Chikal Kalo Festival 2023  Dainik Gomantak
ब्लॉग

Chikal Kalo Festival 2023 : माशेल चिखलकाल्यात मंत्रीही दंग! भक्तिमय वातावरणात पारंपरिक खेळ रंगले

कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे प्रथम चिखलकाल्यात सहभागी झाले

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola : हरिनामाचा जयघोष करीत देवतांना नमन केल्यानंतर ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’ अशा गजरात नाचत चिखलकाल्याला आबालवृद्धांनी सुरुवात केली आणि काही क्षणात सगळेच गोविंदा चिखलात एकरूप झाले. चिखलाने माखलेल्या गोविंदांना ओळखणेही कठीण जात होते. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे प्रथम चिखलकाल्यात सहभागी झाले आणि शेवटपर्यंत विविध खेळातही सहभाग दर्शविला. आज वरूणराजानेही उत्तम साथ दिल्याने यंदाचा चिखलकाला हजारो भाविक, पर्यटकांच्या उपस्थित अविस्मरणीय ठरला.

सकाळी११ वाजल्यापासून माशेल-देऊळवाडा व इतर मंडळींचा सहभाग असलेल्या चिखलकाल्यात यंदा उत्साह खूपच दिसत होता. चिखलकाल्यात मृदंगाच्या तालात हरिनामाचा जयघोष करीत नाचणारे भाविक एकत्र आल्यानंतर विविध पारंपरिक खेळ खेळले. त्यामध्ये प्रामुख्याने बेडूक उड्या, चेंडू फेकणे, चक्र, आरोप, प्रत्यारोप अशा विविध श्रीकृष्णाच्या जीवनाशी पारंपरिक क्रीडांचा समावेश असतो. अगदी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात चाललेल्या या चिखलकाल्याचा समारोप दहीहंडीने झाला.

चिखलकाल्याला खूप जुनी परंपरा असून तो नेमका कधी सुरू झाला याची लिखित माहिती उपलब्ध नसला तरी किमान चार शतकांचा इतिहास या उत्सवाला आहे. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप असून लोकगीते पारंपरिक खेळ, नाचगाण्यांचा त्यात समावेश आहे. श्रीकृष्णाच्या बालक्रीडांशी निगडीत असा हा उत्सव असून आजही त्याचे स्वरूप बदललेले नाही.

पूर्वी देऊळवाडा भागातील मर्यादित लोक चिखलकाल्यात सहभागी व्हायचे. आता आसपासच्या गावातील लोकही त्यात सहभागी होऊ लागल्याने या उत्सवाला व्यापक स्वरूप आले आहे. पूर्वी चिखलकाल्याचे नेतृत्व कै. लक्ष्मण भगत, कै. विश्राम सावळ व अन्य ज्येष्ठ मंडळी करीत. सध्या किशोर भगत हे नेतृत्व करतात. यंदा पर्यटन खात्याने चिखलकाला महोत्सवाचे आयोजन केले होते.

नवसाची प्रथा

पिंपळाच्या कट्टय़ावर गव्हांचे पीठ व नारळापासून तयार केलेला ‘बोल’ हा खाद्य पदार्थ व इतर खाऊ भाविकांच्या गर्दीमध्ये फेकला जात होता. ते मिळविण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ होती. काहीजण हे पदार्थ न फेकता हातात देत होते. प्रचंड कोसळणाऱ्या पावसातही अनेक जण ‘बोल’ सर्वांना देण्यासाठी धडपडत होते.

भजनी सप्ताहाची सांगता

आषाढी एकादशीदिनी देवकीकृष्ण मंदिरातील भजनी सप्ताहाची सांगता चिखलकाला खेळून केली जाते. भजन संपल्यानंतर चिखलात खेळण्यापूर्वी आसपासचे लोक खेळणाऱ्यांना तेल लावतात, ‘गोपाळ गडी या रे’ असे म्हणत सर्व लोक एकत्र येऊन विठ्ठलाचा गजर करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT