Anant Jain Dainik Gomantak
ब्लॉग

Drawing Festival: स्पंदन चित्रकला महोत्सव; विशेष मुलांसाठी चित्रकला प्रदर्शन

गेल्या 10 वर्षात भारतात व भारताबाहेर मिळून 132 चित्रकला प्रदर्शने मी आयोजित केली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Drawing Festival For Special Kids: स्पंदनतर्फे चित्रकला महोत्सवाची सुरुवात गोव्यातूनच झाली. 2013 यावर्षी सुरू झालेला हा महोत्सव आता ग्लोबल बनला आहे. भारतातील साऱ्या 29 राज्यात आणि 1 केंद्रशासित प्रदेशात चित्रकला प्रदर्शन आयोजित केले गेले आहे .

आतापर्यंत गेल्या 10 वर्षात भारतात व भारताबाहेर मिळून 132 चित्रकला प्रदर्शने मी आयोजित केली आहेत. चित्रकला प्रदर्शनांव्यतिरिक्त अनेक सामाजिक पुरस्कारही स्पंदनतर्फे प्रदान करण्यात येतात, विशेष मुलांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करतो वगैरे.

हे सारे कार्यक्रम मी वैयक्तिकरित्या आयोजित करतो त्यामुळे या 'वन मॅन शो'चे प्रयोजन काय हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. सुमारे दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी सहज कला अकादमीमध्ये यायचो तेव्हा तिथे अनेक कलाकारांशी माझी भेट व्हायची.

मी त्यांच्याशी बोलायचो, त्यांचा संघर्ष पाहायचो. त्यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतूने मी पहिल्यांदा एक चित्रकला प्रदर्शन आयोजित केले. खरंतर हेतू या एकाच प्रदर्शनाचा होता पण एका मागोमाग एक प्रदर्शने आयोजित होत गेली आणि प्रवास पुढे चालूच राहिला

कला ही 'वस्तू' नाही. ती कलाकाराच्या अंतरातून निर्माण झालेली निर्मिती आहे असे मला वाटते. या कलाकारांना ओळख मिळावी, त्यांना व्यासपीठ मिळावे हाच माझा हेतू आहे. कलाकारांचे एक दुसऱ्याबरोबर वैश्विक नाते निर्माण व्हावे असेही मला वाटते.

मी जरी कधीकाळी उद्योगपती होतो तरी ते आता सारे सोडून कलाप्रदर्शनांचे आयोजन हेच माझे एक ध्येय बनून राहिले आहे. त्यातून मला अतिशय समाधान मिळते इतकेच मी सांगू शकतो. भारतीय चित्रकारांची चित्रे परदेशात प्रदर्शित व्हावी यासाठी मी योजनाही बनवली आहे ज्यातून अल्प अशी फी देऊन चित्रकार आपली चित्रे माझ्याकडे पाठवू शकतात.

त्या चित्रांना परदेशी पाठवण्याचे व त्यांना प्रदर्शनात मांडण्याचे काम मी माझ्या वैयक्तिक जबाबदारीवर करतो. किमान 500 भारतीय चित्रकारांना अशाप्रकारे पाठबळ देण्याचे माझे उद्दिष्ट आहे. ज्या प्रकारे मी माझे संबंध जगभर निर्माण केले आहेत त्यातून ते शक्य होईल असा विश्वासही मला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT