Paytm Dainik Gomantak
अर्थविश्व-

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरला

पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरला

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक गतीने आर्थिक व्यवहारात पुढे आलेली कंपनी म्हणून पेटीएमकडे पाहिले जाते. व्यवहारत सरळता आणि सुलभता तर डिजिटल पेमेंट कंपनीने आणली होती. ग्राहक पेटीएमकडे वळले होते. तर पेटीएमबाबत साशंक असलेले गुंतवणूकदार ही आपसूकच या आयपीओकडे वळाले. मात्र आता पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरल्याचे समोर येत आहे. त्यांचा पैसा पाण्यात गेला आहे आणि त्यांना फसविल्याची जाणीव गुंतवणुकदारांना सलत आहे. ग्राहकांच्या आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जात आहे. तर पेटीएमने विश्वासहर्ता गमावल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of india) च्या ती रडावर आली आहे. (Paytm stock is now down a massive 72 percentage from its issue price)

पेटीएमचा 2150 रुपयांचा इश्यु प्राईस (Issue Price) असलेला पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणकुदारांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. कारण 100 रुपयांमधील 72 रुपये बुडाले तर उर्वरीत 28 रुपये राहतील का? की तेही कधीही बुडतील अशी संभ्रमास्था गुंतवणुकदारांची झाली आहे.

याच्याआधी पेटीएमच्या येणाऱ्या प्रत्येक आयपीओवर गुंतवणुकदारांनी प्रचंड गुंतवणूक केली होती. परंतु, आयपीओचा दुप्पटीतही नोंद झाला नाही. तर मोठ्या वित्त संस्था या आयपीओपासून दूर होत्या. परंतु, किरकोळ ग्राहकांनी, गुंतवणुकदारांनी (Investors) पेटीएम निदान काही तरी नफा तर देईल या आशेने मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे पेटीएमचे नशीब फळफळले. मात्र, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी पेटीएमचा आयपीओने 25 टक्क्यांच्याही खाली घसरला. तर शेअर 1586 रुपयांवर आला. त्यामुळे पेटीएमच्या (Paytm) व्यावसायिक पद्धती व नियोजनावर ग्लोबल ब्रोकरेज कंपनीच्या मैक्वायरी यांनी सडकून टिका केली. तसेच हा आयपीओ (IPO) 1200 रुपयांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तविताना, हे बिझनेस मॉडेल दिशाहीन असल्याचा म्हटले.

पहिल्याच दिवशी 25 टक्क्यांनी शेअर घसरल्याने गुंतवणुकदारांनी नफा नको म्हणत म्हणून काढता पाय घेतला. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी (Investors) पेटीएमवर (Paytm) भरवसा दाखवला आणि थांबले ते मात्र बुडाले. मंगळवारी पेटीएमचा शेअर 584 रुपयांवर आला.

RBI ला पेटीएमच्या व्यवहाराबाबत साशंकता

दरम्यान, पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) सध्या आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. काही तथ्ये समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांच्या नेतृत्वाखालील पेटीएम पेमेंट्स बँकेस त्यांच्या IT प्रणालीचे ऑडिट करण्यासही सांगण्यात आले आहे. ज्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. पेटीएमवर मनी लॉड्रिंगसारखा (Money laundering) गंभीर आरोप आहे. तसेच केवायसी नियमांना हरताळ फासल्याने कंपनीभोवती कारवाईचा फास आवळण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT