत नसत. याला सर्वप्रथम छेद धेंपे आणि कुंडईकर कुटुंबांनी आपल्या मुलांचा विवाह करून दिला.

आता जे होली स्पिरिट चर्च आहे त्याच्या पुनर्बांधणीसाठी उत्खननादरम्यान भगवान विष्णूची एक प्राचीन मूर्ती सापडली. दामोदर मंदिरावर चर्च बांधले असते तर भगवान शिवाची मूर्ती सापडली असती, भगवान विष्णूची नाही.

ही मूर्ती राशोल किल्ल्यावर ठेवण्यात आली. (तसेच आठव्या शतकातील चतुर्मुखी मूर्ती, अकराव्या शतकातील सूर्यनारायणाची मूर्ती आणि एका अज्ञात देवतेची मूर्ती सापडली, जी राज्य संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.)

लक्ष्मी-नारायण मंदिर हे कदाचित मठग्राममधील सर्वांत जुने मंदिर होते. कारण ते मठग्रामातील पहिल्या इंडो-आर्यन वस्तीच्या केंद्रस्थानी होते. समकालीन पोर्तुगीज इतिहासकार म्हणून, क्रिस्टीना ओस्वाल्ड ‘जेझुइट आर्ट इन गोवा बिटविन १५४२ अँड १६५५: फ्रॉम मोडो नॉस्ट्रोटो टू मोडो गोआनो’ या पुस्तकात लिहितात की, जेव्हा जेव्हा शक्य होते तेव्हा तेव्हा जेझुइट्सनी शहरांच्या अगदी मध्यभागी, मध्यवर्ती ठिकाणांजवळ किंवा मुख्य रस्त्यांवर त्यांची वसाहत स्थापन केली.

यामागचा उद्देश पांथिक आणि नागरी शक्तीस्थानांवर सामरिक प्रवेश सुलभ करणे हा होता; म्हणजे कॅथेड्रल किंवा सरकारी राजवाडा उभा करणे. पांथिक प्रतीके कायम लोकांच्या नजरेस पडावीत, अशी रचना केली जायची.

राशोल किल्ल्याचा कॅप्टन (ओ डी फोर्ट) डिओगो फर्नांडिस रॉड्रिग्स याने लक्ष्मी-नारायण मंदिर पाडले आणि त्यावर चर्च बांधले. ब्रिटिश लेखक मॉरिस हॉलने ‘विंडो ऑफ गोवा’ या पुस्तकात पृष्ठ क्र. १३४वर याचा उल्लेख केला आहे.

पण, त्यासाठी कुठलाही पुरावा दिला नाही. रॉड्रिग्सने १५६४साली लोटलीमधील एक मंदिर पाडले आणि २५ जुलै १५६७पासून, म्हणजे गोव्याचे आर्चबिशप, गॅस्पर जॉर्ज द लिओ परेरा दी ऑर्नेलास यांनी घेतलेल्या गोव्याच्या प्रांतीय परिषदेच्या पहिल्या बैठकीनंतर सासष्टीमधील मंदिरांचा मोठ्या प्रमाणावर विद्ध्वंस करण्यास सुरुवात केली.

त्यानंतरच मडगावातील मंदिरांचे स्थलांतर करण्यात आले. होली स्पिरिट चर्च पहिल्यांदा बांधून तयार झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजे १५६७साली भगवान दामोदराचे मंदिर २२ किलोमीटर दूर जांबावली येथे हलवण्यात आले.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, १५६४/६५ मध्ये जेव्हा चर्च बांधले गेले तेव्हा दामोदर मंदिर उभे होते आणि चर्च बांधण्यासाठी ते पाडले गेले नाही. लक्ष्मी-नारायण मंदिरातील मूळ मूर्ती आज जांबावली येथील श्रीदामोदर मंदिरात आहेत.

सध्याच्या चर्च ग्राउंडच्या मध्यभागी एक कच्च्या चर्चची रचना तयार करण्यात आली होती. त्या काळातील चर्चची वास्तू तैपा (बांबूचा भुसा आणि भाताच्या पेंढ्याचा ओला चिखल) भिंती, चुना आणि गुळाच्या मिश्रणाने प्लॅस्टर केलेल्या आणि कोरड्या चुडताने शाकारून बनवलेली होती.

राशोलनंतर सासष्टीतील हे दुसरे चर्च, गोव्यातील पहिले चर्च होते जे ख्रिश्चन ट्रिनिटीच्या तिसऱ्या व्यक्तीला - देव पिता, पुत्र आणि होली स्पिरिट यांना समर्पित केले गेले. हे होली स्पिरिटला समर्पित असलेले गोव्यातील सर्वांत जुने आणि फक्त तीन चर्चपैकी एक होते.

त्यानंतर १६६८साली जुने गोवे येथे बांधलेले चर्च फ्रान्सिस्कन कॉन्व्हेंटशी संलग्न होली स्पिरिट चर्च (कॉन्व्हेंट आता एएसआय संग्रहालय आहे) आणि १७१०साली बांधलेले नार्वे-दिवाड येथील किल्ल्याजवळ असलेले पॅरिश चर्च होते.

ख्रिश्चन पंथशास्त्रात होली स्पिरिट किंवा होली घोस्ट हा मुद्दा कधीच साधा, सरळ नव्हता. दुसऱ्या शतकात झालेली निसियाची पहिली परिषद असूनही मोनोफिसिट्स, एरियनिस्ट आणि इतर अनेकांनी ट्रिनिटीची कल्पना थेट नाकारली.

ट्रिनिटीचे रक्षण करणाऱ्यांपैकी काहींचा असा विश्वास आहे की होली स्पिरिट नर नसून मादी होता. बाराव्या शतकात हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला, जेव्हा त्रैक्याचा आदेश (कैद्यांच्या सुटकेसाठी आणि गंभीरपणे आजारी लोकांना समर्पित) ही सुधारणा चळवळ सुरू झाली. या चळवळीने प्रस्थापित मतप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले. म्हणूनच १६व्या-१७व्या शतकात रोमन कॅथलिकांमध्ये होली स्पिरिट पंथाचा उदय झाला.

पण शांततेने नाही. लवकरच, व्हॅटिकनने आधीच बहिष्कृत केलेल्या मिलेनेरियन लोकांनी (किंवा उथोपियन) त्यांच्या कल्पना सुधारल्या. काही कट्टर उथोपियन जेझुइट होते. ट्रेंट कौन्सिलने (१५४५-६३) उथोपियन लोकांविरुद्ध हुकूम जारी केला. होली स्पिरिट/उथोपियन आणि पोर्तुगाल यांच्यात मजबूत दुवा आहे.

हे ऋणानुबंध 16व्या शतकातील भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस यांनी स्थापित केले होते. एक सहस्राब्दी असल्याने, नॉस्ट्रॅडॅमसने दावा केला की काळाचा अंत पाचवे साम्राज्य - पवित्र आत्म्याचे साम्राज्य (बायबल हे पित्याचे साम्राज्य; गॉस्पेल, पुत्राचे साम्राज्य) म्हणून येणार आहे, अगदी त्याच्या शब्दात सांगायचे तर ‘पोर्तुगालचे साम्राज्य’ (नॉस्ट्रॅडॅमस फ्रेंच/इटालियन होता).

केवळ पोर्तुगालच्या अझोरेस बेटांमध्ये होली स्पिरिट पंथ अजूनही जिवंत, सक्रिय आणि तीव्र आहे, जो तिथल्या पांथिक अभ्यासावर वर्चस्व गाजवतो - आणि व्हॅटिकनची त्याला मान्यताही आहे.

त्यामुळे 16व्या शतकात ट्रेंटची परिषद संपुष्टात आली असताना मडगावचे चर्च जेझुुइट्सनी होली स्पिरिटला समर्पित करणे विस्मयचकित करणारे आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ''भाजपला राज्यातील विरोधकांना संपवाचंयं, पण ते शक्य नाही...'', सरदेसाईंचा हल्लाबोल!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT