बोडगेश्र्वर  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील 'बोडगेश्वर' म्हापसा अन् बार्देशकरांचे श्रद्धास्थान

उद्यापासून म्हापसा येथील बोडगेश्र्वर देवस्थानची जत्रा सुरू होत आहे.

दैनिक गोमन्तक

उद्यापासून म्हापसा येथील बोडगेश्र्वर देवस्थानची जत्रा सुरू होत आहे. ‘बोडगेश्वर’ म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते, हिरवा शालू पांघरून दूरवर पसरलेल्या क्षेत्राचे विलोभनीय दृश्य आणि त्याच्या मधोमध उभे असलेले बोडकेश्वराचे सुंदर मंदिर. एखाद्या देखण्या चित्रातले वाटावे असे हे नित्य नयनरम्य दृश्य असते, जे लगतच्या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष अभावितपणे ओढून घेतेच.

म्हापसा आणि बार्देशकरांचे श्रद्धास्थान म्हणजे बोडगेश्वर. या साऱ्या क्षेत्राचा राखणदार म्हणजेच देव बोडगेश्वर. इथली ज्येष्ठ मंडळी सांगतात त्यानुसार, पूर्वी इथल्या शेतात गुराखी आपल्या गायी-म्हशींना येथे चरायला घेऊन यायचे. त्यानीच इथे दिवा लावायला सुरुवात केली. सभोवार केवड्याचे बन पसरून होते. कोकणीत केवड्यांच्या झुडपांना ‘बोडगिणी’ म्हणतात. ज्या देवाने इथे स्वरूप धारण केले त्याला या ‘बोडगिणी’वरूनच ‘बोडगेश्वर’ असे नाव प्राप्त झाले.

‘बोडगेश्वर’ मंदिराची स्थापना 1934 साली करण्यात आली आणि जत्रोत्सव पुढच्याच वर्षी, 1935 पासून सुरू झाला. हिंदू कॅलेंडरप्रमाणे पौष महिन्यात या मंदिराची जत्रा येते. पौष चतुर्थीला जत्रेची सुरुवात होते आणि पौष पौर्णिमेला ती संपते. म्हणजेच बघितले तर जत्राही दीड दिवसाची असते. पण त्याला पाच दिवसाचे स्वरूप देण्यात आलेले आहे. पाच दिवसाच्या या जत्रेला गोव्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. ‘बोडगेश्वर’ “आंगवणीचा देव’ असेही मानले जाते. म्हणजे नवसाला पावणारा देव. बोडगेश्वराला नवस केले जातात आणि ते केळ्याचा अख्खाचा अख्खा घड त्याला अर्पण करून फेडलेही जातात. दुपारच्या पूजेने जत्रोत्सवाची सुरुवात होते, त्यानंतर महाप्रसाद होतो. शहरातील विविध मंदिरे (Temple) भगवान बोडगेश्वराला फळे आणि फुले अर्पण करतात. हे विधी संपले की मग आपापल्या अर्पणभावांसह देवाच्या पायाशी भक्तांची रीघ सुरू होते.

‘बोडगेश्वर’ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारी बाजूनी उघडे आहे. मंदिराच्या मध्यभागी बोडगेश्वराची, हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली आकर्षक मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. मंदिरात अनेक देव-देवतांच्या आकर्षक सुबक कोरीव मूर्तीही आपल्याला पहावयास मिळतात. बोडगेश्वराच्या डोक्यावर म्हापसेकरांची (Mapusa) ग्रामदेवता शांतादुर्गा आहे. म्हापसेकरांची अशी भावना आहे की रात्रीच्या वेळेस बोडगेश्वर तिथल्या परिसरात फिरून म्हापशाचे रक्षण करतो. म्हापशाच्या बाजाराची भरभराट बोडगेश्वरामुळे झाली आहे, अशी त्यांची भावना आहे. संकटात असलेल्या प्रत्येकाला बोडगेश्वर मदत करतो अशी एक श्रद्धा लोकांच्या मनात आहे. दर रविवारी आणि बुधवारी म्हापसा आणि बार्देशमधील लोक बोडगेश्वराच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराला पुरोहित नाही. सेवेकरी या मंदिराची पूजा करतात. सेवेकरी शाम गावकर या मंदिराची सेवा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय या मंदिराची सेवा करत आहेत.

- विद्या राणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT