goa Dainik Gomantak
ब्लॉग

रुपेरी पडद्यावरची पहिली नायिका

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली. पायल कापडिया यांच्या चित्रपटाला तसेच अनसूया यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक प्राप्त झाले.

अनसूया या गोव्याच्या रहिवासी आहेत असे ऐकिवात आहे. मूळ गोमंतकीय नसल्या तरी गोव्याच्या भूमीवर वास्तव्यास आहेत आणि म्हणूनच गोवेकारांना त्यांचा काकणभर जास्तच अभिमान आहे. या जागतिक विजयामुळे गोव्याचा चित्रपट सृष्टीत असलेला सहभाग पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे.

तारकांच्या शोधात कालौघात हरवलेल्या या स्त्रियांची मला नव्याने ओळख झाली. माधवी ताई देसाई यांनी गोमंत सौदामिनी पुस्तकाद्वारे या संचिताचे योग्य असे संवर्धन करण्याचे महान कार्य केलेले आहे. विस्मृतीत गेलेल्या तारकांची भेट या द्वारे होते. भारतीय चित्रपट सृष्टीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या चित्रपटात नायक नसला तरी चालेल पण नायिका असलीच पाहिजे हा जणू नियमच आहे.

पण दादासाहेब फाळके यांनी जेव्हा पहिला मूकपट बनविला तेव्हा त्यांना महिला कलाकार न मिळाल्या मुळे साळुंके नावाच्या पुरुष कलाकाराला मिशीसकट स्त्रीपात्र बनवावे लागले होते! त्यानंतर मात्र मोहिनी भस्मासुर चित्रपटात त्यांना स्त्री नायिका भेटली. खर तर एक पे एक फ्री असल्या सारख्या दोन नायिका मिळाल्या.

दुर्गाबाई कामत आणि त्यांची कन्या कमला बाई गोखले. स्त्रियांना अतिशय प्रतिकूल असा तो काळ. त्या तशा वातावरणात चित्रपटात काम करण्याचे धाडसी पाऊल दुर्गाबाई कामत यांनी उचलले आणि वेगळा इतिहास रचला. दुर्गाबाई कामत यांचा जन्म अस्नोडा येथे झाला. त्याकाळी त्यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले होते! त्यांचा विवाह आनंद नास्नोडकर कामत या इतिहासाच्या प्राध्यापकांशी झाला होता.

त्यानंतर त्या मुंबई इथे स्थायिक झाल्या. लग्नानंतर लगेचच दुर्गाबाईंच्या लक्षात आले की, नानोस्कर हा अत्याचारी पती आहे. त्यांची कन्या कमलाबाई यांचा जन्म १९०० साली झाला. नानोस्करानी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आणि दुर्गाबाई व कमला यांच्याप्रति आपले कर्तव्य पार पाडले नाही.

दुर्गासाठी एक पर्याय होता तो म्हणजे इतरांच्या घरी घरकाम करणे. दुसरे म्हणजे गायन आणि नृत्यातील आपली प्रतिभा आणि कौशल्य वापरून रंगकर्मी बनणे. त्या काळी रंगभूमीवर अभिनय करणे हा सन्मानजनक व्यवसाय मानला जात नव्हता, विशेषत: उच्चवर्णीय स्त्रियांसाठी. दुर्गाबाईंनी ही बंदी मोडणे पसंत केले. तीन वर्षांच्या कमलाचा हात धरून ती एका थिएटर कंपनीत रुजू होण्यासाठी घर सोडून गेली. तिच्या घरच्यांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना जमलं नाही, तेव्हा त्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले.

तिला आधार देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आणखी एक कणखर स्त्री, तिची सासू. तिने दुर्गाला दागिने आणि एक घर देऊ केले जे ती विकू शकेल आणि त्या पैशांचा वापर करून स्वतंत्रपणे आपले जीवन नव्याने सुरू करेल.

चरितार्थासाठी मेळे, नाटक कंपनी इत्यादीतून त्या काम करायच्या. याच सुमारास त्यांना दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि आयुष्याचे सोने झाले. दुर्गाबाई कामत यांनी त्यानंतर खूप वर्षे सिनेमात काम केल्याचे वाचनात आले आहे. तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभले होते असेही संदर्भ आहेत.

मराठी आणि हिंदी चित्रपटात प्रसिद्ध असणारे चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले हे त्यांचे नातू आणि पणतू होय. स्त्रियांना चित्रपटसृष्टीची दारे उघडणाऱ्या या महान कलाकाराचे स्मरण फारसे केले जात नाही.

किंबहुना त्यांच्या विवाहपूर्व आयुष्याबद्दल फार काही माहिती मिळाली नाही. गोव्यात न जन्मलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर किंवा इतर मंगेशकर भावंडांना आम्ही अभिमानाने मिरवतो, परंतु गोव्यात जन्माला येऊन भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचणाऱ्या या तारकेबद्दल मात्र आपल्याला माहिती नसावी हे दुर्दैव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT