Margao Dainik Gomantak
ब्लॉग

History Of Margao: मडगावचे शहरीकरण व कपेल

गोमन्तक डिजिटल टीम

वाल्मिकी फालेरो

कपेला रेजिमेंटल(रेजिमेंटचे कपेल)मध्ये पहिला मास ३ मे १८१२ रोजी साजरा करण्यात आला. सैनिकांना त्यांच्या कुटुंबापासून लांब दूरवर आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे पहिले पंथगुरू होते, वेळ्ळीमधील व्हेनान्सिओ फेलिसिओ दा पिएदाद आल्मेदा.

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बटालियन मागे घेण्यात आली आणि तिच्या जागी एका मोकळ्या मैदानाच्या विरुद्ध बाजूस क्वॉर्तेल येथे तैनात करण्यात आले. येथे भारतातून अधूनमधून येणाऱ्या सर्कशींचे खेळ आणि नंतर मडगावमधील पहिल्या फिरत्या सिनेमाचा खेळ आयोजित करण्यात आला होता.

रेल्वे मार्ग आणि मडगाव येथील स्थानक झाल्यानंतर (१७ जानेवारी १८८७ रोजी पहिली ट्रेन येथून धावली), या भागाला एका नवीन शहराचे रुपडे येऊ लागले. १९२८पासून फादर जुझे कायतान सांतान लॉरेन्स (परिसरात राहणाऱ्या पाद्रिमोल कुटुंबातील) यांनी या कपेलचे नूतनीकरण करण्यास प्रारंभ केला आणि १९३०साली कपेलचे निवासस्थान बांधले. पहिले रहिवासी पंथगुरू होते फादर अल्वारो पिंटो.

पण, या कपेलचे चर्च करण्याचे श्रेय जाते ते फादर जुझे आंतोनिओ युस्ताक्विओ दो रोसारियो ई डिविना प्रोव्हिडेन्सिया गोम्स ऑफ हळदोण यांना (फादर टोनी, १९५१-५९ मध्ये पादरी). म्युनिसिपल स्क्वेअर (प्राका दे डॉ. जॉर्ज बार्रेटो, महापौर, मूळ बाणवली येथील, ज्यांनी प्रकल्पाची संकल्पना केली, त्यांचे नाव ठेवण्यात आले.) १९४० मध्ये विकसित केले गेले.

यामुळे कपेलच्या दर्शनी भागातील यार्डमध्ये एक खोलगट भाग तयार झाला. यामुळे कपेलमध्ये प्रवेश करण्यासाठी २८ दगडी पायऱ्या बांधणे आवश्यक बनले. दूरदृष्टी असलेल्या कपेलने या आपत्तीचे संधीत रूपांतर केले आणि नवीन रस्त्याच्या स्तरावर आणि चॅपलच्या समोरच्या यार्डच्या खाली ग्रेस शॉपिंग आर्केडचा तीन-चतुर्थांश भाग बांधला.

याचा फायदा असा झाला की, जमिनीचा एक इंचही न गमावता कपेलसाठी कमाईचा कायमस्वरूपी स्रोत उभा केला. मारियन वर्षाच्या स्मरणार्थ त्याने अंगणात अवर लेडी ऑफ फातिमाची लहानशी गुंफा बांधली (हे इमॅक्युलेट कन्सेप्शनच्या कल्पनेच्या घोषणेचे शतकही होते). २२ जानेवारी १९५५ रोजी या छोट्या कृत्रिम गुंफेचे उद्घाटन झाले. अवर लेडी ऑफ फातिमाची संगमरवरी मूर्ती आणि तीन भविष्यवेत्त्यांच्या मूर्ती इटलीमध्ये तयार झाल्या होत्या.

२०व्या शतकाच्या दुसऱ्या तिमाहीत या क्षेत्राचे झपाट्याने शहरीकरण झाले. कपेल होली स्पिरिट चर्चपासून वेगळे करण्यात आले आणि ३१ मे १९५९ रोजी स्वतंत्र पॅरिश चर्चमध्ये रूपांतरीत करण्यात आले.

१९७०पर्यंत फादर टोनी हे त्याचे शेवटचा पंथगुरू आणि पहिले पॅरिश याजक बनले. बेंगळुरू येथील याजक-वास्तुविशारद यांनी डिझाइन केलेल्या नवीन चर्चच्या इमारतीचे काम दिवाड येथील फादर जुआंव झेव्हिअर जुझे आंतोनिओ लोपेझ दे सा (१९७०-८५) यांच्या कार्यकाळात २८ जानेवारी १९७३ रोजी सुरू झाले.

आधुनिक संकल्पनेची नवीन चर्च इमारत १ जानेवारी १९७७ रोजी खुली करण्यात आली. फादर लोपेझ दे सा यांनीदेखील सध्याच्या ग्रेस इस्टेटपैकी एक चतुर्थांश शिल्लक कामे पूर्ण केली. चर्चमध्ये प्रवेश करताना मोझॅक टाइल्सवर चित्रित केलेली बायबलसंबंधी पाच दृश्ये, वेर्णा येथील फादर जुआंव पेद्रो अमान्सिओ फर्नांडिस यांच्या कार्यकाळात लावली गेली होती.

फादर फर्नांडिस यांनी आपल्या क्युरेट फादर साव्हियो वाझ यांच्या पुढाकाराने ‘ग्रेस न्यूज’ हे मासिक पॅरिश नियतकालिकदेखील सुरू केले. काही गोष्टी पहिल्यांदाच सुरू करण्याचे श्रेय या पॅरिश चर्चला जाते.

८. होली क्रॉस :(लॉरेन्सो कुटुंबाने बांधले?) पेडा येथील पोलिस क्वार्टरजवळ असलेले हे कपेल आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

९. सेंट फ्रान्सिस झेवियर : जुने मार्केट येथील पूर्वीच्या कारागृहात (१८६५).

१०. सेक्रेड हार्ट ऑफ मेरी (१८७३) : हॉस्पिसिओ हॉस्पिटलशी संलग्न कपेल, त्याचे संस्थापक पे. आंतोनियो जुआंव मिरांडा आणि १९०५मध्ये जीर्णोद्धार.

११. अवर लेडी ऑफ पीटी दांडो: (लोयोला हायस्कूल जवळ), आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

१२. सिडास अल्मास : ओल्ड मार्केटजवळ (१८९० चे दशक) येथे.

१३. अवर लेडी ऑफ मिरॅकल्स : पूर्वी मडगाव येथील हे कपेल आता नुवेंत आहे व नुवें चर्चशी संलग्न आहे.

१४. सिडास अल्मास(१९०० चे दशक) : न्यू मार्केट, आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

१५. होली क्रॉस: मेस्तभाट येथे स्थित, आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

१६. क्राइस्ट द किंग (१९२९): हे बिशपच्या पंथगुरूंचा वृद्धाश्रम, हॉस्पिसिओ दे क्लेरोमधील एक अंतर्गत कपेल होते. २ फेब्रुवारी १९२९ रोजी याला कॉन्सिक्रेटेड करण्यात आले.

१७. सेंट जोसेफ(२१ जानेवारी १९३५) : मॉन्ते येथील टी.बी. सेनेटोरियमजवळ स्थित.

१८. मारिया सँटिसिमा (होली मेरी)(१९३५): मॉन्ते येथील टी.बी. सेनेटोरियमजवळ स्थित.

१९. सेक्रेड हार्ट ऑफ जीझस ऑफ द रिलिजिअस ऑफ मारिया बांबिना (१९३५).

२०. सेंट जॉन ऑफ गॉड ऑफ द फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर सिस्टर्स ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन(१९३८) : प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट येथे स्थित.

२१. सेक्रेड हार्ट ऑफ जीझस (१९३९) : वृद्ध आणि निराधारांसाठी असलेल्या अल्बेर्ग होम येथे स्थित.

२२. सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला (१९४९) : जेसुइट हाऊस/लोयोला हायस्कूल येथे स्थित. आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

२३. अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल ऑफ अपोस्टोलिक कार्मेल (१९४९) : फातिमा कॉन्व्हेंट येथे स्थित. आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

२४. होली क्रॉस : अप्पर कोंब येथे स्थित, आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

२५. होली क्रॉस : मेस्तभट (बाजार वार्ड) येथे स्थित, आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Table Tennis Championship: अंकुर, सुतिर्थाची कमाल! यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मारली बाजी; विजेतेपदावर कोरले नाव

Goa University: ''गोवा विद्यापीठातील ती पदे भरु देणार नाही, कुलगुरुंनी अद्याप...''; सरदेसाईंच्या पक्षाचा आक्रमक पवित्रा

Goa Accident: अपघात नव्हे तो खूनच! देऊमळ ग्रामस्थांची केपे पोलिस स्थानकावर धडक

Goa Fire: मालक बाहेर पडला अन् फ्लॅटमधून धूर येऊ लागला; सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

Global Konkani Forum Protest: साहित्य अकादमींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार; गोव्यातल्या कोकणी फोरमने टोकाचा निर्णय का घेतला?

SCROLL FOR NEXT