mystical flame Dainik Gomantak
ब्लॉग

ब्लॉग : ही माझी ओळख आहे

ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या प्रत्येक पेहरावाला ड्रॅग म्हणणे हे त्यांना दुखावण्याचे कारण होऊ शकते कारण त्यांनी त्याप्रकारे त्यांची जपलेली ओळख हा ‘शो’ आहे असे म्हटल्यासारखे होते- जे चुकीचे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

या देशात जिथे समलैंगिकतेकडे अजून उपहासाने किंवा त्यांच्या प्रत्येक कृत्यांना शंकेखोरपणे तसेच गुन्हा केल्यासारखे पाहिले जाते तिथे त्यांच्यापैकी काही सुशिक्षित मंडळी मोठ्या धैर्याने ड्रॅगद्वारे लोकांबरोबर संवाद साधत समाजासमोर समान पातळीवर येऊन अभिव्यक्त होताना दिसताहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

ड्रॅग सादर करणारी व्यक्ती ही ट्रान्सजेंडरच असते असा गैरसमज आहे वस्तुस्थिती तशी नाही. आपल्या खऱ्या नावाने ते सादरीकरण करत नाहीत. पण त्यांनी सादरीकरणासाठी धारण केलेली नावे हा त्यांचा ओळखीचा दुवा आहे आणि त्यांच्या लिंग ओळखीची पुष्टी करण्याचा तो महत्त्वाचा भाग असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या प्रत्येक पेहरावाला ड्रॅग म्हणणे हे त्यांना दुखावण्याचे कारण होऊ शकते कारण त्यांनी त्याप्रकारे त्यांची जपलेली ओळख हा ‘शो’ आहे असे म्हटल्यासारखे होते- जे चुकीचे आहे.

आपण बोलावे कसे, आभार कसे मानावेत, मेकअप कसा करावा, कुठल्या शैलीचे कपडे वापरावेत या साऱ्या बाबींना ड्रॅगमध्ये खुप महत्त्व असते. केसांचा योग्य वीग निवडणे, योग्य टाचांचे बुट शोधणे, आपला पोशाख तयार करणे, मेकअप परिपूर्ण करणे यावर प्रत्येक ड्रॅग क्वीन खबरदारी घेतो. स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी त्यांना अख्खा बाजार ढुंडाळावा लागतो इतक्या काटेकोरपणे ते स्वतःवर काम करतात. ड्रॅगमध्ये सादरीकरणाला खुप महत्त्व असते. आपल्या सादरीकरणातून लोकाना काही संदेश द्यावा हा त्यांचा हेतू नसतो.

गोव्यात ड्रॅग सादरीकरणाला खुप मागणी आहे. उत्तर गोव्यात सुमारे 14-15 जागा आहेत जिथे ड्रॅग सादर होते आणि सादरीकरणाला लोकांची उपस्थितीही बऱ्यापैकी असते. उच्चभ्रू म्हणावा असा प्रेक्षकवर्ग या सादरीकरणाला लाभतो. दक्षिण गोव्यात मात्र ड्रॅग फार ठिकाणी सादर होत नाही. कारण अशाप्रकारचे सादरीकरणाचे संयोजन करणाऱ्या इव्हेंट कंपन्या दक्षिण गोव्यात नाहीत.

अनेक ठिकाणी करारावर काही व्यक्ती ड्रॅग सादरीकरणाची जबाबदारी घेतात. हा करार काही महिन्यांचा किंवा वर्षाचा असू शकत. उदा. बॉलिवूडमध्ये काम करणारी सलोरा गोव्यात अनेक ठिकाणी ड्रॅग सादरीकरणाचे कॉन्ट्रेक्ट घेते. आता ती गोव्यातच वास्तव्य करून आहे. काही ड्रॅग क्वीन्सचा व्यवस्थापक सुद्धा असतो जो त्यांचे कार्यक्रम ठरवतो. काही ड्रॅग कलाकार एकाचवेळी स्वतंत्रपणे तसेच ग्रुपमधूनही काम करतात.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रमाचे छोटेखानी पोस्टर अनेक ठिकाणी चिकटवले जातात. समाजमाध्यमांवर डिजिटल पोस्टर टाकून देखील कार्यक्रमाची प्रसिध्दी केली जाते. पेट्रोलपंप, लोकप्रिय स्टोअर अशा ठिकाणी पत्रके वाटली जातात. त्यांच्या कार्यक्रमाची प्रसिध्दी लागोलाग होते.

जिवंत आख्यायिका बनलेल्या ड्रॅग क़्वीन रुपॉलने एकदा म्हटले होते: ‘आम्ही सर्व नग्न जन्मतो. कपडे घालण्यास सुरुवात झाली की सारेच ड्रॅग बनते.’ आजच्या ह्या कलाकारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या सादरीकरणाकडे पाहताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती ही की त्यांच्या शरीराचा आणि पोशाखांचा वापर ते आपली ओळख निर्माण करण्यासाठी करत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT