World Consumer Rights Day Dainik Gomantak
अर्थविश्व

जागतिक ग्राहक हक्क दिन: ई-कॉमर्स कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल

डिजिटल सेवेमुळे सुविधा वाढल्या आहेत त्यासोबत काही समस्याही निर्माण होत आहेत.

दैनिक गोमन्तक

जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day): जागतिक ग्राहक हक्क दिन 2022 हा ग्राहक संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. ग्राहकांच्या प्रत्येक सेवेच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. यावेळची थीम ‘फेअर डिजिटल फायनान्स’ (Fair Digital Finance) आहे. दरम्यान, ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग म्हणतात की, डिजिटल सेवेमुळे सुविधा वाढल्या आहेत पण काही समस्याही निर्माण होत आहेत.

ई-फायलिंग

सचिव रोहित कुमार सिंग यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त पुढे सांगितले की, ' ग्राहक सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी, ग्राहक मंत्रालयाला सर्व सेवांमध्ये समाविष्ट केले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या समस्या ई-फायलिंगद्वारे नोंदवू शकता. ई-कॉमर्सचा असाच विकास होत राहिला तर त्याची मक्तेदारी होईल. ते टाळून सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच राहकाला पर्याय असला पाहिजे म्हणजे अल्गोरिदमिक स्वातंत्र्य देखील ग्राहकांना (Alorithmic Independence) असले पाहिजे.

ई-कॉमर्स कंपन्यांची जबाबदारी घ्या - राज्यमंत्री

राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनीही ग्राहक हक्क दिनी ग्राहक व्यवहारावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, 'ई-कॉमर्स कंपन्यांना जबाबदार बनवण्यासाठी नियम बनवले आहेत. तसेच काही बदल केले जात आहेत, जेणेकरुन ग्राहकांचे हित जपण्यास प्राधान्य दिले जावे.' यासोबतच ई-कॉमर्स कंपन्यांची जबाबदारी घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यासाठी अनेक कंपन्यांना नियमभंगाच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या सरावासाठी आतापर्यंत सुमारे 59 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर डिजिटल सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सर्वांसाठी फायदेशीर तसेच सुरक्षित बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT