Goa news  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील साहित्यिकांच्या सुवर्ण आठवणी

पणजी (Panji) मुख्यालयाच्या मैदानावर, मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आणि हल्लीच्या काळात कला अकादमीच्या सभागृहात मांडो फेस्टिवल साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

- दामोदर घाणेकर

डॉक्टर भिकाजी धोंडू कामत घाणेकर हा नात्याने माझा चुलत भाऊ असला तरी सहा चुलत भावांमध्ये माझा सर्वात जवळचा भाऊ होता. त्याचे कारण म्हणजे आमची साहित्यिक तार जुळली होती.

28 फेब्रुवारीला तिन्ही सांजेच्या वेळी माझ्या दुसऱ्या एका चुलत भावाचा फोन आला, ‘नरेंद्र भाऊविषयी तुला काही कळलं का?’ माझ्या मनात पाल चुकचुकली. कारणही तसंच होतं. ऑक्टोबरमध्ये त्याला मी अखेरच्या वेळेस पाहिला होता. तेव्हा मी मागील 58 वर्षे ओळखत असलेला तो नरेंद्र भाऊ हा नव्हताच. ‘काय झालं? गेला की....?’ दुसऱ्या बाजूने होकारार्थी उत्तर आलं. आमच्या घरातला एक कवी, मांडो फेस्टिव्हलचा तब्बल 52 वर्षांचा सूत्रधार, आरोग्य खात्याच्या आरोग्य शिक्षण कचेरीचा ताबा असताना, कोकणीतून घोषवाक्य निर्माण करणारा यापुढे दिसणार नाही ही कल्पनाच मनाला हादरवून गेली.

माझ्या आजोबांचं ‘भिकू’ या नावाचं आधुनिकीकरण धारण केलेला हा चुलत भाऊ समाजामध्ये लोकप्रिय ठरला. हिंदूंपेक्षा कॅथलिक लोकांची त्याची जवळीक होती हे निर्विवाद. ‘वावराड्यांचो इश्ट’, ‘गुलाब’ अशा नियतकालिकांमधून त्याचं लेखन होत असे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मी ‘राष्ट्रमत’मध्ये कोकणी लिहीत होतो. मला व बहिणीला आकाशवाणीची ओळख करून दिली ती त्यानेच. सार्वमत कौलावेळी त्याच्या व माझ्या बहिणीच्या कविता ‘राष्ट्रमत’मध्ये प्रकाशित व्हायच्या. आम्हा लहान चुलत भावंडांसाठी तो ‘नरेंद्रभाऊ’ होता. सगळ्यांकडे मिसळून वागणारा आणि विनोदी स्वभावाचा नरेंद्रभाऊ चतुर्थीच्या दिवसात आमच्या घराचा केंद्रबिंदूच होता.

काम्पालवर असलेल्या आरोग्य खात्याचा उपसंचालक म्हणून निवृत्त होईपर्यंत त्याने उसगाव, बेतकी अशा प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केलं. मलेरिया, एड्स असे विषय घेऊन त्याने आरोग्यावर किती व्याख्याने दिली त्याचा हिशेब लागणं कठीण आहे. ‘चलो जाव चली, भुरगीं दोनूच बरीं’ अशा आशयाची घोषवाक्ये त्याने आरोग्य खात्याच्या, आरोग्य शिक्षण मंडळातर्फे निर्माण केलेली आहेत. त्या सगळ्यांना खास असा ‘भिकाजी सुगंध’ आहे. त्याने 52 वर्षे मांडो फेस्टिव्हलची सूत्रे यशस्वीरीत्या सांभाळली. पणजी (Panji) मुख्यालयाच्या मैदानावर, मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आणि हल्लीच्या काळात कला अकादमीच्या सभागृहात मांडो फेस्टिवल साजरा केला जातो. एक गट आपला मांडो संपवून आज जातो न जातो तोच सूत्रसंचालक बाहेर यायचा. त्याला बघून प्रेक्षकांमध्ये खसखस पिकायची. लोक हसत एकमेकांना म्हणत, ‘आयलो हो!’ याचा अर्थ आता तो कसला तरी विनोद सांगेल. त्या विनोदाला त्याने नाव दिलं होतं, ‘एक ल्हानशी गजाल’. पण ती ‘ल्हान गजाल’ प्रेक्षकांच्या पोटात हसून हसून ‘दुख’ घालायची. मांड्यापेक्षा लोक त्याच्या गजालींचीच अधिक वाट पाहायचे.

कवितांची त्याची पुस्तके ढिगभर आहेत. कवितेसाठी (Poem) त्याला अमुकच एक विषय हवा असे नव्हतेच. कसल्याही विषयावर कविता व्हायची. अपोलो 13 ची बॅटरी निकामी झाली आणि ते यान चंद्रावर न उतरताच परत आणावं लागलं- त्यावरसुद्धा भिकाजीची कविता आहे. आमच्या वाडवडलांच्या घरात यंदा गणेश चतुर्थी कशी होणार देव जाणे. आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कवितांचे वाचन आणि त्यांच्या रचनांच्या गायनांचा कार्यक्रम मिनेझीस ब्रागांझा सभागृहात संध्या. 5 वा. होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT