Nirmala Sitaraman Dainik Gomantak
अर्थविश्व

GST On Petrol Diesel: पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मोदी सरकारची तयारी; दरात होणार मोठी घसरण

GST Council Meeting: केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे 20 रुपयांनी कमी होऊ शकतात.

Manish Jadhav

GST Council Meeting: केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे 20 रुपयांनी कमी होऊ शकतात. पेट्रोलियम उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश केल्यास देशभरातील इंधनावरील करात एकसमानता येईल. म्हणजेच देशभरात पेट्रोल आणि डिझेल जवळपास सारख्याच किमतीत मिळेल.

दरम्यान, जीएसटी परिषदेच्या 53 व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तयार आहे. आता राज्यांनी याबाबत निर्णय घेऊन त्याचे दर ठरवायचे आहेत.

जीएसटी दरावर सहमती झाली आणि पेट्रोलियम पदार्थांवर 28 टक्के कमाल कर लावला तरी सर्वसामान्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर 19.71 रुपये आणि डिझेलवर 12.83 रुपये प्रति लिटर इतका दिलासा मिळणार आहे. तथापि, याचा परिणाम कराच्या रुपाने सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नावर होऊ शकतो.

दिल्लीत (Delhi) पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे, तर डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे. या आधारावर जीएसटी लागू झाल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 75.01 रुपये आणि डिझेलची किंमत 74.79 रुपये प्रतिलिटर होईल.

एक लिटर पेट्रोलवर 35.29 रुपये कर

जर तुम्ही दिल्लीत एक लिटर पेट्रोल खरेदी केले तर तुम्हाला 94.72 रुपये द्यावे लागतील. यामध्ये एकूण कर 35.29 रुपये आहे, ज्यामध्ये 19.90 रुपये उत्पादन शुल्क आणि 15.39 रुपये व्हॅट समाविष्ट आहे. उत्पादन शुल्क केंद्राकडे जातो, तर व्हॅट राज्य सरकार गोळा करते. त्याचप्रमाणे एक लिटर डिझेल 87.62 रुपयांना खरेदी केल्यास एकूण 28.62 रुपये कर आकारला जातो. यामध्ये उत्पादन शुल्काचा हिस्सा 15.80 रुपये आणि व्हॅटचा हिस्सा 12.82 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT