How PPF accounts are profitable  Dainik Gomantak
अर्थविश्व-

PPF Accounts Are Profitable : 'पीपीएफ'मुळे केवळ 411 रूपये गुंतवून व्हाल करोडपती; समजावून घ्या योजना...

नोकरदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली गुंतवणूक योजना; कर सवलतही

गोमन्तक डिजिटल टीम

How PPF accounts are profitable : ठेव सुरक्षित राहील आणि त्यावर व्याजही (Interest) उत्तम मिळेल, अशा दोन्ही गोष्टी एकाच सरकारी योजनेत (Government Scheme) मिळत आहेत. या योजनेचे नाव आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) आहे. या योजनेला PPF या शॉर्ट नावानेही ओळखले जाते. ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे.

लोक PPF मध्ये डोळे झाकून पैसे लावतात. यात गुंतवणूक केलेला एक पैसाही बुडत नाही. कारण केंद्र सरकार या योजनेची गॅरंटी घेते. जाणून घेऊया या योजेनेची वैशिष्ट्ये.

PPF मध्ये किती गुंतवणूक करता येते?

या योजनेत तुम्ही वर्षाला किमान 500 रूपये ते कमाल 1.5 लाख रूपये गुंतवणूक करू शकता. एका आर्थिक वर्षात 1.5 लाखाहून अधिकच्या रकमेवर व्याज मिळत नाही. ही रक्कम एकरकमी किंवा हफ्त्यानेही जमा करता येते.

व्याज किती मिळते?

बँक आणि पोस्ट ऑफिस येथे फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposite) च्या तुलनेत PPF वर अधिक व्याज मिळते. सध्या PPF वर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. या गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. दर तिमाहीच्या आधारे व्याज दरांचा आढावा घेत अर्थ मंत्रालय व्याजदराचा अंतिम निर्णय घेत असते.

कर सवलतीचा लाभ मिळतो का?

कर सवलतीच्या दृष्टीने ही योजना उत्तम आहे. त्यामुळेच नोकरदारांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय आहे. PPF मध्ये पैसे जमा करून तुम्ही उत्तम परताव्यासह करामध्ये सवलतीचाही लाभ घेऊ शकता. इन्कम टॅक्सच्या कलम 80 C नुसार ही सवलत घेता येईल. याची उच्चतम मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. गुंतवणूक, त्यावरील व्याज, मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम अशी सर्व रक्कम करमुक्त असेल.

किती वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते?

सरकारी नियमांनुसार PPF योजनांमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही मॅच्युरिटीनंतरही योजना सुरू ठेऊ इच्छित असाल तर PPF अकाऊंट 5-5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. त्यासाठी मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधीच अर्ज द्यावा लागेल.

मुदतीआधी पैसे काढता येतात का?

आणिबाणीच्या स्थितीत तुम्हाला या रकमेतील 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते. पण त्यासाठी किमान 6 वर्षे पुर्ण झालेली असली पाहिजेत.

अकाऊंट कुठे ओपन कराल?

पोस्ट ऑफिससह सर्व सरकारी आणि खासगी बँकेत हे अकाऊंट ओपन करता येते. अल्पवयीन मुलांच्या नावानेही अकाऊंट काढता येते. दरम्यान, PPF अकाउंट ओपन केल्यानंतर ते 5 वर्षे बंद करता येत नाही. त्यानंतर काही प्रकरणात ते बंद करता येते.

PPF मध्ये पैसे जमा करण्याचा खास नियम?

जर तुम्ही PPF मध्ये पैसे जमा करत असाल तर 5 तारखेला द्या. त्यावर तुम्हाला पुर्ण महिन्याचे व्याज मिळेल. जर तुम्ही 6 तारखेला जमा केलात तर त्यावर व्याज पुढच्या महिन्यापासून जमा होईल. व्याजाची गणना 5 व्या दिवशीच्या अखेरीस आणि महिन्याच्या अखेरच्या दिवशी किमान रकमेवर केली जाते.

PPF मुळे करोडपती कसे व्हाल?

या सरकारी योजनेत तुम्ही थोडे-थोडे पैसे जमा करून करोडपती होऊ शकता. याचे गणित सोपे आहे. केवळ दिवसाला 411 रूपये म्हणजे वर्षाला 1.5 लाख रूपये जोडून 25 वर्षात या रकमेवर 7.1 व्याजाने 1.3 कोटी रूपये होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT