विप्रो लिमिटेडने (Wipro) गुरुवारी बाजार भांडवलामध्ये 4 ट्रिलियन रुपये म्हणजेच 4 लाख कोटी रुपये चा आकडा गाठला आहे. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे त्याचबरोबर कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. बाजार भांडवलामध्ये (Share Market) 4 ट्रिलियन रुपयांचा टप्पा गाठणारी ती तिसरी आयटी कंपनी (Nifty IT)आणि 13 वी सूचीबद्ध भारतीय कंपनी ठरली आहे.(Wipro achieve market cap of 4 trillion Nifty IT on high in Share Market)
विप्रोचे शेअर्स गुरुवारी 739.90 रुपये प्रति शेअरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. जे त्याच्या पूर्वीच्या बंदच्या तुलनेत 8.4 टक्क्यांनी उडी आहे.केवळ 12 भारतीय सूचीबद्ध कंपन्यांनी 4 ट्रिलियन रुपयांचा मार्केट कॅपचा आकडा गाठला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, इन्फोसिस, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल लिमिटेड यांचा समावेश आहे.
विप्रोच्या सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 9.6 टक्क्यांनी घसरून 2,930.7 कोटी रुपयांवर आला आहे. तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल 7.7 टक्क्यांनी वाढून 19,667.4 कोटी रुपये झाला. कंपनीच्या नफ्यात घट होण्याचे कारण म्हणजे जास्त कर भरणे आणि खर्चात तीक्ष्ण वाढ.पण या तिमाहीत, आयटीविभागाने अमेरिकन डॉलरची 6.9 टक्क्यांनी वाढ करून 2.58 डॉलरवर पर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान बाजारातील मोठ्या कंपन्यांचा विचार करता रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅपने 17 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत, देशातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या स्टॉकमध्ये या वर्षी आतापर्यंत 35.83 टक्के वाढ झाली आहे.सेन्सेक्स मागील सत्रात 452.74 अंकानी वाढून 60,737.05 वर बंद झाला होता. आज सेन्सेक्समध्ये सलग पाचवी वाढ दिसून आली आहे. तर निफ्टी 169.80 अंकांनी वाढून 18,161.75 वर बंद झाला होता . परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी एकूण आधारावर 937.31 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहे.
IT कंपन्यांचा विचार करता विप्रोचा निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 17 टक्क्यांनी वाढून 2,930.6 कोटी रुपये इतका झाला आहे. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,484.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.तर देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत 11.9 टक्क्यांचा एकत्रित निव्वळ नफा 5,421 कोटी रुपये नोंदवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.