Theater  Dainik Gomantak
ब्लॉग

Theater: काणकोण नाट्य महोत्‍सव आजपासून

महोत्सवासंदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात त्याची उत्तरे थिएटर फ्लेमिंगोच्या कलाकार सदस्यांकडून मिळवण्याचा हा प्रयत्न केलाय

गोमन्तक डिजिटल टीम

पैंगीणसारख्या आडगावात, ‘थिएटर फ्लेमिंगो’मार्फत, वैचारिक अधिष्ठान असलेल्या नाट्यप्रयोगांच्या महोत्सवाची सुरुवात आजपासून होते आहे. या महोत्सवासंदर्भात काही प्रश्न मनात निश्चितच उपस्थित होतात. त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे थिएटर फ्लेमिंगोच्या कलाकार सदस्यांकडून मिळवण्याचा हा प्रयत्न.

  • थिएटर फ्लेमिंगोने या गावात आपल्या थिएटर अ‍ॅक्टिव्हिटी कधीपासून सुरू केल्या?

2017 पासून थिएटर फ्लेमिंगो या भागात कार्यरत आहे.

  • या गावात नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचा विचार का आणि कधी आला?

उत्तर गोव्यात अनेक नाट्यविषयक उपक्रम होत असतात, पण दक्षिण गोव्यात विशेष करून गोव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या काणकोण भागात अशा प्रकारचे उपक्रम- नाट्यमहोत्सव जवळजवळ नाहीच आहेत.

ग्रामीण भागात विविध फॉर्मची नाटके पोहोचावीत हा या नाट्यमहोत्सवामागचा एक हेतू आहे. 2017पासून पैंगीण गावात आम्ही निवासी नाट्यकार्यशाळा सुरू केल्या.

त्याचाच पुढील भाग म्हणून अशा प्रकारचा नाट्यमहोत्सव इथे आयोजित करावा ही कल्पना आमच्या मनात आली. 2021 यावर्षी आम्ही आमचा पहिला नाट्यमहोत्सव इथे घडवून आणला.

  • या महोत्सवाचे स्वरूप तुमच्या मनात नेमके कशा प्रकारचे होते? त्याचप्रमाणे हा महोत्सव होतो आहे का?

आम्ही ‘पुअर थिएटर’च्या अनुषंगाने काम करतो. थिएटर फ्लेमिंगोच्या नाट्यनिर्मिती देखील बाह्य तंत्रांचे (प्रकाश योजना, नेपथ्य इत्यादी) फारसे अवडंबर माजवत नाही. अर्थात आमच्यापाशी पैसेच नसल्याने ते करताही येत नाही हा दुसरा भाग आहेच.

‘ट्रॅव्हलिंग थिएटर’ हा देखील आमच्या नाट्यविषयक उपक्रमांचा भाग असल्यामुळे, नाटकाच्या सादरीकरणासाठी साधी-सोपी साधने वापरणे अनिवार्य असते. आमच्यासारखे ‘पुअर थिएटर’ करणारे देशात इतर लोक आहेत.

त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना आमच्या महोत्सवात प्रयोग सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. कथाकथन शैलीचे नाटकही आमच्या महोत्सवाचा भाग आहे त्यातून एका वेगळ्या शैलीची ओळख प्रेक्षकांना होते. आमच्या मनात हेच तर होते.

  • देशात इतर ठिकाणी होणाऱ्या अशा महोत्सवांचा आदर्श तुम्ही बाळगता का?

देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर अशाप्रकारे आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवांचा आदर्श आमच्यासमोर आहे. फ्रेंच थिएटर फेस्टिवल किंवा आफ्रिकन देशात अशा प्रकारे चिल्ड्रन थिएटर फेस्टिवल होतात.

एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होणारा सॅटेलाइट थिएटर फेस्टिवल किंवा भारतात होणारा साल्ट्री फेस्टिवल हे सारे वेगवेगळे प्रायोगिक महोत्सव आमचे आदर्शच आहेत. गोव्यात होणाऱ्या सेरेंडिपिटी महोत्सवाचे उदाहरणही आपल्याला घेता येईल.

  • नाटकाबद्दल तुमची ठोस भूमिका काय आहे?

जिथे आम्ही जन्मलो, वाढलो तिथले प्रश्न नाटककाराने नाटकात मांडले पाहिजेत. नाटक गावात रुजले पाहिजे असे आम्हाला वाटते. याचा अर्थ असा नाही की गावात नाटक नाही पण पूर्ण अर्थाने नाटक या कलेशी बांधिलकी ठेवून, तो प्रकार आजमावून पाहण्यासाठी सातत्याने ‘इन प्रॅक्टिस’ राहणे इथे होत नाही.

जिथे लोक स्वतःला कनेक्ट करू शकतील असे स्पेस तयार झाले पाहिजेत. आम्ही त्याच प्रयत्नात आहोत. स्थानिक लोक जर आमच्याबरोबर आले तर ते ‘सोने पे सुहागा’ असेल.

  • या महोत्सवाचे बजेट कशाप्रकारे सांभाळले जाते?

आम्ही लोकांकडून या महोत्सवासाठी सहकार्य मागतो. आम्ही त्यांच्याकडून काही मोफत मिळवण्याची अपेक्षा करत नाही पण त्यांच्याकडून सवलतीची अपेक्षा निश्चितच करतो. ‘सीड फंडिंग’द्वारा आम्ही अनेक गोष्टी जमवतो.

पैशांची अपेक्षा आम्ही लोकांकडून करत नाही मात्र त्यांनी दिलेले धान्य, तेल, वाहतूक सेवा इत्यादी गोष्टी स्वीकारतो. आमचे पाहुणे कलाकार गावातील घरातच राहतात. अशा प्रकारे आम्ही आमचे बजेट सांभाळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

Goa Crime: धमकी, खून - अत्याचाराचा प्रयत्न! आरोपीला 10 वर्षांचा कारावास; फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निवाडा

SCROLL FOR NEXT