Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनांमुळे पैशांचा पाऊस!

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आखत असाल तर पोस्ट ऑफिस स्कीम तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात.

दैनिक गोमन्तक

सध्या पोस्ट ऑफिसच्या (Post Office) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 6.8% व्याज दर दिले जात आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला आयकर देखील वाचवता येतो. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे 10.59 वर्षांत दुप्पट होतात. (You can earn money from some of these post office schemes)

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक 7.6% व्याज दर मिळत आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 9.47 वर्षे लागतील.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर सध्या 7.4% व्याज दर दिले जात आहे. या योजनेत तुमचे पैसे सुमारे 9.73 वर्षांत रक्कम दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या 7.1% व्याज दर मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागणार.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) वर सध्या 6.6% व्याज दर मिळत आहे, जर या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते 10.91 वर्षात रक्कम दुप्पट होईल.

तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवल्यास, पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण त्यावर फक्त 4.0 टक्के व्याज तुम्हाला मिळते, म्हणजेच 18 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होतील.

सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वर 5.8% व्याज दर दिले जात आहे, त्यामुळे या व्याजदराने पैसे गुंतवले तर साधारण 12.41 वर्षात ते रक्कम दुप्पट होईल.

1 वर्ष ते 3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर (TD) 5.5% व्याज दर मिळते. तुम्ही यामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम सुमारे 13 वर्षांत दुप्पट होईल. त्याचप्रमाणे, तुम्हाला 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7% व्याजाने दर मिळत आहे. या व्याजदराने तुम्ही पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे 10.75 वर्षांत दुप्पट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT