गोमंतकातील पहिले ग्रंथालय श्री शारदा मंदिर  Dainik Gomantak
ब्लॉग

गोमंतकातील पहिले ग्रंथालय

तत्कालीन सारस्वत विद्यापीठाचे आज शारदा इंग्लिश हायस्कूल दिमाखात सुरू आहे. केजी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथे मिळते.

दैनिक गोमन्तक

सर्गदत्त देवभूमी म्हणून गणल्या जाणाऱ्या गोमंतकभूमीतील ‘ माशेल’ या पुण्यक्षेत्राची महती विशेष होय. या छोट्याशा गावात विविध देवीदेवता अशा काही दाटीवाटीने निवासाला आहेत की एखाद्याला वाटावे, इथे माणसांपेक्षा देवतांचे वास्तव्यच अधिक आहे. देशभरात अन्यत्र कुठेही एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने देवतांची मंदिरे आढळायची नाहीत. एकमुखी दत्त ( श्रीदुर्गादत्त मंदिर), देवकी मातेसोबत गोपालकृष्ण (श्रीदेवकीकृष्ण) अशी वैशिष्ट्यपूर्ण देवळेंही आहेत.

केवळ श्री शांतादुर्गेचीच म्हटली तर तब्बल पाच - सहा मंदिरे गावात आहेत. अर्थातच अशा देवी देवतांच्या सान्निध्याने आणि कृपाशीर्वादाने माशेलात विद्या, साहित्य, कला, संगीत आदी क्षेत्रे वैशिष्ट्यपूर्णरीत्या बहरली, त्यापैकीच शारदा मंदिर हे एक ज्ञानमंदिर होय!

माशेल हा गाव पूर्वीपासूनच मोठे विद्वान, पंडित, शास्त्री, वैद्य, गायक-वादक कलाकार यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यशीलवान विभूतींच्या जन्माने पावन झालेल्या या प्रदेशाला ‘महाशैल’ असे म्हणायचे. अशा या गावात गोमंतकातील पहिले ग्रंथालय इ. स. 1889 साली स्थापन करण्यात आले. सारस्वत विद्यापीठाचा वारशातून ‘श्री शारदा मंदिराची स्थापना झाली, अन् आज या छोट्या वृक्षाचा महाप्रचंड ज्ञानवृक्ष झाला आहे, ती संस्था म्हणजे माशेल शारदा इंग्लिश हायस्कूल होय.

31 मार्च 1930 च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘श्रीशारदा मंदिर’ हे गावातील दुसरे ग्रंथालय सुरू झाले, जे आजही कार्यरत आहे. गावचे ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक बा. द. तथा दादा सातोस्कर यांच्या पुढाकाराने आणि त्यांचे सन्मित्र गजानन अनंत सुखठणकर यांच्या पाठिंब्याने या ग्रंथालयाची पायाभरणी झाली.

१९४७ -४८ साली संस्थेने माशेलात मराठी शिक्षणाची सोय केली. या शाळेसाठी एक शिक्षक नेमला होता. त्याचप्रमाणे पोर्तुगीज शिक्षणाची सोयही या संस्थेने केली होती. 1 जानेवारी 1959 रोजी संस्थेचा रौप्यमहोत्सव वि. स. सुखटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सभेत ‘मराठी शाळा माशेल’ श्री शारदा मंदिरामध्ये विलीनीकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतरच्या काळात गावात माध्यमिक शिक्षणाची सोय करण्यासाठी शारदा मंदिरात 1964 पासून इंग्रजी सहावी व सातवीचे वर्ग सुरू करण्याचे ठरवले व त्यासाठी श्री शारदा इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली.

1964 साली ज्या शारदा इंग्लिश हायस्कूलमध्ये 59 मुले शिकत होती, तेथे आज 1500 पेक्षाही अधिक विद्यार्थी शिकतात. तत्कालीन सारस्वत विद्यापीठाचे आज शारदा इंग्लिश हायस्कूल दिमाखात सुरू आहे. केजी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथे मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT