Elsie Coelho
Elsie Coelho Dainik Gomantak
ब्लॉग

रंगदेखणी : कलाकार असण्याचा आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

एल्सी कोएल्हो

कोणत्याही सामान्य माणसाची इच्छा असते अशीच एखादी पांढरपेशी नोकरी एल्सीला देखील हवी होती. शिक्षिका बनण्यासाठी तिने बी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची तयारी देखील केली पण एक तांत्रिक बाबींमुळे तिला तिथे प्रवेश मिळाला नाही. त्यावेळी तिच्या नवऱ्याने तिला प्रश्‍न केला- ‘दुसरी कुठली गोष्ट तू चांगली करु शकतील असे तुला वाटते?’ एल्सीने त्यावेळी त्याला उत्तर दिले, ‘मला डिझाईनिंगची आवड आहे.’ आणि शेवटी नियती एल्सी कोएल्होला तिच्या आवडत्या क्षेत्रातच घेऊन आली.

एल्सीने मुंबईत प्रथम वस्त्र रचनाकार (गार्मेंट डिझायनर) आणि नंतर गुजरातमध्ये जाऊन आभूषण रचनाकार (ज्वेलरी डिझायनर) असे दोन कोर्स पूर्ण केले. अनेक व्यवसायात ‘ट्रायल ॲण्ड एरर’ पद्धतीने जशा प्रारंभी अनेक गोष्टी शिकल्या जातात तसेच एल्सीच्या बाबतीतही घडले. व्यवसायातील स्पर्धेत जर टिकून रहायचे असेल तर सातत्याने प्रयत्न करावेच लागतात. त्याला दुसरा पर्याय नसतो. प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. कौतुक आणि अपयश या दोन्ही गोष्टी वाट्याला येतात.

एल्सीला आठवते, अगदी सुरवातीच्या काळात, शिवोलीच्या एसएफएक्स शाळेत भरलेल्या एका प्रदर्शनात तिला अनपेक्षितपणे एक टेबल देण्यात आले आणि तिथे एल्सीने आपली काही निर्मिती सादर केली. एल्सी म्हणते, ‘त्यावेळी, त्या दिवशी मला जाणवले की लोकांसमोर आपली कला प्रदर्शित करणे हे काही वेगळेच आनंददायी असते.’

एल्सीचा व्यवसाय जसा वाढत गेला तसे ग्राहक तिचे जवळचे मित्रच बनून गेले. याला कारण तिच्या निर्मितीला असणारा तिचा वैयक्तिक स्पर्श होता. व्यवसायाच्या स्थानिक स्वरुपाने तिला धैर्य दिले आणि सक्षम बनवले. लोकांबरोबर घडणारा प्रत्येक संपर्क हा तिला त्यांची आवड, त्यांचा कल, रंगसंगती, शरिराची ठेवण इत्यादी संबंधी महत्वाचे धडे देत होता.

‘इवॉल्व्ह कलेक्शन’ हा एल्सीने निर्माण केलेला ब्रँड आहे, ज्यात हातांनी निर्माण केलेले इमिटेशन आभूषणे, कपडे, एम्ब्रॉयडरी, कॅन्व्हसवर रंगवलेली चित्रे इत्यादी कलात्मक वस्तूंची विक्री होते. पण मुलतः तिचा हा ब्रँड आभूषणांसाठी ओळखला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे पितळ, ऍक्रॅलिक, कापड, मुलामा यांचा उपयोग करून ती वस्तंूची निर्मिती करते. @evolvewithelsie या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन एल्सीच्या कलाकृती तुम्ही पाहू शकता.

विविध ठिकाणी भरणारी ग्राहकाेपयोगी प्रदर्शने तसेच ऑनलाईन माध्यमातून एल्सी आपल्या उत्पादनांची विक्री करते. गोव्यात आणि संबंध भारतात तिच्या वस्तू जातात. अर्थात हे सारे काम खूप दमछाक करणारे आहेच. एल्सी बोलून दाखवते, ‘एक दिवस माझी स्वत:ची अशी जागा असेल जिथे ग्राहक चालत येतील आणि आपल्याला हव्या त्या वस्तू निवडतील.

पण तोपर्यंत स्लो ॲण्ड स्टेडी हाच माझा मंत्र असेल. शिक्षिका बनण्याऐवजी मी एक व्यावसायिक बनले याचा मला आज अत्यंत आनंद आहे. एक स्त्री म्हणून मला हे एखाद्या वरदानासारखे वाटते. घर आणि व्यवसाय या दोन्ही जबाबदाऱ्या मी संतुलितपणे सांभाळू शकते हे मला कळले आहे. स्वतःला कलाकार आणि निर्माणकर्ता म्हणवून घेण्यासारखा दुसरा आनंद नाही.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT