Story Book  Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: ‘द ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीज एव्हर टोल्ड’मध्‍ये गोमंतकीय लेखकांच्या कथा

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, गोव्याचे दिग्गज लेखक लक्ष्मणराव सरदेसाई, आणि युवा पिढीतले लेखक रामनाथ गावडे यांच्या कथांचा त्यात समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Popular Goan Stories द ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीज एव्हर टोल्ड’ या अरुणव सिन्हा यांनी संपादित केलेल्या 50 उत्कृष्ट भारतीय लघुकथांचा संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. गोमंतकीय साहित्यक्षेत्राला अभिमानास्पद बाब म्हणजे त्यात एकूण तीन गोमंतकीय लेखकांच्या लघुकथांचा समावेश केला गेला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, गोव्याचे दिग्गज लेखक लक्ष्मणराव सरदेसाई, आणि युवा पिढीतले लेखक रामनाथ गावडे यांच्या कथांचा त्यात समावेश आहे.

अरुणव सिन्हा यांनी संकलित केलेल्या या पुस्तकात नोबेल पारितोषिक, ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतातील ५० लेखकांच्या लघुकथा संकलित केल्या आहेत.

रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, अण्णाभाऊ साठे, अमृता प्रीतम, आर के नारायण, रस्किन बाँड आणि इतर अनेक भारतातील दिग्गज लेखकांच्या कथांबरोबरच गोमंतकीय कथाकारांना स्थान मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

लक्ष्मणराव सरदेसाई, ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी कथालेखनात राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे पण त्याचबरोबर रामनाथ गावडे हे तुलनेने युवा म्हणावे असे आहेत पण त्यांच्या आपल्या स्वतःच्या अनुभवातूनच आलेल्या कथादेखील आशयाने समृद्ध आहेत.

रामनाथ गावडे यांची ‘कथा एका संडासाची’ ही कथा गावची स्वच्छता आणि सामान्य माणसाची गरज या दोन केंद्रांभोवती फिरते. सुमारे दहा वर्षांपूर्वी गावडे यांनी लिहिलेल्या या कथेतील एका गरीब मुलाला आपल्या आजारी आईसाठी संडास बांधून हवा आहे.

संडास बांधण्यासाठी सरकारी योजना चालू आहेत. योजना सरकारी असली तरी त्याचा फायदा मिळण्यात गरिबांना कितीतरी अडचणींना सामोरे जावे लागते. या वस्तुस्थितीची पार्श्वभूमी या कथेला आहे. रामनाथ गावडे यांच्या ‘पिशाक पिपळ’ या कथासंग्रहात ही मूळ कथा आहे.

ते म्हणतात की या कथेचा आशय त्यांच्या डोक्यात अशाप्रकारे शिजला होता की एका बैठकीत त्यांची ही कथा लिहून पूर्ण झाली. या कथेला त्यानंतर अनेक पारितोषिके मिळाली व तिचा बराच बोलबालाही झाला. मनोहर शेट्टी यांनी संपादित केलेल्या ‘पॉपुलर गोवन स्‍टोरीज’ या संग्रहात या कथेच्या इंग्रजी अनुवादाचा समावेश करण्यात आला आहे.

गावडे हे गोव्यातील आदिवासी समाजातील पहिल्या पिढीचे लेखक असून त्यांचे सहा लघुकथा संग्रह, चार कादंबऱ्या, बालसाहित्य आणि कोकणी आणि मराठीतील नाटक असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांना यापूर्वी बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. 

या संग्रहात समावेश झालेली दामोदर मावजो यांची मूळ ‘कोयसावांली गोरवां’ ही कथा त्यांनी ५५ वर्षांपूर्वी लिहिली होती. ही कथा एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर बेतली आहे जो अत्यंत गरीब आहे. त्याच्याकडे एक गाय आणि एक बैल अशी दोन गुरे आहेत पण त्यांना खाणे घालण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नाहीत.

त्यामुळे तो आपल्या बैलाला मडगावच्या पुरुमेंताच्या फेस्तात विकायला नेतो. त्याच्या बायकोला ते खरंतर नको असते. ती खूप दुःखी होते पण जेव्हा बैलाला गिऱ्हाईक न मिळाल्यामुळे संध्याकाळी जेव्हा तो बैलाला परत घेऊन येतो तेव्हा त्याची बायको आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनेने पीडित होऊन त्या बैलाला मारत सुटते अशी ही कथा आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कथा हा प्रकार देशात अस्तित्वात आल्यापासून भारतीय लेखकांनी लिहिलेल्या काही उत्कृष्ट साहित्यिक लघुकथांची निवड ‘द ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीज एव्हर टोल्ड’ मध्ये आहे. त्‍यात भारतातील विविध प्रदेश, भाषा आणि साहित्यातील कथांचा समावेश आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

SCROLL FOR NEXT