जर तुम्हाला स्पोर्टी बाईक्सचे वेड असेल, तर मार्केटमध्ये एक क्लासिक बाईक लॉन्च झाली आहे. मार्केटमध्ये या बाईकची थेट स्पर्धा बजाज पल्सरशी होत आहे. ही बाईक 1.34 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरुम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक अनेक नवीन कलर कॉम्बिनेशनमध्ये लॉन्च केली आहे. चला तर या शानदार बाईकबद्दल (Bikes) जाणून घेऊया...
दरम्यान, ही शानदार बाईक म्हणजे Yamaha FZ-S FI, ज्याचे 2025 अपडेट मॉडेल कंपनीने लॉन्च केले आहे. नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. कंपनीने काही नवीन कलर पर्याय देखील दिले आहेत.
यामाहा एफझेड-एस एफआयमध्ये 149 सीसी सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. ते 12 बीएचपीची पॉवर आणि 13.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. त्याचे वजन सुमारे 137 किलो आहे. या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि Y-कनेक्टसह पूर्णपणे डिजिटल क्लस्टर मिळते.
कंपनीने यामाहा FZ-S FI बाईकमध्ये एक नवीन TFT इन्स्ट्रुमेंट मीटर प्रदान केले आहे. पण ही बाईक केवळ हायब्रिड व्हर्जनमध्येच उपलब्ध असेल. या बाईकचे 4 नवीन कलर सादर करण्यात आले आहेत. हे कलर मॅट ब्लॅक, आइस फ्लूओ व्हर्मिलियन, मेटॅलिक ग्रे आणि सायबर ग्रीन असे आहेत. कोणत्याही कलरसाठी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त किंमत मोजावी लागणार नाही. एवढेच नाही तर ही बाईक नवीन एमिशन नियमांनुसार विकसित करण्यात आली आहे. या बाईकमध्ये BS6 OBD2B नियमांचे पालन करणारे इंजिन बसवले आहे.
यामाहा एफझेड-एस एफआय 1,34,800 रुपयांच्या एक्स-शोरुम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक त्याच्या मागील मॉडेल Yamaha FZ-S FI Ver 4.0 पेक्षा सुमारे 3,6009 रुपये महाग आहे. यावेळी कंपनीने बाईकच्या नावातून Ver 4.0 काढून टाकले आहे.
मार्केटमध्ये यामाहा एफझेड-एस एफआय थेट बजाज पल्सर एन150 आणि एन160 ला टक्कर देईल. याशिवाय, TVS Apache RTR 160 4V, Suzuki Gixxer आणि Honda SP160 कडूनही स्पर्धा असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.