Goa University  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa University : कृष्णविवर

Goa University : विद्यापीठात काय संशोधन चालते यावर विद्यापीठाची गुणवत्ता अवलंबून असते. प्रत्यक्षात गोवा विद्यापीठ पूर्णपणे संशोधनकंगाल झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

गोवा विद्यापीठ हे एक कृष्णविवर बनले आहे. गोवा विद्यापीठाच्या कारभारावर व कार्यक्षमतेवर कोणतीच चर्चा सार्वजनिक व्यासपीठावर होत नाही. गोवा विद्यापीठावर विधानसभेत कधी चर्चा झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. वृत्तपत्रांच्या व टीव्ही चॅनल्सच्या संपादकांनी गोवा विद्यापीठाकडे दुर्लक्ष केले आहे.

विद्यापीठाच्या कुलपतीपदी राज्यपालांची निवड करणे हेच मुळी चुकीचे आहे. कारण राज्यपाल हे राजकीय पद आहे. विद्यापीठाचे कुलपती व कुलगुरू हे शैक्षणिक क्षेत्रातील असावेत. माझ्या देशविदेशांच्या प्रवासांत मी इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड, कँब्रिज, अमेरिकेतील हावर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत.

ह्या विद्यापीठांच्या वास्तू व ह्या वास्तूभोवतालचा परिसर (campus) ह्यांची अतिशय कौशल्याने आंखणी केलेली आहे. गोवा विद्यापीठाच्या कॅम्पसमधून हमरस्ता जातो हे चुकीचे आहे. मी विद्यापीठाच्या executive council वर होतो. तेव्हा हा रस्ता विद्यापीठाच्या कॅम्पस बाहेरून जावा ह्यासाठी मी प्रयत्न केले. पण राज्यपालांनी त्या प्रस्तावाला विरोध केला.

गोवा विद्यापीठाचे वास्तूशिल्प आंखण्याचे कंत्राट चार्लस कुरैया सारख्या जगदविख्यात आर्किटेक्टला दिले असते तर त्यांनी त्याचे सोने केले असते. पण तत्कालीन राज्यपाल डॉक्टर गोपालसिंग ह्यांनी आपल्या मर्जीतील चित्रकार (आर्किटेक्ट नव्हे) सतिश गुजराल ह्यांना हे कंत्राट दिले. सतीश गुजरालने विद्यापीठाच्या कॅम्पसचा बट्याबोळ करून टाकला.

वास्तविक गोवा विद्यापीठाचे धर्मानंद कोसंबी विद्यापीठ असे नामकरण केले पाहिजे. पुणे विद्यापीठाचे ''सावित्रीबाई फुले विद्यापीठ'' असे उचित नामांतर करण्यात आले आहे. विद्यापीठाला महात्मा फुले ह्यांचे नाव न देता सावित्रीबाई फुले ह्यांचे नाव देणे अत्यंत औचित्यपूर्ण आहे.

अमेरिकेतील विद्यापीठांना अमेरिकन उद्योगपती प्रचंड निधीची देणगी देत असतात. गोवा विद्यापीठाला गोव्यातील किती खाणचालकांनी व अन्य उद्योगपतींनी देणग्या दिल्या आहेत असा प्रश्न केल्यास हाती नन्नाकारच पडेल. गोवा विद्यापीठ हे केवळ लठ्ठपगाराचे कुरण झाले आहे. गुणवान व्यक्तीच्या कर्तृत्वाला विद्यापीठाने कधीच वाव दिला नाही.

डाॅ. नंदकुमार कामत हे कँब्रिज किंवा हावर्ड विद्यापीठाचे असते तर कुठच्याकुठे पोहोचले असते. डाॅ. कामत ह्यांचा स्वभाव (माझ्या प्रमाणे) परखड व स्पष्टवक्ता आहे. त्यामुळे ते विद्यापीठाच्या गलिच्छ अंतर्गत हेव्यादाव्याचे बळी ठरले.

डाॅ. नंदकुमार कामत, डाॅ. सोमनाथ कोमरपंत, डाॅ. किरण बुडकुले, डाॅ. माधवी सरदेसाई व डाॅ. प्रकाश पर्येकर ह्या पांच प्राध्यापकांखेरीज गोव्याच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या सहाव्या प्राध्यापकाचे नाव माझ्या डोळ्यासमोर येत नाही.

विद्यापीठात काय संशोधन चालते यावर विद्यापीठाची गुणवत्ता अवलंबून असते. प्रत्यक्षात गोवा विद्यापीठ पूर्णपणे संशोधनकंगाल झाले आहे. संशोधन क्षेत्रातील गोवा विद्यापीठाची दिवाळखोरी चिंताजनक आहे.

मध्यंतरी गोवा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव होता. हा दर्जा मिळाला असता तर गोवा विद्यापीठाला मुबलक केंद्रीय निधी उपलब्ध झाला असता. पण तत्कालीन राज्यसभा खासदार अ‍ॅड. शांताराम नायक ह्यांनी विनाकारण ह्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे गोवा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याचा योग्य प्रस्ताव बारगळला.

गोवा सरकारचे शिक्षण खाते व गोवा विद्यापीठ ह्यांत सुसंवाद नाही. गोवा सरकार गोवा विद्यापीठाला योग्य निधी उपलब्ध करून देत नाही. भारतातील सर्व विद्यापीठांत गोवा विद्यापीठ १०१-१५०व्या स्थानी आहे. दक्षिण आशियातील विद्यापीठात गोवा विद्यापीठ १८९ व्या स्थानी आहे. गोवा विद्यापीठाला स्थापने पासून आजपर्यंत योग्य कुलगुरू लाभला नाही. त्यामुळे गोवा विद्यापीठ गोव्यात असून नसल्यासारखे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT