काव्यसंग्रह Dainik Gomantak
ब्लॉग

'बिंब अस्तुरी कर्तृत्वोत्सव' सोहळ्यात 'अप्रुपाच्या वाटेर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

‘जिवाचो पतंग’ हा राधा भावे यांचा कोंकणी ललित लेखसंग्रह

दैनिक गोमन्तक

आज ‘बिम्ब अस्तुरी कर्तृत्वोत्सव’ सोहळ्यात सुप्रसिध्द कवयित्री आणि गझलकार राधा भावे यांचा ‘अप्रुपाचे वाटेर’ हा कोंकणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे.

रिवण या निसर्गसुंदर गावात जन्मलेली ही कवयित्री शांत, अबोल, मनस्वी आणि मितभाषी आहे. जन्मजात प्रतीभेचे वरदान लाभलेल्या सुजला देव आणि लग्नानंतरच्या राधा भावे बनलेली ही कवयत्री गेली चार दशकं कवितेच्या प्रांगणात हळुवार पावलं टाकत आज ‘अप्रुपाच्या वाटे’वर पोहोचल्या आहेत.

‘जिवाचो पतंग’ हा ललित लेखसंग्रह तसेच ‘उमलताना’ आणि ‘तुला भेटून येताना’ हे त्यांचे दोन काव्यसंग्रह. आजपर्यंत मराठी कवितेत आपले विशिष्ट स्थान निर्माण केलेल्या राधा भावे यांनी मराठी गजल ह्या काव्यप्रकारातही बरेच नांव कमावलेलं आहे. या कठीण काव्यप्रकाराचा त्यानी सखोल अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्रात राधा भावे याना विशेष मान-सन्मान आहे. त्यांच्या गजल सादरीकरणाच्या कार्यक्रमाना रसिकाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.

राधा भावे मराठीबरोबरच मागील कित्येक वर्षापासून कोंकणीत लेखन करत आहेत. ‘जिवाचो पतंग’ हा त्यांचा कोंकणी ललित लेखसंग्रह आला तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. आज लोकार्पण होणाऱ्या त्यांच्या काव्यसंग्रहाचे स्वागतही त्याच उत्साहात होईल यात शंका नाही.

अभिव्यक्तीच्यादृष्टीने गहिरी प्रतिकं आणि प्रतिमां आणि काव्यातल्या विशिष्ट शब्दकळा आणि तंत्रशुद्ध काव्यगुंफण यामुळे काव्यरसिकांना वेगळ्याच विश्वात नेण्याची ताकद त्यांच्या कवितांत आहे. ‘प्रेम’ हे राधाच्या काव्यातील बलस्थान आहे. प्रेम हे चिरंतन असते या सत्याचा त्याना साक्षात्कार झालेला आहे याचा प्रत्यय हा काव्यसंग्रह वाचताना येतो. मनाला एक अलौकिक आनंद देणारा तरीही हुरहुर लावणाऱ्या ह्या काव्यसंग्रहात राधा भावे प्रेमाची नानाविध रूपं प्रत्ययाला आणून देतात.

राधा भावेंच्या या काव्यसंग्रहातल्या बहुतेक कवितांमधून प्रेमाचे प्रकटीकरण झालेले दिसते. कवितेने आपल्या जीवनास दिलेला आधार स्मरत, त्यांच्या कविता वेदनांचा एकेक पापुद्रा उसवत पुढे जाताना दिसते. आपल्या 60 व्या वर्षी गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक म्हणून निवृत झालेल्या राधा भावे यांच्याकडून भविष्यात मनाला लुभावणाऱ्या काव्य आणि गजलांची अपेक्षा बाळगायला हरकत नाही.गेली दोन दशकं ‘बिम्ब’ हे कोंकणी मासिक प्रकाशित करणाऱ्या बिम्ब प्रकाशनाने आज, ‘बिम्ब अस्तुरी कर्तृत्वोत्सव’ सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.

या दिवसभराच्या सोहळ्यात राधा भावे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाव्यतिरिक्त डॉ.प्रमोद दिलीप साळगावकर आणि प्रा.प्रशांती तळपणकर यांचा बिम्ब अस्तुरी पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

पणजी,पाटो येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभाघरात बुधवार ता. 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या सोहळ्यास आरंभ होईल. पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 वाजता बिम्ब प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या गद्य आणि पद्य साहित्याचा लोकवेद संशोधिका आणि साहित्यकार डॉ.जयंती नायक तसेच गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विभागप्रमुख आणि साहित्यकार डॉ. हनुमंत चोपडेकार धावता आढावा घेतील. त्यानंतर 12 ते 1 या वेळेत राधा भावे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल.

सायंकाळच्या सत्रात, नवनिर्वाचीत आमदार दिलायला लोबो यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर या सोहळ्याचा समारोप, ‘बिम्ब अस्तुरी पुरस्कार’ प्रदानाने होणार आहे. प्रसिद्ध उद्योजक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत दत्ता दामोदर नायक, गोमन्तक दैनिकाचे संचालक संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू दा.नायक यांच्या उपस्थितीत बिम्ब अस्तुरी पुरस्कार डॉ. प्रमोद साळगांवकार आणि प्रा. प्रशांती तळपणकर यांना प्रदान करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT