चिराग कामत यांनी जलरंगातून साकार केलेल्या गोवा वेल्हा इथले चर्च. Dainik Gomantak
ब्लॉग

चिराग कामतचे चित्र ठरले ‘पेंटिंग ऑफ द डे'

'वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’ ही संस्था चित्रकलेतील जलरंग (Watercolor) या माध्यमाचा गोव्यात (Goa) प्रसार व्हावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते.

दैनिक गोमन्तक

'वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’ ही संस्था चित्रकलेतील जलरंग या माध्यमाचा गोव्यात (Goa) प्रसार व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील असते. या संस्थेचे सभासद असलेले काही चित्रकार (Painter) तर राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. कालिदास सातार्डेकर, गोविंद सिलीखान या, प्रामुख्याने जलरंगात काम करणाऱ्या चित्रकारांनी देश-विदेशातल्या चित्रकला प्रदर्शनातून स्थान मिळवले आहे. संस्थेत त्यांच्यासारखे व्यावसायिक चित्रकार (Painter) आहेच पण जलरंगांचे आकर्षण असलेले, जलरंगात काम करू इच्छिणारे नवशिके कलाकारही (Artist) आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थेतल्या अशा नवख्या कलाकारांना संस्थेतल्या दिग्गज मंडळींचे मार्गदर्शन (Guidance) सतत लाभत असते.

आठवड्यात एकदा, बहुतेक रविवारी या संस्थेतले काही सदस्य एखाद्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण लोकेशनवर (Location) जाऊन आपला तळ ठोकतात आणि जलरंग (Watercolor) या चित्रकलेतल्या सर्वात कठीण माध्यमाचा सराव करतात. हा त्यांचा उपक्रम गेली काही वर्षे चालू आहे. या उपक्रमात नवशिक्या चित्रकारांना व्यावसायिक कलाकारांकडून जागेवरच मार्गदर्शन मिळते.

चित्रे (Pictures) पूर्ण झाल्यानंतर त्यातलेच एखादे चित्र ‘पेंटिंग ऑफ द वीक’ ठरते. जलरंगांच्या (Watercolor) माध्यमात नव्यानेच प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक प्रकारचे सकारात्मक उत्तेजन असते. गेल्या आठवड्यात या संस्थेच्या सदस्यांनी ठरवलेले स्थळ होते, गोवा वेल्हा (Goa Velha) येथील चर्च. पाच चित्रकारांनी हे चर्च आपल्या कॅनव्हासवर उतरवले. या आठवड्याचे ‘पेंटिंग ऑफ द वीक’ ठरले, चिराग कामत (Chirag Kamat) यांनी जलरंगातून साकार केलेल्या गोवा वेल्हा इथले चर्च.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT