Climate change delay arrival of sea turtles in Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यात वातावरण बदलाचा फटका! समुद्री कासवांचे आगमन लांबणीवर

मोरजी येथे 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम चालू आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोरजी आणि आश्वे- मांद्रे हा समुद्रपट्टा ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे. टेंबवाडा मोरजी किनारी (Morjim beach) कासव (Tortoise) पैदास केंद्र म्हणून सरकारने (Goa Government) 500 मीटर चौरस जागा आरक्षित केली आहे. यंदा वातावरणात (Weather) बदल झाल्यामुळे कासवांचे आगमन लांबणीवर पडले आहे. सध्या हंगामी अभ्यास केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे.

गेल्‍या वर्षी 24 कासवांचे आगमन

मोरजी येथे 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम चालू आहे. यंदा वातावरणात फार बदल झाल्यामुळे किनारी भागात कासवांचे आगमन लांबवणीवर पडले आहे. दुर्मिळ जातीचे कासव ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येऊन अंडी घालायचे. गेल्या वर्षी येथील किनारी भागात 24 कासवांनी एकूण 2496 अंडी घातली होती. त्यापैकी 1674 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. 45 ते 52 दिवसांच्या फरकाने अंड्यातून नैसर्गिक प्रक्रियेनंतर पिल्ले बाहेर पडतात. दरम्‍यान, 2000 साली सरकारने कासवांसाठी जागा सुरक्षित केली आहे. मात्र, हल्लीच किनारी विकास प्राधिकरणाने आराखडा तयार केला. मात्र, यात कासव संवर्धन जागा दाखवण्यात आली नाही. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अभ्यास केंद्र खोपीत!

पर्यटन क्षेत्राच्या कक्षा रुंदावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत. वेगवेगळे आकर्षण पर्यटकांना करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विकास केला जातो. या मोहिमेमुळे मोरजीचे नाव जागातील पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. दुर्मिळ कासवांची माहिती व अभ्यास करण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यांतून पर्यटक येतात. मात्र, कायमस्वरूपी या ठिकाणी अभ्यास केंद्र नसल्यामुळे नागरिक आणि पर्यटकांची बरीच गैरसोय होते. सरकारने 2002 साली कासवांसाठी 500 चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे, या ठिकाणी कायमस्वरूपी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सीआरझेड कायद्यामुळे अडचणी येतात.

प्रदूषणाने कासव धास्तावले

मोरजी तेंबवाडा किनारी भागात वन खात्यातर्फे 1978 ते आजपर्यंत राबवलेल्या सागरी कासव संवर्धन मोहिमेंतर्गत 217 कासवांनी मिळून 23 हजार 703 अंडी घातली. त्यातील 14 हजार 633 पिल्ले सुरक्षित सोडली, तर 6636 अंडी खराब व 1441 पिल्ले जन्मल्‍यानंतर मरण पावली. सागरी कासव किनारी न येण्यामागे अनेक कारणे आहेत. किनारी जर शांततेचा भंग होत असेल, रात्रीच्या वेळी विजेचा झगमगाट, रात्री अपरात्री दारूकामाची आतषबाजी केल्यास, त्याचा परिणाम होतो. सध्या चाललेले ध्वनी प्रदूषण, रात्री अपरात्री समुद्रातील जलवाहतूक, मोठमोठ्या बोटी तरंगून त्यांचे दिवे प्रज्‍वलित करून ठेवणे, वातावरणाचा बदल, या मुख्य कारणांमुळे सागरी कासव येत नाहीत. ज्या ठिकाणी शांतता आणि विजेची सोय नाही, अश्या ठिकाणी कासव अंडी खड्डा खोदून घालतात व परत समुद्रात जातात. निसर्गाच्या प्रक्रियेनुसार 50 ते 52 दिवसांनंतर त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात.

कासव संवर्धन मोहीम पर्यटकांना वरदान

कासव संवर्धन मोहीमसुद्धा पर्यटकांना आणि स्थानिकांना ते वरदान ठरायला हवी. त्या दृष्‍टिकोनातून स्थानिक पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार, खासदार आणि सरकारने संयुक्तपणे स्थानिकांना आणि पर्यटन हंगामात व्यवसाय करणाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याही व्यवसायाला कोणतीच बाधा येऊ नये, यासाठी खास नियम करावेत. नाहीतर कासव जगावे की आदी माणूस जगवा, अशी स्थिती निर्माण होऊ नये. पर्यटक या किनारी भागात कासव संवर्धन मोहीम कशी राबवली जाते, ती पाहण्‍यासाठी, अभ्‍यासण्‍यासाठी येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT