Goa |
Goa | Dainik Gomantak
ब्लॉग

नाट्यशिबिर केवळ नाटकासंबंधी नसते तर...

दैनिक गोमन्तक

नाट्यशिबिर हे केवळ नाटकासंबंधी नसते. ते खरे तर आपल्या कल्पनाशक्ती संबंधाने, आपल्या शरीर वापराच्या शक्यतेसंबंधाने आपल्याला सज्ज करण्याचा प्रयत्न करते. ते आपल्याला रंगमंचीय अवकाशाच्या शक्यतेबद्दल सांगते.

नाटक (Drama) हा ज्या सांघिकतेचा अविष्कार असतो, ती सांघिकता कशी बाणवावी याची माहिती देते. बालवयातली नाट्यशिबिरे म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीला उत्सर्जित करण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण असते. असेच एक 19 दिवसांचे नाट्य शिबिर येत्या रविवारी आपल्या समाप्तीकडे येत आहे. ‘अभय थिएटर अकादमी’चे हे नाट्यशिबिर साखळी येथे सध्या सुरू आहे.

19 दिवसांच्या या नाट्य शिबिरात विद्यार्थ्यांना आंगिक अभिनय, वाचिक अभिनय, उत्स्फूर्तता, समयसूचकता, एकाग्रता, कल्पनाविस्तार, सभाधीटपणा आदी, नाट्याभिनयासाठी आवश्यक असलेल्या गुणांची ओळख करून देण्यात आली.

शरीराची भाषा म्हणजे काय हे प्रात्यक्षिकांसहित या नाट्यशिबीरात प्रशिक्षणार्थ्यांनी समजून घेतले. शारीरिक हालचालींच्या अभ्यासावर या नाट्यशिबिरात भर दिला गेला होता. आंगिक अभिनयाबरोबरच वाचिक अभिनयाचे प्रशिक्षणही या शिबिरात विद्यार्थ्यांना दिले गेले.

व्यक्तिरेखा प्रगटीकरणात संवादांना खूप महत्व असते. संवादातील चढ-उतार, नेमक्या शब्दांवर दिलेले वजन, त्यांचे उच्चारण, वाक्यादरम्यान होणारा विरामांचा वापर, शब्दफेक यातून व्यक्तिरेखा आकार घेत असतात.

आंगिक, वाचिक कौशल्याबरोबरच सांघिक भावना देखील नाटकाच्या उत्तम आविष्कारासाठी आवश्यक असते. नाट्यकलाकार म्हणून आवश्यक असलेल्या या साऱ्या गुणांचा विकास साधणारे विविध नाट्यखेळ या शिबिरात प्रशिक्षणाचा भाग होते.

या नाट्यशिबिरात निसर्ग व माणसाचे व्यवहार यावर प्रकाश टाकणाऱ्या एका बालनाट्याची रचनाही करण्यात आली आहे. मानव एक निसर्गाचाच घटक आहे.

परंतु स्वतंत्रपणे विचार करू शकणारा, स्वतःला फार बुद्धिमान समजणारा व अवकाशाला गवसणी घालू इच्छिणारा हा मानव प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास कसा करत आहे आणि स्वतःच्याच पायावर कशी कुऱ्हाड मारून घेत आहे याचे दर्शन घडवणारे हे बालनाट्य आहे. बालनाट्याच्य विषयाचा, कथेचा आणि आशयाचा विस्तार विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना आविष्कारातून घडवला आहे.

या बालनाट्य शिबिराचा समारोप समारंभ रविवार दिनांक 15 मे रोजी, सायंकाळी 7 वाजता, शिवस्मृती सभागृह, हरवळे, साखळी येथे संपन्न होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान निर्माण करण्यात आलेल्या बालनाट्याचे सादरीकरण या समारोप समारंभावेळी होईल.

प्रमुख पाहुणे चित्रकार शिवानंद खेडेकर त्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. या शिबिराचे संचालन रंगकर्मी अभय जोग करत आहेत. आसावरी कुलकर्णी ह्या या शिबिराच्या समन्वयक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT