Swim Events Dainik Gomantak
ब्लॉग

Swim Events: फिट फॉर लाइफ स्विम इव्हेंट

‘फिट फॉर लाइफ’ने निरोगी जीवनशैली आणि लोकांमध्ये पोहण्याबद्दलच्या प्रेमाला प्रोत्साहन देण्याचे ध्येय साध्य केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Swim Events सध्याच्या ताण-तणावयुक्त जीवनात जर स्वतःला आरोग्यपूर्ण राखायचे असेल तर पोहण्यासारखा दुसरा सोपा उपाय नाही. नदीवर किंवा जलाशयावर पोहायला जाणे ही पूर्वी लोकांसाठी सामान्य बाब होती.

त्यातून आनंद तर मिळायचाच पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यातून आपले आरोग्यही उत्तम राखले जायचे. पण अलिकडील धकाधकीच्या जीवनात नदीवर जायला वेळ कुणाकडे राहिलाय?

हीच बाब हेरून ‘फिट फॉर लाईफ’ गेल्या 2 वर्षांपासून फिट फॉर लाइफ: स्विम इव्हेंट्स आयोजित करत आहे. या इव्हेंटमध्ये संपूर्ण कुटुंबाचा समावेश होत असल्यामुळे त्याला लोकांकडून फारच चांगला प्रतिसाद मिळतो. असाच एक इव्हेंट केपे येथील जलतरण तलावावर हल्लीच आयोजित करण्यात आला होता.

जलतरण तलावातील मजा आणि उत्साह अनुभवण्याचा तो एक अविस्मरणीय दिवस होता. यात विशेष क्षमतेच्या काही मुलांसह सर्व वयोगटातील आणि स्तरावरील जलतरणपटू एकत्र आले होते. 100 हून अधिक लोक त्यात सहभागी झाले होते आणि तितक्याच संख्येने प्रेक्षकही उपस्थित असल्याने हा कार्यक्रम जल्लोषपूर्ण ठरला.

या उत्सवात सहभागी झालेल्यांनी नियमित तसेच अपारंपरिक जलतरण शर्यतींचा आणि आपल्या उत्साहाचे आणि पराक्रमाचे प्रदर्शन करत जलसंबंधित आव्हानांचा आनंद घेतला.

तिथले सारे वातावरण त्यावेळी हशा, जल्लोष आणि मैत्रीपूर्ण स्पर्धेच्या भावनेने भारून गेले होते. कित्येक जलतरणपटू तर वय विसरून आपले कर्तृत्व सिद्ध करून गेले.

हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा सहभागी आणि प्रेक्षक, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि खूप आनंदी आठवणी घेऊन निघून गेले. ‘फिट फॉर लाइफ’ने सामुदायिक सहभाग, निरोगी जीवनशैली, आणि स्थानिक लोकांमध्ये पोहण्याबद्दलच्या प्रेमाला प्रोत्साहन देण्याचे आपले ध्येय साध्य केले होते.

जलतरणाची संधी देणारा हा इव्हेंट आयोजकांचा वार्षिक कार्यक्रम असेल आणि भविष्यात तो गोवा आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारी चांगली प्रतिभा पुढे आणेल असा विश्वास या इव्हेंटचे आयोजक ज्यो कॉस्टा परेरा यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT