गोष्टी परदेशातल्या: उम कुलथुम  Dainik Gomantak
ब्लॉग

गोष्टी परदेशातल्या: उम कुलथुम

‘उम’ म्हणजे आई. आपल्या लोकप्रियतेमुळे सर्वांचीच जणू ती आई झाली होती.

दैनिक गोमन्तक

अलेक्झांड्रिया बघायला जाताना वाटेत ‘सदात’ हे शहर लागलं. तिथे एके ठिकाणी चहा घ्यावा म्हणून आम्ही थांबलो. मला इजिप्शियन गायिका ‘उम कुलथुम’ हिची कॅसेट घ्यायची होती. मी आमच्या टूर गाईड सॅमला सांगितलं, तर तो एकदम आनंदित झालेला दिसला. तिथे बाजूला छोटी छोटी दुकानं होती. मला उम कुलथुमची कॅसेट हवी आहे म्हटल्यावर दुकानदारही खूश झालेला दिसला. उम कुलथुम ही इजिप्तमधील सर्वांत लोकप्रिय गायिका. एक भारतीय बाई आपल्या अत्यंत लोकप्रिय गायिकेची कॅसेट मागतेय, याचा कुठे तरी त्यांना आनंद-अभिमान वाटत होता. त्याने खूप कॅसेट्स दाखवल्या. त्यातली एक घ्यायचं ठरवलं. पंचवीस पौंड किंमत असलेली एक कॅसेट दुकानदाराने आम्हाला वीस पौंडाला दिली.

धार्मिक कुटुंबात जन्मलेली उम कुलथुम. तिचे वडील एका ग्रामीण भागातले इमाम होते. तिच्या आवाजाचा दैवी पोत तिच्या लहानपणीच तिच्या वडिलांच्या लक्षात आला आणि तिला त्यांनी गाण्याचं शिक्षण दिलं. वयाच्या सोळाव्या वर्षी ती कैरोला आली. पण तसा तिचा प्रभाव पडला नाही. पण काही वर्षांनी पुन्हा काही सादर करायला ती कैरोला आली आणि इजिप्शिअन लोकांच्या गळ्यातील ताईतच बनली. कैरोमध्ये ती खूप काही शिकली. कैरोमधील सांस्कृतिक मंडळामध्ये तिला सामील करून घेतलं गेलं. पुढे तिची अरबी थिएटरशी ओळख झाली आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही. तिची गाणी ऐकण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत. इजिप्शिअन लष्करासाठी तिनं दिलेलं योगदान खूप प्रसिद्ध आहे. पुढे तिने संगीत सिनेमात अभिनेत्री म्हणूनही काम केलं. ३ फेब्रुवारी १९७५ रोजी वयाच्या ७६व्या वर्षी तिचं निधन झालं. तिच्या अंत्ययात्रेला जवळपास चाळीस लाख लोक उपस्थित होते. दिवंगत राष्ट्रपतीपेक्षा जास्त उपस्थिती होती त्यावेळी. अंत्ययात्रा जिथून निघाली तिथे दोन तास अगोदर वाहतूक बंद करण्यात आली होती.

आज तिचा मृत्यू होऊन इतकी वर्षे झाली, तरी तिच्या आवाजाची मोहिनी लोकांवर अजून कायम आहे. जुन्या गाण्यांच्याच नवीन सीडीज निघतात. नवीन पिढीलाही तिचा आवाज खूप आवडतो. तिच्या नावाचं एक म्युझियमही बांधलेलं आहे, ज्यात तिला मिळालेली पारितोषिकं, तिच्या वस्तू ठेवल्या आहेत. आम्ही घेतलेली तिची कॅसेट सॅमने लगेच गाडीत लावली. वातावरणात एक भारलेपण आलं. खूप सुंदर आवाज. केवळ इजिप्त नव्हे, तर अख्खा अरबस्तान जिच्या आवाजावर डोलू लागला, त्या उम कुलथुमला मनोमन वंदन करत आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो.

-अनुजा बेंडखळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT