ramayana And Mahabharat Dainik Gomantak
ब्लॉग

गोमंतपुराण : महाकाव्यांतील भूगोलाचा ऐतिहासिक उल्लेख

दैनिक गोमन्तक डिजिटल

तेनसिंग रोद्गीगिश

महाकाव्यांना आपण सत्य किंवा काल्पनिक मानत असलो तरी त्यांनी दिलेली परिस्थितीजन्य माहिती इतिहासाचा समृद्ध स्रोत आहे; खास करून ज्या कालावधीविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही. आम्ही आजचा कोकण, गोमंतभूमी जाणून घेण्यासाठी त्यांच्या निसटलेल्या पैलूंचा शोध घेत आहोत.

कोरड्या पडलेल्या सरस्वती नदीमुळे तिच्या तीरावरील लोकांचे स्थलांतरण आपण पाहिले आहे. ज्यांनी कोकण किनारपट्टीवर उतरण्यासाठी समुद्रातून प्रवास केला, त्यांच्याविषयीची माहिती आपण गेल्या काही लेखांतून घेतली.

पण जे पूर्वेकडे यमुना आणि गंगा यांच्या सुपीक खोऱ्यात गेले त्यांचे काय? हा प्रश्न आम्ही आधी विचारला आहे: त्यांचे काय झाले आणि जे विंध्य आणि नर्मदा ओलांडून दक्षिणेकडे निघाले, ते कुठे गेले? कारण त्यांच्यातही आपल्या अस्तित्वाची काही मुळे नक्कीच दडलेली आहेत. रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांमधून काही माहिती मिळते का ते आपण पाहू.

ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या आसपास रामायण रचले गेले. (संदर्भ :शर्मा, १९७१ : अ सोशिओ पोलिटिकल स्टडी ऑफ वाल्मिकी रामायण, ५) रामायणाचा रचनाकाल ख्रिस्तपूर्व ७२०० आहे, असे मत डॉ. पद्माकर वर्तक आपल्या ‘वास्तव रामायण’ या पुस्तकात करतात. महाभारत ख्रिस्तपूर्व १५०० किंवा थोड्या नंतर रचले गेले.

(संदर्भ : वाल्दिया, २०१२ : जॉग्रफी, पीपल्स अँड जिओडायनॅमिक्स ऑफ इंडिया इन पुराण अँड एपिक्स, ११). महाभारताचा कालखंड ख्रिस्तपूर्व १७९२ असावा. (संदर्भ : भटनागर, २०१४ : ऍस्ट्रॉनॉमिकल डेटिंग फ्रॉम ऋग्वेद टू महाभारत, ६३). महाभारत युद्धाचा काळ ख्रिस्तपूर्व ३०६७ असावा. (संदर्भ : बी. एन. नरहरी आचार, २०१४ : रीव्हिसिटिंग द डेट ऑफ महाभारत वॉर : मकल मेथड्स युजिंग प्लेनेटरिअम सॉफ्टवेअर, ६१). या तारखा अगदी वेगवेगळा काळ दाखवत असल्या तरी त्या सूचक आहेत.

महाकाव्यांपैकी एकही बहुधा एकटाकी, मूळ व एकाच लेखकाने लिहिलेले उपलब्ध नाही. त्यात अनेकांनी विविध काळात बदल केले आहेत किंवा जोड दिली आहे. महाकाव्ये या अनेक शतकांपासून विकसित झालेल्या स्तरित कथा आहेत; उद्धृत केलेल्या तारखा महाकाव्याच्या सुरुवातीच्या आवृत्त्या किंवा प्रारंभिक लिखाण अंदाजाने सांगतात. ‘आता यात काही शंका नाही की महाभारताच्या मजकुरात अनेक बदल झाले आहेत’, असे मत पुण्याच्या भांडारकर ओरिएन्टर रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या ‘महाभारत मीमांसा’चे मुख्य संपादक विष्णू सीताराम सुकथनकर यांनी म्हटले आहे.

(संदर्भ : सुकथनकर, १९३३ : द महाभारत, खंड. १, ३). तसेही पाहता नेमक्या तारखा आपल्यासाठी फारशा महत्त्वाच्या नाहीत. महाकाव्यांद्वारे प्रदान केलेली माहिती सामान्य युगात समाप्त होणाऱ्या दोन किंवा तीन सहस्राब्दी, म्हणजेच सरस्वती खोऱ्यातील रहिवाशांच्या निर्गमनाच्या सुरुवातीपासून उपखंडातील वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती केलेल्या कालखंडापर्यंत आहे.

महाभारताची भौगोलिक अभिमुखता पश्चिमेपासून पूर्वेकडे झाली आहे, तर रामायणाचा भौगोलिक प्रवास उत्तर ते दक्षिण असा आहे. या केवळ भौगोलिक वर्णनाच्या क्षुल्लक गोष्टी नाहीत, तर महाकाव्यांनी दिलेल्या माहितीचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

महाभारत वरवर पाहता आर्यांच्या त्यांच्या जन्मभूमीपासून वायव्येकडील यमुना-गंगा दोआबपर्यंत आणि त्यापलीकडे असलेल्या पूर्वेकडील प्रवासाची नोंद करते, तर रामायण विंध्य आणि नर्मदा ओलांडून द्वीपकल्पाच्या अगदी टोकापर्यंतचा त्यांचा प्रवासाचे वर्णन करतो. तुम्हांला लगेच लक्षात येईल की, दोन्ही महाकाव्ये आपल्या स्वतःच्या इतिहासाला पूरक आहेत.

महाभारत जिथे घडते ते आजच्या दिल्ली किंवा आसपासच्या प्रदेशात. सरस्वती खोऱ्यातून निघाल्यानंतर ते कुरु-पंचालाचे केंद्र होते, आर्यांचे नवीन केंद्र. महाभारताचा सर्वांत मनोरंजक भाग असा आहे की त्यातील मुख्य नाटकीय व्यक्तिरेखा - मुख्य नायक आणि खलनायक - ब्राह्मण नाहीत.

आपण आधी पाहिल्याप्रमाणे, सरस्वती खोऱ्यातील आर्य स्वतःला ब्राह्मण म्हणत आणि इतर क्षत्रिय. अखेरीस त्यांनी आर्यांमध्ये स्वत:चा समावेश केला असला तरी, त्यांनी त्वचेच्या रंगावरून ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात स्पष्ट फरक राखला.

महाभारतातील सर्व मुख्य पात्रे क्षत्रिय आहेत. पांडव आणि कौरव हे क्षत्रिय आहेत; तसेच कृष्ण आणि शकुनी आहेत. महाभारताचा विस्तार मनोरंजक आहे. महाकाव्याची मुख्य खलनायक गांधारी, कौरवांची आई आणि शकुनीची बहीण, गांधारपासून सिंधूच्या पश्चिमेला - सरस्वती खोऱ्यात राहणारी आहे.

जरासंध आणि कृष्णाचे मामा कंसाचे सासरे, मगधच्या दुसऱ्या टोकाचे आहेत. अत्यंत पश्चिमेला गांधार ते अगदी पूर्वेला मगधपर्यंत पसरलेले नातेसंबंध आणि परिणामी कौटुंबिक कलह हे महाभारताचे वैशिष्ट्य आहे. गांधारीचा विवाह कुरु राज्याचा सर्वांत मोठा राजकुमार धृतराष्ट्राशी झाला, जो नंतरच्या चार प्रमुख जनपदांपैकी एक होता.

महाभारताच्या लोककथांमध्ये शकुनीच्या कुरुंविरुद्धच्या क्रोधाचा परिणाम गांधाराला हस्तिनापुराशी झालेल्या युद्धात भोगावा लागला. शकुनीचे सर्व भाऊ मारले गेले. मग मोठा प्रश्न असा आहे की, जर महाभारत हे सर्व क्षत्रियांबद्दल आहे, तर ते वायव्येकडील आर्यांच्या त्यांच्या जन्मभूमीपासून यमुना-गंगा दोआबपर्यंतच्या पूर्वेकडील स्थलांतरांचे दस्तऐवजीकरण कसे करू शकते?

महादेवन म्हणतात त्याप्रमाणे, महाभारताबद्दल काहीतरी अधिक रहस्यमय आहे. महाकाव्याचा व्यास टप्पा, तथाकथित जय भारत, कदाचित मौखिक परंपरेने, कुरु क्षेत्रातील जमीन आणि भूभागासाठीच्या युद्धाविषयीची मांडणी म्हणून क्षत्रियांमध्ये एकमताने सुरू झाला.

(संदर्भ : महादेवन, २००८ : ऑन द सदर्न रिसेन्शन ऑफ द महाभारत, ब्राह्मण माइग्रेशन अँड ब्राह्मी पॅलेग्राफी, इलेक्ट्रॉनिक जर्नल ऑफ वैदिक स्टडीज, खंड १५.२, ११) याचा अर्थ सोप्या शब्दात असा आहे की, महाभारत ही बहुधा स्वतःचा इतिहास नोंदवणारी एक क्षत्रिय लोककथा होती. जिचा येणाऱ्या आर्यांनी त्यांच्या वेदोत्तर ग्रंथांच्या भांडारात स्वीकार केला आणि बहुधा ती लिखित स्वरूपात मांडली होती. आर्यांनी महाभारताची लोककथा स्वीकारण्याचे एक संभाव्य कारण म्हणजे ऋषी विश्वामित्र यांच्या नेतृत्वाखालील उत्तर-पश्चिम भारतातील आर्य आदिवासी राज्यांमधील लढाई. युद्ध जिंकलेल्या राजा सुदासच्या विरुद्ध ही लढाई झाली होती.

(संदर्भ : ग्रिफिथ, १८९६ : द हाइम्स ऑफ ऋग्वेद, खंड ७, स्तोत्र १८, ३३ आणि ८३) महादेवन यांच्या मते, बहुधा ख्रिस्तपूर्व सुमारे ५००-३०० हा कालावधी असा असावा की ब्राम्हणांनी प्रथम महाकाव्य केले आणि त्याला पाचव्या स्थानाचा दर्जा दिला. त्यानंतरचे महाभारत स्थलांतरित ब्राह्मणांनी प्रायद्वीप ओलांडून नेले हे त्यांच्या स्थलांतराच्या मार्गक्रमणाला अधोरेखित करते, ज्याचा वेध आपण पुढील लेखात घेऊ.

परंतु या टप्प्यावर आपण एक निष्कर्ष असा काढू शकतो की, जेव्हा दुष्काळ पडल्यामुळे स्थलांतरित झालेले आर्य जेव्हा नवीन जागा शोधत आले, तेव्हा संपूर्ण इंडो-गंगेच्या मैदानावर क्षत्रियांचे वास्तव्य होते. परिणामी एक अद्वितीय सांस्कृतिक एकत्रीकरण झाले; अर्थात, त्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा होता: क्षत्रिय-ब्राम्हण संस्कृतीचे वडूकर आणि तामीळ यांच्या संस्कृतीचे मिश्रण - ज्याने समकालीन भारताचा सनातन वारसा निर्माण केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT