GI Tag Dainik Gomantak
ब्लॉग

GI Tag: बेबींका, मानकुराद, आगाशीचे वांगे, सात शिरांची भेंडी आता सातासमुद्रापार

ग्रामीण लोकजीवनात जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना देण्याच्या दृष्टीने जीआय टॅग महत्त्वाची भूमिका बजावतो.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. एम.आर. रमेशकुमार.

जीआय हा एक प्रकारे त्या वस्तूच्या बौध्दिक संपदेला दिला गेलेला संरक्षणाचा प्रकार आहे. हा टॅग अशाप्रकारे दिला जातो की ज्यातून त्या वस्तूची गुणवत्ता, प्रतिष्‍ठा आणि इतर ठळक वैशिष्‍ट्ये त्याच्या उत्पत्तीच्या किंवा मुळ स्‍थानाशी जुळलेली राहतात.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘उद्योग वाढ आणि अंतर्गत व्यापार’ या विभागाद्वारे जीआय टॅग विशिष्ट नोंदणीद्वारे जारी केले जातात. कृषी उत्पादने, हस्तकला, वस्त्र, खाद्यपदार्थ, उत्पादित वस्तू इत्यादींसाठी जीआय टॅग मिळू शकतो.

ग्रामीण लोकजीवनात जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना देण्याच्या दृष्टीने जीआय टॅग महत्त्वाची भूमिका बजावतो. जीआय टॅगद्वारे अशा वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाची ओळख जगभर होऊ शकते.

बेंबीका (स्वादिष्ट खाद्यपदार्थ), मानकुराद आंबा, आगशीची वांगी, सात शिरा असलेली भेंडी यांची ओळख सर्व गोमंतकीयांना आहे आणि ही सर्व उत्पादने गोव्याची ओळख सांगणारीही आहेत. या चार उत्पादनांना अलीकडेच  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या चेन्नई येथील ‘जीआय नोंदणी मंडळा’ने जीआय टॅग प्रदान केला.

काजू फेणी, मयडाची मयडोळी केळी, खोला मिरची, हरमल मिरची आणि खाजे या विशेष गोमंतकीय उत्पादनांना जीआय टॅग यापूर्वी मिळाला होता. त्यामुळे जीआय टॅग मिळालेल्या एकूण गोमंतकीय उत्पादनांची संख्या आता ५ वरून ९ वर पोहोचली आहे.

‘बेंबीका’ च्या मुळ निर्मितीबद्दल जरी ठोस माहिती उपलब्‍ध नसली तरी पोर्तुगीज काळात ओल्ड गोवा येथील सांतामोनिका कॉन्व्हेंटमधील बेबीआना या ननने ते प्रथम बनवले असे मानले जाते.

ओल्ड गोवा तसेच लिस्बन येथील सात टेकड्यांचे प्रतिनिधित्व बेबिंकामधील सात स्तरांमध्ये तिने केले होते असा समज आहे. कोलवा येथील ‘ऑल गोवा बेकर्स ॲन्ड कन्फेक्शनर्स’ यांनी बेबींकाला जीआय टॅग मिळावा यासाठी अर्ज केला होता.

मानकुराद आंब्यांना जीआय टॅग मिळावा यासाठी पणजी येथील ‘ऑल गोवा मॅंगो ग्रोव्हर्स असोसिएशन’ ने अर्ज केला होता. मानकुराद आंबा मानकुर, मालकोराडो, कोराडो या नावानेही ओळखला जातो. ‘बिघडलेल्या रंगाचा’ या अर्थाने पोर्तुगीजांनी या आंब्याचे नाव ‘मालकोरादो असे ठेवले होते जे नंतर ‘मानकुराद’ बनले.

आगशीचे वांगे किंवा सात शिरांच्या भेंडीला बाजारात विशेष मागणी असते आणि तुलनेने ती अधिक महागही असतात. गोवा वगळता ही उत्पादने इतरत्र कुठेच मिळत नाहीत. आगशीचे वांगे, सात शिरांची भेंडी, मानकुराद, बेबिंका ही उत्पादने पूर्वीही गोव्यात तसेच शेजारी राज्यात बरीच नावलौकिक मिळवून होतीच पण त्यांना आता मिळालेल्या जीआय टॅगमुळे त्यांची प्रसिध्दी सातासमुद्रापार जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT