Guru Purnima Dainik Gomantak
ब्लॉग

Guru Purnima: इतिहासात गुरू-शिष्यांच्या जोड्या आहेत

पूर्वी संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा (Guru Purnima) उत्साहाने आणि मनोभावे साजरी केली जायची. त्यानिमित्ताने गुरूचे शिष्याकडून पूजन व्हायचे.

दैनिक गोमन्तक

गुरू (Guru Purnima) म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. अगदी प्राचीन काळापासून गुरू-शिष्याचे नाते आपल्याला पाहायला मिळते. अनेक शिष्यांमुळे गुरुचे नाव मोठे झाल्याचेही आपण पाहत आलो आहोत. आजच्या काळात मात्र गुरू आणि शिष्य व्याख्याच बदलली आहे. (Gurupournima is celebrated on the day of Ashadi Pournima)

इतिहासात अशा काही गुरू-शिष्यांच्या जोड्या आहेत की, त्या कायम लक्षात राहतील. उदा. विशिष्ठ ऋषी-राजा दशरथ व श्रीराम, द्रोणाचार्य-कौरव व पांडव, सांदीपनी ऋषी-श्रीकृष्ण व बलराम (सांदीपनी ऋषींनी तर कृष्णाला चौसष्ट कला शिकवल्या होत्या), महर्षी विश्वामित्र-राम व लक्ष्मण, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद. संत परंपरेतही गुरुचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे. चांगदेवांचे गुरू नामदेव, नामदेवांचे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरांचे निवृत्तीनाथ असे होते.

अनेक ग्रंथांचे कर्ते व्यासमुनी यांचा जन्म आषाढी पौर्णिमेला झाला होता. त्यांचे शिष्य वैशंपायन. त्यामुळे आषाढी पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही मानली जाते. आपल्या भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात गुरूपौर्णिमा मनोभावे साजरी केली जाते. गुरू पौर्णिमेनिमित्त संगीत विद्यालये, संगीत वर्ग यांच्या तर्फेही गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम दरवर्षी केले जायचे, परंतु गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे त्‍यावर बंधने आल्याने हे कार्यक्रम होऊ शकले नाहीत याची रुखरुख शिष्य गणांना लागून राहिली आहे.

पुरातन काळापासून अव्याहतपणे चालत आलेल्या संपन्न अशा भारतीय अध्ययन परंपरेत ‘गुरू’ या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना, या गुरू-शिष्य नात्याला वैशिष्ट्यपूर्ण अधिष्ठान आहे. काळ बदलला तरी भारतीय अध्ययन परंपरेत केवळ संगीत क्षेत्रात गुरू-शिष्य हे नाते आजही अबाधित राहिले आहे.

पूर्वी संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा उत्साहाने आणि मनोभावे साजरी केली जायची. त्यानिमित्ताने गुरूचे शिष्याकडून पूजन व्हायचे. गुरूप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्या अध्ययनाचा यथोचित मान राखण्यासाठी मानधनाच्या स्वरूपात गुरूला ‘गुरुदक्षिणा’ देऊन व नमस्कार करून त्याचा आशीर्वादही घेतला जायचा. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा वर्षातून एकदाच साजरी केली जात असली तरीसुद्धा शिष्यांकडून वर्षभर गुरूचा प्रत्येक बाबतीत योग्य बहुमानही राखला जायचा. परंतु आज भारतात हे चित्र सर्वाधिक प्रमाणात केवळ संगीत क्षेत्रातच दिसून येते. तरीसुद्धा गुरुपौर्णिमेची महती याही क्षेत्रात आता काळानुसार हळूहळू कमी होत चालली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

अध्यापन-अध्ययनाच्या बाबतीत अन्य सर्व क्षेत्रांत गुरू-शिष्य हे आता एक ऐेतिहासिक सत्य बनून राहिलेले आहे. काळाच्या ओघात त्या दिवसाचे महत्त्व लोप होत चाललेले असले तरी संगीत क्षेत्रात गुरुपौर्णिमेची महती आजही आहे. निदान संगीत क्षेत्रात तरी गुरूप्रतिचा तो आदरभाव थोड्याबहुत प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे, ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT