deteriorating Historical places in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Deteriorating Historical places in Goa: काळाच्या पडद्याआड झालेले स्थळ

खोतीगावातील येंड्रे वाड्यावरील समृद्ध धार्मिक संचित आज काळाच्या पडद्याआड जाण्याच्या वाटेवर आहे

दैनिक गोमन्तक

काळ जातो तसा समाज बदलतो. माणसे बदलतात. स्थलांतरे होतात. मुळच्या जागी वसवलेले सारे संचित तेथेच सोडून, माणसे अन्यत्र जातात. मग निराधार बनलेले हे संचित, कासाविसपणे अंगावरचे तडे सोसत, आपले बहिष्कृत अस्तित्व कालौघाच्या हाती सोपवून मुकाटपणे निष्क्रिय होते. ( Historical places in Goa on verge of extinction)

खोतीगावातील येंड्रे वाड्यावरील समृद्ध धार्मिक संचित आज काळाच्या पडद्याआड जाण्याच्या वाटेवर आहे. येंड्रे हा वाडा खोतीगाव अभयारण्य कक्षेत येतो. भूतकाळात कृषी संस्कृतीने समृद्ध असलेला हा वाडा आज त्यांच्या दिर्घ परंपरेच्या कृषी संस्कृतीलाच मुकण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोतीगाव अभयारण्याच्या जाचक नियमांमुळे येथील रहिवाशांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले. आज प्रत्यक्षात या वाड्यावर केवळ दोन-तीन रहिवाश्यांची वस्ती बाकी राहिली आहे.

तेथील एकेकाळच्या सुपीक परंतु आता पडिक बनलेल्या या कृषी जमिनीकडे दृष्टीक्षेप टाकला असता, त्याकाळच्या हा परिसराच्या कृषीप्रधान संस्कृतीची समृद्धी स्पष्ट लक्षात येते. या परिसरात कृषी संस्कृतीमुळे सुबत्ता होती. त्या सुबत्तेतूनच एकेकाळी या परिसरात देवदेवतांच्या समृद्ध वारसा रहिवाशानी इथे निर्माण केला होता. त्याची प्रथमदर्शनी साक्ष म्हणजे येथे उघड्यावर पडून असलेले शिल्पकलेचे सुबक शिवलिंग व नंदीची मूर्ती. मोडलेल्या शिवमंदीराचा चबुतराही तिच साक्ष देतो. वाड्यावर सुबक अशी घोड्यापाईकाची मूर्तीही आहे. येथील गावकर कुटूंब, परंपरेप्रमाणे सणासुदीच्या दिवशी त्याची पुजा करतात. वाड्यावर सामुदायिक पद्धतीने  तुळशीविवाह करण्यासाठी तुळशीवृंदावन आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी उपवर मुलांनी येथे असलेले वेगवेगळ्या वजनाचे लहान मोठे दगडी गोळे उचलून मागे फेकून आपली क्षमता सिद्ध करावी अशी प्रथा आहे. अशाच प्रकारची प्रथा काणकोणमधल्या, गुळे येथेही आहे .या वाड्याची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याच्या कारवार तालुक्याला जोडते. त्यामुळे एकेकाळी या भागावर कर्नाटकातील राजांचा वरदहस्त होता असा अंदाज बांधता येतो.

पैगीण भागातील जमिनदार येथे जमिनी कसत

पैगीण पंचायत क्षेत्रातील गाळये, चिपळे या भागातील अनेक जमिनदार पावसाळ्यात पाच-सहा महिने येंड्रे येथे वसाहती करून शेती करत होते. त्यामुळे तिथल्या भागातील रहिवाश्यांचा संपर्क व सबंध येंड्रेवासीयांशी सलोख्याचे होते. मात्र खोतीगाव अभयारण्यकक्षेत हा वाडा गेल्यापासून येथील शेतजमिनी पडीकच आहेत असे येंड्रे येथे शेती करणारे पैगीण येथील एक जमिनदार विद्याधर पेडणेकर यांनी सांगितले.

- सुभाष महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT