Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील १८ हजार हेक्टर जमीन क्षारयुक्त; माती परीक्षण महत्त्वाचे

कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी माती परीक्षण महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ मृदातज्ज्ञ डॉ. गोपाळ महाजन यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: राज्यातील (State) बहुतांश जमीन आम्लयुक्त (लेटराईड) आणि क्षारयुक्त (खाजन) आहे. अशातच येथे ४ हजारांहून अधिक मिलिमीटर पाऊस (Rain) म्हणजे अतिवृष्टी होते. त्यामुळे कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी आणि भरघोस पिकांसाठी समतोल खतांची मात्रा गरजेची आहे. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ मृदातज्ज्ञ डॉ. गोपाळ महाजन यांनी व्यक्त केले आहे.

राज्याला (State) १६० किलोमीटर लांबीची विस्तृत समुद्र (Sea) किनारपट्टी लाभली आहे. मत्स्य उत्पादनासाठी याचा मोठा लाभ होतो. मात्र, सुमारे १८ हजार हेक्टर जमीन खाजन म्हणजे क्षारयुक्त बनली आहे. तर पूर्वेकडील भाग हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा असून यामध्ये प्रामुख्याने लेटराईट म्हणजे आम्लयुक्त जमीन आहे. येथे दरवर्षी अतिवृष्टी होते. त्यामुळे जमिनीतला कस, क्षार आणि इतर घटक द्रव्य वाहून जातात. अशातच ही जमीन आम्लयुक्त आहे. त्यामुळे माती परीक्षण करून समतोल रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा गरजेची आहे. माती परीक्षणासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे असून आपल्या शेतीचे मृदा (माती) परीक्षण करून (सॉईल हेल्थ कार्ड) घेणे गरजेचे आहे. हे काम राष्ट्रीय किनारी शेती आणि संशोधन केंद्र, राज्य सरकारचे कृषी खाते, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून मोफत करून दिले जाते.

कोणत्याही कृषी उत्पादनासाठी माती परीक्षणाची नितांत गरज असते. यामध्ये मातीच्या नमुन्यांचे पृथक्‍करण करून नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये यात बॅरोन, नायट्रोजन, झिंक आयर्न, पोटॅशियम सामू (पीएच) आणि कार्बन घटक द्रव्यांची माहिती मिळविण्यात येते. ज्याद्वारे शेतीला बाहेरून द्यावयाच्या खतांच्या मात्रांची निश्चिती करता येते. यासाठी माती परीक्षण अत्यावश्‍यक आहे.

राज्यातील मातीमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असून खनिज द्रव्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा जमिनीमध्ये फळबागा, काजू, आंबा, नारळ, सुपारी, भाजीपाला यांचे उत्पादन घेता येऊ शकते. भात शेतीसाठीही हा परिसर उत्तम आहे. यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून खतांची समतोल मात्रा द्यावी.

- डॉ. प्रवीण कुमार, संचालक, केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्र, एला गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT