Drama  Dainik Gomantak
ब्लॉग

Culture Activity: गणेश चतुर्थी आणि व्यावसायिक नाटके

गेल्या काही वर्षात, गणेश चतुर्थी हा दुसऱ्या एका व्यावसायिक उपक्रमाच्या मोसमाची सुरुवात करून देणारा उत्सव बनला आहे- तो म्हणजे नाटकाचा मोसम.

गोमन्तक डिजिटल टीम

Culture Activity गणेश चतुर्थी जवळ आली की कुठल्या कामांना सर्वात प्रथम सुरुवात होते? मूर्तीकारांकडून गणपतीच्या मूर्ती बनवायला सुरुवात होते, कुठे घुमट आरतीचा सराव सुरू होतो, भजनी मंडळ एकत्र जमून भजनाचा सराव करतात, घराच्या साफसफाईला सुरुवात होते ...इत्यादी. नंतरच्या काळात सुरु होणारी अनेक कामेही आठवतील. या सर्वातून गणेश चतुर्थी सुंदर बनत जाते.

गेल्या काही वर्षात, गणेश चतुर्थी हा दुसऱ्या एका व्यावसायिक उपक्रमाच्या मोसमाची सुरुवात करून देणारा उत्सव बनला आहे- तो म्हणजे नाटकाचा मोसम. गणेश चतुर्थीची चाहूल लागली की गोव्यातील व्यावसायिक नाटकसंस्था नाटकाच्या तालमीना सुरुवात करतात.

फेसबुक, व्हॉटसॲपवरून या नाट्यसंस्थांच्या नियोजित नाटकांचे पोस्टर्स (तालमी सुरू होण्यास अजून बराच काळ असला तरी) झळकायला लागतात.

गोव्यातील शहरो-शहरी आणि गावोगांवी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपल्या नवीन नाटकाचा ‘प्रिमियर’ करणे आणि नंतर एप्रिल-मे महिन्यापर्यंत त्याचे शक्य तितके प्रयोग करणे (ही संख्या १०० वर जाऊ शकते) हे या हेतूने प्रत्येक संस्था काम करते.

यंदा देखील समाजमाध्यमावर अनेक संस्थांच्या नवीन नाटकांचे पोस्टर झळकू लागले आहेत. या पोस्टरच्या शैलीकडे पाहता ही नाटके विनोदी असतील हे लक्षात येते. अर्थात अनेक गणेशोत्सव मंडळांची (किंवा जत्रोत्सव किंवा देवस्थान समितीची वगैरे) मागणी विनोदी नाटकांचीच असते. ‘एरवीच लोक आपल्या गंभीर समस्येमुळे चिरडीला आले आहेत.

त्यात गंभीर आणि समस्याप्रधान नाटके बघून त्यांच्या मानसिक दुःखात भर कशाला घाला?’ असा गंभीर विचार करून या समित्या, ‘दुःखी जनतेच्या’ सेवेसाठी विनोदी नाटकांना निमंत्रित करणेच अधिक पसंत करतात. ‘विनोदी नाटकच हवे’ अशा इच्छेमुळे सादर झालेल्या अनेक नाटकांमधल्या विनोदाची प्रत मात्र कुणीच तपासायला जात नसते.

अर्थात साधारण वीस-पंचवीस व्यावसायिक नाट्यसंस्‍थामधल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संस्थांचे सादरीकरण मात्र प्रेक्षकांना समाधान देऊन जाते. अशा संस्था एका मोसमात आपल्या नाट्यप्रयोगाची शंभरीही यशस्वीपणे पार करतात.

या व्यावसायिक नाटकांच्या पोस्टरवर लेखक म्हणून गोमंतकीय लेखकांचीच नावे असतात पण तपास करू जाता त्यातील अवघी नाटकेच स्वतंत्रपणे लिहिली गेलेली आढळतील. यापैकी बहुसंख्य नाटके ही कुठल्यातरी परभाषेतील जुन्या नाटकावरून किंवा एखाद्या सिनेमावरून कोकणीत रुपांतरीत केली गेलेली असतात.

पण आपल्या गोव्यातील नाट्य-व्यावसायाचे स्वरुपच असे आहे की आपले नाटक अनुवादित किंवा रुपांतरीत करून सादर झाले आहे याचा पत्ता लागणे मूळ लेखकाला कधीच शक्य नसते. प्रेक्षकांना (आणि आयोजकांनादेखील) त्याबद्दल फारशी फिकीर नसते. त्यामुळे चोरीचा हा मामला गोव्यात ‘सेफ’ असतो.

गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी (पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अभावानेच) नाटकांच्या सादरीकरणाला सुरुवात होते. गोव्यातील बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव ११ दिवसांचे असतात, ज्यात आठ दिवस मंडपात वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. साधारण प्रत्येक मंडळ किमान तीन नाटके आपल्या उत्सवात सादर करते.

शंभर सार्वजनिक गणेशोत्सवांचा आपण हिशेब धरला तर ३०० प्रयोगांची आवश्‍यकता या काळात असते. पण एक संस्था ८ ते ९ प्रयोगच या काळात करू शकते. याचा अर्थ या 300 प्रयोगांसाठी अनेक संस्थांना या दिवसात वाव असतो असे म्हणता येईल.

गोव्यातील मूर्तीकार आणि नाट्यसंस्थेचे कलाकार यांच्या कामाला सुरुवात झालीच आहे. गणेशचतुर्थीचा दिवस उजाडला की मूर्तीकार मोकळे होऊन स्वस्‍थ होतात. नाटकवाल्या मंडळीची धावपळ मात्र पुढील १० दिवस अखंड चालू राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT