Lohia Maidan Dainik Gomantak
ब्लॉग

लोहिया मैदानावर गोवा मुक्तिगाथा उद्घोषित

डॉ. लोहिया आणि गोवामुक्ती याबद्दलची माहिती देणारी एक आर्ट गॅलरी तिथे उभी राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: ज्या मैदानापाशी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 75 वर्षांपूर्वी गोवा मुक्ती चळवळीची मुहूर्तमेढ रोवली, त्या मडगावच्या 'लोहिया मैदाना'वर लवकरच गोवा मुक्तीची गाथा पुन्हा एकदा उद्घोषित करण्यात येणार आहे.  डॉ. लोहिया आणि गोवामुक्ती याबद्दलची माहिती देणारी एक आर्ट गॅलरी तिथे उभी राहणार आहे. हे मैदान हे फक्त सार्वजनिक सभा घेण्याचे एक स्थान न राहता गोवा मुक्तीची माहिती नव्या पिढीला देणारे एक खुले संग्रहालय व्हावे यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. ‘या मैदानाचे सौंदर्यीकरण हाती घेतलेल्या कन्सल्टंटसमोर आम्ही तो प्रस्ताव ठेवला आहे’, असे या प्रकल्पाची संकल्पना मांडणाऱ्यांपैकी एक असलेले संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले.

गोव्यात नागरी स्वातंत्र्यावर पोर्तुगीजानी बंदी घातलेली असताना, 18 जून 1946 या ऐतिहासिक दिवशी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगाव शहरात भाषणबंदीचा हुकूम मोडला होता. त्यावेळी पोर्तुगीज कमांडरने त्यांच्यावर पिस्तूल रोखले असता त्यांनी बेदरकारपणे त्यांचा हात झिडकारून आपले भाषण चालू ठेवले होते. या एकाच घटनेने गोव्यातील जनतेने निर्भय होऊन स्वतःला गोवामुक्ती चळवळीत झोकून दिले होते.

नेमके हेच दृश्य या मैदानावर जिथे लोहियांचा पुतळा आहे, त्यामागे असलेल्या भिंतीवर चित्रित करण्यात येणार आहे. त्याशिवाय येथे आणखी तीन भिंती आहेत, ज्यांवर गोवामुक्तीशी संबंधित अन्य घटना चित्रित करण्यात येणार आहेत. ही कल्पना जरी फक्त प्रस्ताव स्वरूपात असली तरी ती साकार होणार याची खात्री 18 जून क्रांती समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांना आहे. ‘लोहिया मैदान हे मडगावात सार्वजनिक सभा घेण्यासाठीचे मुख्य केंद्र असले तरी त्याचा उपयोग गोवा मुक्तीची माहिती नव्या पिढीला देणारे केंद्र म्हणूनही व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमच्या कल्पना सुडाच्या प्रतिनिधीसमोर मांडलेल्या आहेत’ असे शिरोडकर म्हणाले.

सध्या या मैदानाचे सुशोभितीकरण सुडातर्फे केले जात असून त्यात या मैदानाचा कायापालट होत आहे. हे सौंदर्यीकरण करतानाच या वास्तूचा अभ्यासकेंद्र म्हणून कसा उपयोग केला जाऊ शकतो यावर विचार करण्यासाठी ‘18 जून क्रांती समिती’ आणि ‘मार्ग संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी सुडाच्या प्रतिनिधीबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या. गोवा मुक्तीतील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचाही त्या चर्चेत सहभाग होता. गोवामुक्ती चळवळीतील आघाडीचे स्वातंत्र्य सेनानी गजानन रायकर यांचे पुत्र पराग रायकर, या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल माहिती देताना म्हणाले, ‘या मैदानावर एक लहानशी गॅलरी उभारण्याचेही ठरले असून त्यात डिजिटल आणि ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, विशेषतः विद्यार्थ्यांना, गोवा मुक्ती चळवळीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.’

-सुशांत कुंकळयेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT