Belur Dainik Gomantak
ब्लॉग

बेलूर होयसळांची राजधानी

दक्षिण भारतीय होयसाळ साम्राज्य इसवी सन १० व्या ते १४ व्या शतकादरम्यान अस्तित्वात होते. या होयसाळ साम्राज्याने सध्याच्या कर्नाटक राज्याच्या बहुतांश भागावर तसेच गोव्याच्या दक्षिण काही भागावर राज्य होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

दक्षिण भारतीय होयसाळ साम्राज्य इसवी सन १० व्या ते १४ व्या शतकादरम्यान अस्तित्वात होते. या होयसाळ साम्राज्याने सध्याच्या कर्नाटक राज्याच्या बहुतांश भागावर तसेच गोव्याच्या दक्षिण काही भागावर राज्य होते.

होयसळांच्या पहिल्या राजधानीत, बेलूर येथे प्राचीन काळी वेळापुरी, वेळूर, वेलहूर इ. नावांनी हे स्थळ ओळखले जाई. हे यागाची नदीच्या काठावर असलेल्या जुन्या तटबंदीच्या शहराच्या मध्यभागी वसलेले आहे.

विशेष म्हणजे, १२व्या शतकात इथे ऐक भव्य चेन्नकेशव मंदिराच्या बांधकामाची सुरवात झाली. (इ.स. १११७ मध्ये बांधकाम सुरू झाले, परंतु १०३ वर्षांनी पूर्ण झाले). चेन्नकेशव मंदिर परिसराविषयी आणखी एक मनोरंजक तथ्य म्हणजे इसवी सन १११७ पासून ते १८ व्या शतकातील ११८ शिलालेख तेथे सापडले आहे. हे शिलालेख मंदिराच्या बांधकामात कामावर घेतलेले कलाकार, मंदिराला दिलेले अनुदान आणि जीर्णोद्धार करण्यात आले होते याबद्दल आकर्षक तपशील देतात.जरी ते विष्णू देवाला समर्पित असले तरी, चेन्नकेशव मंदिरात शिवाचे निरूपणही आहेत, तसेच दक्षिण वाराणसी म्हणूनही त्याची ख्याती आहे.

होयसळ वास्तुशिल्प‌शैलीचा विकसित आविष्कार बेलूर येथे पाहावयास ‌सापडतो. येथील सर्व मंदिरे ३८० फुट x ४२५ फुट क्षेत्रफळाच्या तटबंदीयुक्त प्रकारात मध्यभागी असून पूर्वेकडे दोन प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी चेन्नकेशव मंदिर असून त्याभोवती कप्पे चन्निगरय, सोमनायकी, आंडाळ, वीरनारायण, आळवार संत इत्यादींची मंदिरे आहेत.

पश्चिमेकडील शंकरेश्वराचे मंदिर मात्र एका बाजूला आहे . बहुतेक मंदिरे सुस्थितीत असली तरी किरकोळ पष्ठझड व मूर्तींची मोडतोड झाल्याचे दिसून येते. येथील काही शिलालेखांनुसार ही मंदिरे इ.स. बाराव्या शतकात विष्णुवर्धन ह्या होयसळ राजाने व त्याच्या मुलाने बांधली.ही सर्व मंदिरे विशेषत होयसळ वास्तुशिल्प शैलीतील, असून चेन्नकेशव मंदिर म्हणजे या शैलीचा परिपक्व आविष्कारच .तारकाकृती विधान, गर्भगृह,अंतराल यांच्यात वास्तुरचना आढळते, तथापि येथील मदनिका आणि वेणुगोपाळ यांसारखी काही शिल्प सोडली, तर उर्वरित शिल्पांतून कलात्मक दृष्ट्या साचेबंदपणा आढळतो.

नवरंग किंवा सभामंडप व मुखमंडप वा व्हरांडा अशी सर्वसाधारण वास्तुरचना सर्वत्र आढळते. सभामंडपात अलंकृत स्तंभांवर कोरीव छत असून मंदिराबाहेरील पीठावर गज, अश्व, मानव इ. पंचथर आढळतात.भिंतींवर शिल्पांकन केलेले आढळते. बहुतेक मंदिरे बसकी असून बाहेरील भिंतींवर विपुल शिल्पांकन दृष्टीस पडते. ही सर्व मंदिरे निळसर काळ्या रंगाच्या संगजिऱ्यासारख्या मऊ दगडांची आहेत.

हा दगड खाणीतून काढल्याबरोबर अत्यंत मऊ असतो व पुढे हळूहळू कठीण बनत जातो. त्यामुळे त्यावर कलाकारांना नाजूक व बारीक कलाकुसर करणे शक्य झाले.चेन्नकेशव म्हणजे सुंदर नारायण. त्याला विजय नारायण असेही म्हणतात. विष्णुवर्धनाने (बिट्टिगदेव होयसाळ ) हे मंदिर इ.स. १११७ मध्ये तालकदच्या लढाईत चोलांचा पराभव केला त्या विजयाप्रीत्यर्थ बांधले.

मूळ मंदिर एक मी. उंच चबुतऱ्यावर त्रिकुटक पद्धतीत (तीन गाभाऱ्यांचे मंदिर) बांधले असून पीठावर हत्तींच्या रांगा आहेत. त्यातून कीर्तिमुख, बेलपत्ती, मकर-सिंह ही ज्ञापके आढळतात. योद्ध्यांची मिरवणूक चित्रित केलेली आहे. चबुतऱ्याच्या वर उभ्या मूर्ती खोदलेल्या असून त्यावरील आडव्या शिल्पपट्टीत महाभारत, रामायण इत्यादींमधील कथांचे शिल्पांकन आढळते.

याशिवाय विष्णुवर्धनाचा दरबार, त्यातील राणी शांतलादेवी, पुरोहित इत्यादींची शिल्पे थक्क करणारी आहेत.कप्पे-चन्निगरय हे या समूहातील दुसरे मंदिर. यात सुखनासी, द्वार आणि छत अलंकृत असून मंडपातील तीरशिल्पातील मदनिकांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. चन्निगरयाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शांतलादेवी या पट्टराणीने केल्याचा उल्लेख येथील शिलालेखात आढळतो. या मंदिराच्या समोरच हत्तीद्वार नावाचा दरवाजा असून तेथील छत्रीखाली उभे असलेले दांपत्य म्हणजे विष्णुवर्धन व शांतलादेवी असाव्यात, असे बहुतेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वीरनारायण, सोमनायकी, आंडाळ इ. मंदिरे तुलनात्मक दृष्ट्या लहान असूनसुद्धा त्यांवरही देवदेवता व सुरसुंदरीचे विपुल शिल्पांकन आढळते. वीरनारायण मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवरही भीमाचे भागदत्त आणि त्याचा हत्ती यांबरोबरचे युद्ध चित्रित केले आहे. आंडाळ मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावरील छत्र्यांची कलाकुसर चांगली आहे. येथेही पौराणिक कथांचे शिल्पांकन असून हत्तींच्या रांगा दिसतात.

आळवारांच्या मंदिरात रामायणातील दृश्ये खोदलेली आहेत. पश्चिमेकडील शंकरेश्वराच्या मंदिरातील जाळीकाम तसेच तांडवनृत्यातील शंकर, मकर यांच्या मूर्ती कलात्मक आहेत. येथील शिल्पाकृतींत विविधता आहे. पौराणिक कथानक आहे आणि सूक्ष्म कलाकुसरींचे नमुने आहेत.काही शिल्पांच्या खाली शिल्पकारांची नावे आहेत, त्यातील माधवन्न, जकणाचार्य, रुवरी नंदीयभट्ट इ. शिल्पी प्रसिद्ध होते.

तथापि येथील मानवी आकृत्या, विशेषत: स्त्रीप्रतिमा विविध अलंकारांनी नखशिखांत मढलेल्या आहेत. होयसळांची कलात्मक कामगिरी असंख्य मंदिरांच्या बाह्य भिंतींना करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. ही दगडी शिल्पे आणि कोरीव काम धार्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही प्रतिमांनी परिपूर्ण आहेत आणि त्यात देवतांचे चित्रण, नृत्य आणि संगीत, शिकार, लोकांचे दैनंदिन जीवन पहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

SCROLL FOR NEXT