Plantation Dainik Gomantak
ब्लॉग

वृक्षारोपण, संस्कृती आणि देवराई

गावातील जाणत्यांची भावना असते की देवराईमधील झाडांवर देवतांचा किंवा पूर्वजांचा वास असतो.

गोमन्तक डिजिटल टीम

नंदा माजिक - अध्यक्ष, केरी पंचायत जैवविविधता मंडळ

देवाच्या नावाने गावकऱ्यांनी जपलेले रान म्हणजे देवराई. या रानाला, त्यामधील झाडांना पावित्र्याच्या भावनेने पाहिले जाते. गावातील जाणत्यांची भावना असते की देवराईमधील झाडांवर देवतांचा किंवा पूर्वजांचा वास असतो.

त्यांच्या त्या भावनेमुळे आणि विश्वासामुळे ते रान सुरक्षित राहते. अशा अनेक देवराई याच कारणामुळे अजून टिकून राहिल्या आहेत. कुणास ठाऊक आमच्या पूर्वजांना मानवी स्वभाव ठाऊक असेल कदाचित आणि त्यामुळेच 'तिथे देव आहे' असे भय त्यांनी घातले असेल.

आताच्या काळात तर आम्ही आमची संस्कृतीही विसरत चाललो आहोत. देवाचे भय देखील आता आम्हाला राहिलेले नाही.

वृक्षारोपण महोत्सव करून देवराई तयार झालेल्या नाहीत. नैसर्गिकपणे वाढलेले ते रान असते. मात्र काळानुसार या रानातली झाडे कमी होत चालली आहेत. काही नैसर्गिकरित्या वठून गेली आहेत तर काही अन्य कारणाने.

म्हणून देवराईत नवीन झाडे लावण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता जर आम्ही झाडे लावली तर पुढील पिढीला त्याचा फायदा होईल हा हेतूही त्यामागे आहे.

होळीसारख्या निमित्ताने आम्ही झाडे मारतो पण नवीन झाडे लावत नाहीत. झाडे लावली तर ती वाढतील आणि त्याची फळे आम्हालाच मिळतील नाही का?

देवराईत असणारी झाडे ही बहुधा रानातली झाडे असतात पण आम्ही मुद्दामहून फळे देणाऱ्या झाडांची योजना देवराईत केली केलेली आहे. माकडांची संख्या अलीकडच्या दिवसात वाढत चाललेली आहे.

त्यांना देखील या झाडांच्या फळाचा लाभ व्हावा. देवराईत वृक्षारोपणाचा उपक्रम आम्ही प्रथमच केला आहे. देवराईची मालकी असणाऱ्या गावांनी अथवा देवस्थानाने आम्हाला परवानगी दिली तर अशा प्रकारचे वृक्षारोपण आम्ही भविष्यातही करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT