Drawing Gomantak Digital Team
ब्लॉग

शिष्य मुळगांवकरांचाः चित्रकार श्रीकांत केरकर

गोमन्तक डिजिटल टीम

मडगांव येथील गोमंत विद्या निकेतनमध्ये लावलेल्या बालगंधर्वांच्या पूर्णाकृती पोर्ट्रेटकडे लक्ष देऊन पाहताना त्यावर थोर गोमंतकीय चित्रकार रघुवीर मुळगांवकर यांची छाप दिसल्यास मुळीच चकित होऊन जाऊ नका कारण रघुवीर मुळगांवकर यांच्या एका गोमंतकीय चित्रकार शिष्यानेच रंगवलेले ते पोर्ट्रेट आहे. रघुवीर मुळगांवकर यांच्या या शिष्याचे नाव आहे श्रीकांत सिनाय केरकर.1980 ते 2005 पर्यन्त मडगांव येथील श्री दामोदर इंग्लिश हायस्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून काम केलेल्या केरकर सरांना त्यांच्या तरुण वयात मुळगावकरांचा स्नेह लाभला.

चित्रकलेच्या उत्कट आवडीमुळे आपले कॉमर्सचे शिक्षण सोडून 1967-68 साली केरकर यांनी मुंबईला प्रयाण केले. गोव्यात त्यावेळी उच्च चित्रकला शिक्षणाची व्यवस्था नव्हती. मुंबई येथील जे.जे. स्कूल आर्टमध्ये प्रवेश घ्यावा अशी त्याची मनीषा होती. केरी (फोंडा) सारख्या लहानशा गावात एस.एस.सी.पर्यन्त शिक्षण घेतलेल्या मुलाने चित्रकलेमध्ये आपले करीयर करू पाहणे ही त्याकाळी अर्थातच अनोखी अशी बाब होती. पण त्यांच्या घरातच चित्रकलेची परंपरा असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून पाठबळच मिळाले.

जे.जे.मध्ये प्रवेश घ्यावा ही त्यांची इच्छा पहिल्या प्रयत्नात सफल झाली नाही. कारण प्रवेश परिक्षेसाठी असणाऱ्या ग्रेड परिक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मात्र जेव्हा गिरगांव येथील इडियन आर्ट स्कूलमधून ते ‘बी ग्रेड’ मध्ये पास झाले तेव्हा त्या ग्रेड सर्टिफिकेटमुळे त्यांना जे. जे. स्कूलमध्ये प्रवेश मिळाला व तिथल्या पेंटींग विभागातून आपला पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम त्यांनी चिकाटीने पूर्ण केला.

त्याच दरम्यान त्यांना रघुवीर मुळगांवकर यांच्या भेटीचा योग जुळून आला. केरकर गोव्याचे आहेत हे समजल्यानंतर मुळगांवकरांनी त्यांचे आर्टवर्क पाहून त्यावेळी दिवाळी अंकातील आतील पानावरची रेखांकने करायला  लावली. केरकर म्हणतात, ‘गुरुंचा आशीर्वाद घेऊन मी ती पूर्ण केली. त्याचमुळे असेल माझे गुरुजी रघुवीर मुळगांवकर यांच्या चित्रशैलीचा प्रभाव माझ्या चित्रांमधून जाणवत असेल.’

जे.जे. स्कूलमध्ये दुसऱ्या वर्षाला असल्यापासून केरकर मुळगांवकरांकडे जात होते. जेव्हा जे.जे.मध्ये चौथ्या वर्षाला त्यांना पाचवा क्रमांक लाभला तेव्हा मुळगांवकरांनी त्यांना बक्षीस रूपाने दोनशे रुपयांची भेट दिली होती. एकदा तर स्प्रे पेंटिंगसाठी आवश्यक असलेला क्रॉम्प्रेसर आपण विकत घेऊ शकत नाही हे त्यांनी उच्चारलेले वाक्य मुळगांवकर यांच्या कानावर येताच त्यांनी आपल्या खोलीत जाऊन तिथला कॉम्प्रेसर केरकर यांना भेट दिला. हा क्रॉम्प्रेसर अजूनही चालू आहे. केरकर म्हणतात, ‘ही भेट मला मिळालेला एक पुरस्कार आहे व मी तो जीवापाड जपतो.’ 

1976 साली जेव्हा केरकर यांचे मास्टर्स पूर्ण झाले त्याच वर्षी मुळगांवकर यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर काही कारणास्तव केरकर यांना गोव्यात यावे लागले. केरकर यांच्या चित्रकलेतील कार्याबद्दल मठग्रामस्थ हिंदू सभा, गोमंत विद्या निकेतन, राजीव गांधी कला मंदिर यांनी त्यांचा उचित गौरव केला आहे. निवृत्तीनंतरही ते कला विश्वात समरसून काम करत आहेत. शहरापासून दूर असलेल्या आपल्या निसर्गरम्य केरी गावची वेगवेगळी रूपे निवांतपणे न्याहाळण्याचा छंदही त्यांनी जोपासला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT