Mutual Fund  Dainik Gomantak
अर्थविश्व-

Mutual Fund SIP: एसआयपीमध्ये गुंतवणूक करताय? मग लक्षात ठेवा 'या' गोष्टी...

एसआयपीमध्ये शेअर बाजारातील जोखीम कमी, चक्रवाढ व्याजाचा मिळतो लाभ

Akshay Nirmale

Mutual Fund SIP: गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या बाबतीत लोकांचा इंटरेस्ट खूप वाढला आहे. आजच्या काळात, बहुतेक लोक एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण एसआयपीमध्ये बाजारातील जोखीम कमी आहे, चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो, ज्यामुळे तुम्हाला इतर बचत योजनांच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तज्ज्ञांच्या मते, साधारणत: 12 टक्क्यांपर्यंत सरासरी परतावा एसआयपीद्वारे मिळतो, तर कधी कधी 14 ते 15 टक्के परतावाही मिळतो. अशा परिस्थितीत, आजच्या काळात गुंतवणुकीच्या दृष्टीने ही एक अतिशय चांगली योजना आहे. परंतु जर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवत असाल तर तुम्ही पुढील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

- शेअर बाजारात चढ-उतारांची प्रक्रिया नेहमीच चालू असते, त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

- मंदी पाहून अनेक जण गुंतवणूक करणे थांबवतात. पण अशा वेळी तुम्हाला बरेच शेअर्स स्वस्तात मिळतील.

- मंदीच्या परिस्थितीत गुंतवणूक करून, जेव्हा तेजी येते तेव्हा गुंतवणुकीचा भरपूर फायदा मिळवता येतो.

- म्युच्युअल फंडात अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करू नका.

- तुमच्या जाणकार लोकांना कमी वेळात चांगले रिटर्न्स मिळाले असले तरी हे सर्वांसोबतच घडेलच असे नाही.

- तुम्ही किमान 5-7 वर्षे वेळ द्यावा, मग तुम्हाला भरपूर नफा मिळू शकेल.

म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला मल्टी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे अनेक पर्याय मिळतात. पूर्वी लोकांना मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधून चांगला नफा मिळत असे, परंतु प्रत्येक वेळी ते होईलच असे नाही. अशा प्रकारची गुंतवणूक टाळावी. तुम्ही नेहमी मल्टी कॅप, लार्ज कॅपमध्ये गुंतवणुकीची योजना करावी. जेव्हा लोक बाजारात तेजी पाहतात तेव्हा ते गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने हे चांगले नाही कारण शेअर बाजारातील चढउतारांची काही खात्री देता येत नाही. बाजार वेगाने वाढतो, त्यानंतर दुप्पट वेगाने घसरतो. म्हणूनच अशी गुंतवणूक नेहमी टाळावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT