Spicejet  Dainik Gomantak
अर्थविश्व-

Spicejet ची प्रवाशांसाठी मोठी ऑफर; करता येणार बूकींग डेट चेंज

दैनिक गोमन्तक

स्पाइसजेटने (Spicejet) कोरोना विषाणूच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. आता स्पाईसजेटने विमान तिकीट बुक (Ticket book) करणाऱ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून अनेक सेवा ग्राहकांना प्रवासादरम्यान विनामूल्य दिल्या जातील. या ऑफर दरम्यान फ्लाइट (Flight) तिकिट बुक केलेल्या लोकांना बरेच फायदे मिळणार आहेत. या ऑफरमधील प्रवाश्यांसाठी कोरोना टेस्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा जाणून घ्या की स्पाइस जेट प्रवाशांना या काळात विनामूल्य कोणत्या सेवा पुरवत आहे. तसेच या ऑफरचा कसा फायदा घेता येईल. (Spicejet passengers can change the booking date for free)

प्रवाशांना कोणती सेवा दिली जाईल?

  • स्पाईसजेटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 4 सेवा मोफत दिल्या जातील, ज्यासाठी तुम्हाला आधी पैसे भरावे लागलतील.

  • या ऑफरमध्ये प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची तारीख बदलण्याची संधी दिली जात आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही पुढील महिन्यासाठी फ्लाइटचं तिकीट बूक केलं आहे आणि तुम्हाला त्या दिवशी प्रवास करायचा नाही, तर तुम्ही तिकिटाची तारीख बदलून घेता येणार आहे. आपण ही तारीख विनामूल्य बदलून देऊ शकता.

  • या ऑफरमध्ये प्रवाशांना मोफत स्नॅक्स देखील दिले जातील.

  • या ऑफरमध्ये तुमची आवडती सीट देखील बूक करू शकता, कारण फ्लाइटच्या तिकिटांमध्ये खिडकीच्या सीटची खूप मागणी आहे.

  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोफत RT-PCR ची व्यवस्था केली जाईल.

  • कोरोना पॉझिटिव्ह प्रवाश्यांसाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे

  • ज्यांनी स्पाइसजेट वरून तिकीट आरक्षित केले होते आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते प्रवास करू शकले नाहीत, त्यांना स्पाइसजेटने त्यांच्या प्रवासाची तारीख बदलण्याची संधी दिली. तसेच, विमान कंपनीने या कामासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत.

स्पाइसजेट विशेष सुविधा देत आहे

स्पाइसजेटने कोरोनाच्या काळात कार्यरत असलेल्या आपल्या विमानांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये स्टेट ऑफ द आर्ट एयर सर्कुलेशन चा समावेश आहे. ज्यामुळे हवा खाली जाईल, ज्यामुळे हवेत असलेले बॅक्टेरिया प्रवाशांपर्यंत पोहोचू शकणार नाही. या व्यतिरिक्त एअर इंडियामध्ये एचईपीए फिल्टर्स वापरण्यात येत आहेत, यामुळे हवा स्वच्छ राहते आणि प्रवासी सुरक्षित राहतात. या व्यतिरिक्त, फ्लाइटमध्ये सॅनिटायझिंग प्रक्रियेचे काम केले जात आहे आणि सर्व सुरक्षा किट क्रूला दिल्या जात आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही समस्या येणार नाही. तसेच स्पाइसजेटने असा दावा केला आहे की, त्यांनी आपल्या विमान कंपनी कर्मचार्‍यांना लस दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT