Bikes Dainik Gomantak
अर्थविश्व

तरुणाईची धडकन Yamaha, Apache बाईकचे नवे मॉडेल येतायेत; कधी होणार लॉन्चिंग, नव्या फिचर्सची माहिती जाणून घ्या

Yamaha R3 Apache RTX 300 KTM 390: टेक क्षेत्रात या आठवड्यात अनेक घडामोडी घडल्या. नव्या वर्षात (2025) टेक कंपन्या अफलातून फिचर्स, आकर्षक डिझाइनसह बाईक्स लॉन्च करणार आहेत.

Manish Jadhav

टेक क्षेत्रात या आठवड्यात अनेक घडामोडी घडल्या. नव्या वर्षात (2025) टेक कंपन्या अफलातून फिचर्स, आकर्षक डिझाइनसह बाईक्स लॉन्च करणार आहेत. तत्पूर्वी, हिरोने आपले काही प्रोडक्टस बंद केले तर काही कंपन्यांनी आतापासून प्री-बुकिंग सुरु केले आहे. चला तर मग या आठवड्यात टेक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींविषयी जाणून घेऊयात...

TVS ची खास पेशकश

मागील काही वर्षांमध्ये टीव्हीएसच्या अनेक बाईक्स लॉन्च झाल्या. परंतु TVS ADV ला Apache RTX 300 म्हटले जाऊ शकते. TVS ADV ला नवीन RT-XD4 300cc इंजिन देण्यात आले आहे. टीव्हीएसने या बाईकचे इंडिया बाईक वीक 2024 मध्ये अनावरण केले होते. आता 2025 म्हणजेच नव्या वर्षात कंपनी ही बाईक लॉन्च करु शकते.

Yamaha R3 आणि MT-03 भारतात लवकरच लॉन्च होणार?

Yamaha ने R3 आणि MT-03 च्या 2025 चे जागतिक स्तरावर अनावरण केले होते. बाईकची खासियत बाईकप्रेमींना मोहिनी घालते. बाईकचे डिझाइन आणि फिचर्स कडक आहेत. ही बाईक सुद्धा 2025 च्या मध्यात कंपनी लॉन्च करु शकते. परंतु नव्याने लॉन्च करण्यात येणारी ही बाईक सध्याच्या मॉडेल्सपेक्षा थोडी जास्त महाग असू शकते.

KTM 390 Adventure S आणि Enduro R चे प्री-बुकिंग सुरु

KTM India ने अधिकृतपणे बहुप्रतिक्षित KTM 390 Adventure S आणि Enduro R चे प्री-बुकिंग सुरु केले आहे. बाईकप्रेमी अधिकृत KTM वेबसाइट आणि कोणत्याही डीलरशीपद्वारे रु. 1,999 मध्ये बाईकची प्री-बुकिंग करु शकतात. जानेवारी 2025 मध्ये कंपनी ही बाईक लॉन्च करु शकते.

2024 हिरो डेस्टिनी 125 डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च होणार

हिरो या महिन्यातच (डिसेंबर 2024) भारतात डेस्टिनी 125 लॉन्च करणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी डेस्टिनी 125 चे अनावरण करण्यात आले होते. परंतु हिरोने त्यावेळेस किंमत जाहीर केली नव्हती.

हिरोने 'या' बाइक्स बंद केल्या!

हिरोने त्याच्या बाईक्स लाइनअपमधून तीन मॉडेल्स कोणालाही थांगपत्ता लागू देता बंद केले, ज्यात Xpulse 200T 4V, Xtreme 200S 4V आणि पॅशन Xtec यांचा समावेश आहे. असे दिसते की, हिरोने खूप दिवसांपूर्वी या बाईक्स बंद केल्या होत्या, परंतु आत्ता Hero च्या वेबसाइटवरुन त्या हटविल्या गेल्या आहेत. Hero च्या 200cc लाइनअपमध्ये आता फक्त Xpulse 200 4V आहे.

बजाज चेतकचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये चेतक इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या मधोमध धूर सोडत होती. त्यावर बजाजने तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटले होते की, प्लास्टिकच्या पॅनेलचे नुकसान झाले. बॅटरी किंवा मोटरचा काही प्रॉब्लेम नव्हता.

Kawasaki Ninja 1100SX भारतात लवकरच लॉन्च

Kawasaki लवकरच भारतात (India) अपडेटेड Ninja 1100SX लॉन्च करु शकते. निन्जा 1000SX काही काळापूर्वी भारतात बंद करण्यात आला होती. भारतातील लीटर-क्लास स्पोर्ट्स टूरिंग सेगमेंटमध्ये हा एक लोकप्रिय पर्याय होता.

Ducati Multistrada V2 ग्लोबल रिव्हल

Ducati ने जागतिक स्तरावर Multistrada V2 आणि V2S अनावरण केले. बाईक्सचे डिझाइन बाईकप्रेमींना आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे, नव्या फिचर्संनी या बाईकला आणखी खास बनवले आहे. भारतात ही बाईक 2025 च्या मध्यापर्यंत लॉन्च होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT