साळावलीचे बोटॅनिकल गार्डन बनले आकर्षणाचे केंद्र

 

Dainik Gomantak 

ब्लॉग

साळावलीचे बोटॅनिकल गार्डन बनले आकर्षणाचे केंद्र

तेरा हेक्टरच्या ऐसपैस जागेत पसरलेले साळावलीचे बॉटनिकल गार्डन (Botanical Gardens) हे साळावली धरणाइतकेच दुसरे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

दैनिक गोमन्तक

तेरा हेक्टरच्या ऐसपैस जागेत पसरलेले साळावलीचे बॉटनिकल गार्डन हे साळावली धरणाइतकेच दुसरे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. साळावली धरण जरी अजून पर्यटकांसाठी खुले झालेले नसले तरी त्या धरणावरून खाली दिसणारे हे विहंगम बोटॅनिकल गार्डन मात्र पर्यटकांसाठी (Tourist) खुले झाले आहे. खरं म्हणजे या परिसरात पर्यटक ही दोन्ही स्थळे जोडीने पाहण्यासाठी येतात. साळावली धरणावरून कोसळणारा पाण्याचा ओघ हा खूप वर्षांपासून स्थानिकांचा आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होतेच पण गेल्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले तिथले हे बोटॅनिकल गार्डनही (Botanical Gardens) त्यांना या स्थळावर पूर्ण दिवस घालवण्यासाठी सोयीचे ठरते आहे.

या गार्डनमध्ये (Garden) वेगवेगळी फुलझाडे आहेतच पण तिथे असणारे चिल्ड्रन पार्क, रॉकगार्डनही देखील पर्यटकांना (Tourist) आनंद देतात. पायी चालत या बॉटनिकल गार्डनची सैर करण्यासाठी किमान एक तास तरी लागतो. चालण्याची जर तयारी नसेल तर या गार्डनमध्ये असलेल्या सायकल ट्रॅकवरून आपण सायकल भाड्याने घेऊन गार्डनची फेरी पूर्ण करू शकता. एकंदर दहा सायकली (Bicycle) त्यासाठी तिथे तैनात आहेत.

त्याशिवाय आता या गार्डनमध्ये निवासाची सोय असणारी कॉटेजेसदेखील उपलब्ध होणार आहेत. एकंदर सात कॉटेजेसपैकी तीन कॉटेजेस बांधून तयार आहेत. चौथ्या कॉटेजेसचे बांधकाम चालू आहे. ही चौथी कॉटेज पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांची या जागेवर निवासाची ही सोय होईल. सध्या जरी तिथे जरी कॅन्टीनची व्यवस्था नसली तरी जेवणाची सेवा आऊटसोर्सिंग करून पुरवली जाते.

गोव्यात (Goa) आढळणाऱ्या जवळजवळ साऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्याला या बॉटनिकल गार्डनमध्ये दिसतील. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी किंवा अभ्यासासाठी हे स्थळ अगदी अनुरूप आहे. गोव्यातले हे एकमेव, अशाप्रकारचे बॉटनिकल गार्डन आपल्या चारही बाजूने असलेल्या डोंगराच्या कुशीत वसले आहे. या बॉटनिकल गार्डनच्या देखरेखीवर लक्ष ठेवणारे वन अधिकारी विकासगावस यांच्या मते, एका निसर्गरम्य (Nature) परिसरात वसलेल्या या बॉटनिकल गार्डनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींची ओळख तर करून घेता येईलच पण धकाधकीच्या आयुष्यापासून दूर होऊन या ठिकाणी आपल्याला विरंगुळ्याचे क्षणही आनंदाने वेचता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT