Goa Politics | BJP  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Politics: 'इसको बनाना, उसको मिटाना' हीच तर राजकारणाची खरी रीत

गोव्यात भाजप वाढवण्यात जेवढा पर्रीकरांचा वाटा होता, तेवढाच लक्ष्मीकांत पार्सेकरांचाही होता हे कुणीच नाकबूल करु शकणार नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री. चांगली अडीच वर्षे ते राज्याचे मुख्यमंत्री होते. मोपा विमानतळाची प्रक्रिया याच काळात कार्यान्वित झाली होती. नंतर दयानंद सोपटे भाजपमध्ये आल्यानंतर मात्र पार्सेकरांची परवड सुरू झाली. सोपटेंना मांद्रेची उमेदवारी दिल्यामुळे पार्सेकरांना राग येणे साहजिकच होते. पण त्या पोटनिवडणुकीत त्यांनी पडद्यामागून सूत्रे हलवण्याचे काम केले. पण, तरीही सोपटे निवडून आलेच.

2022 साली झालेल्या निवडणुकीत आपल्याला भाजपची उमेदवारी मिळेल, असे पार्सेकरांना खात्रीने वाटत होते. पण, तिथेही त्यांची उपेक्षाच झाली. परत एकदा सोपटेंनाच ही उमेदवारी मिळाली. आता मात्र सरांना रंग बदलावा लागला. त्यांनी भाजप त्यागून अपक्ष उमेदवारी दाखल केली.

आपण निवडून येणारच अशी त्यांना खात्री होती. पण, ही खात्री प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यांची धाव 5,623 मतांपर्यंत येऊन थांबली. त्यांचा पराभव झाला खरा, पण त्यांनी सोपेटेंनाही पराभवाच्या खाईत आणून सोडले. पण खरे तर पार्सेकरांना भाजप सोडावे लागणे हाच एक मोठा धक्का होता.

पार्सेकर हे पर्रीकर काळातील नेते. गोव्यात भाजप वाढवण्यात जेवढा पर्रीकरांचा वाटा होता, तेवढाच सरांचाही होता हे कुणीच नाकबूल करू शकणार नाही. अशा कार्यकर्त्यावर भाजप सोडण्याची वेळ का यावी, हेच एक मोठे प्रश्नचिन्ह होते.

वास्तविक ही वेळ येऊ नये म्हणून भाजप श्रेष्ठींनी बरेच प्रयत्नही केले होते. त्यांना अनेक ऑफरही देण्यात आल्या होत्या. पण सरांनी त्या धुडकावून लावल्या. एक प्रकारे स्वतःच आपला अस्त घडवून आणला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आपण गोव्यातील भाजपचे प्रणेते असल्यामुळे आपली कदर व्हायला हवी होती, असे त्यांना वाटणे साहजिकच होते. पण खरे तर त्यांचा 2017 साली झालेला पराभव, त्यांना महागात पडला.

त्यावेळी सोपटे तब्बल 7,000 मतांनी विजयी झाल्यामुळे अक्षरशः ‘किंग मेकर’ ठरले होते. आणि यामुळेच भाजपच्या नजरेत सोपटे नायक बनले आणि पार्सेकर काहीसे पिछाडीवर गेले. तरीसुद्धा पार्सेकरांनी दिलेले योगदान विसरण्यासारखे खचितच नाही. म्हणूनच त्यांची भळभळणारी जखम वर यायला लागते.

परवा मोपा एअरपोर्टच्या उद्‌घाटनावेळी त्यांची ही व्यथा परत एकदा उफाळून वर आली. उद्‌घाटनाच्या वेळी आपल्या योगदानाची कोणीच दखल घेतली नाही ही त्यांची व्यथा होती. आणि त्यांची व्यथा कोणालाही पटण्यासारखीच होती. पण भाजपच्या शब्दकोशात फक्त उगवत्या सूर्याला स्थान असते हे विसरता कामा नये.

मात्र पार्सेकर सर म्हणजे गोव्यातील भाजपचा इतिहास आहे हेही तेवढेच खरे आहे. इतिहास कधीच कोणीही पुसून टाकू शकत नसतो यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे, भाजपने जरी पार्सेकरांचे नाव घेतले नसले तरी ते नाव पेडणेकरांच्याच नव्हे तर साऱ्या गोमंतकीयाच्या मनात कोरले आहे यात शंकाच नाही. पण तरीही पार्सेकरांनी परवाची निवडणूक लढवायला नको होती असे राहून राहून वाटते.

ते जर परवा रिंगणात नसते तर आज परिस्थिती कदाचित वेगळीच झाली असती. पण ‘होनी को कौन रोक सकता है ’ हेच खरे. तरीसुद्धा सर आजसुद्धा शिक्षण व कृषी क्षेत्रात सक्रिय आहेत ही खरोखरच समाधानाची बाब. शिक्षक हा शेवटपर्यंत शिक्षकच असतो हेही विसरता कामा नये. तशा राजकारणात प्रत्येकाच्या व्यथा असतातच.

‘इसको बनाना, उसको मिटाना’ हीच तर राजकारणाची खरी रीत असते. त्यामुळे यापुढेही अशा अनेक राजकीय व्यथांना जवळ घेऊनच पार्सेकरसरांना पुढे जावे लागणार आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पार्सेकरसरांना ते कठीण जाईल, असे बिलकूल वाटत नाही. मात्र यातूनच पार्सेकरसरांची कसोटी तर लागणार आहेच, त्याबरोबर पार्सेकर म्हणजे काय चीज आहे हे गोव्यातील लोकांनाही कळून येऊ शकेल हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT